साधारण ५००० वर्षा पूर्वी योगाची सुरवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत योगाचे फायदे आणि महत्त्व जगभरात सर्वमान्य झाले आहेत. आणि ते अनेक वैज्ञानिक संशोधनातून आणि अभ्यासातून सिद्ध झाले आहेत. आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर  योगासनामुळे जे हास्य  बघायला मिळते त्यातून त्याची श्रेष्ठता आपल्याला समजू शकते. अनेक वेगळ्या संदर्भात आपल्याला ती जाणवते जसे निरोगी शरीर,शांत आणि प्रसन्न मन किंवा चेतनेच्या उच्च स्तरावर जाऊन सिध्दी प्राप्त होणे वगैरे.

एक योगी आपल्या सर्वांमध्ये दडलेला आहे आणि त्याच्याशी जोडले जाणे त्याची ओळख होणे हाच नवीन साधकांसाठी योग होऊ शकतो. योग आपल्याला पूर्व परीचीत असलेल्या काही स्थितीच्या चमत्काराची आठवण करून देतो. या आपल्या अद्भुत प्राचीन परंपरेचे आपल्यावर कैक पटीने परिणाम दिसून येतात. यामुळे आपली सजगता वाढण्यासाठी मदत होते, आपण वर्तमान क्षणात राहू लागतो, आपले मन शांत व तणावमुक्त होण्याबरोबरच शरीर लवचिक आणि निरोगी होते.

मग तुमच्या योगामॅटसह तयार व्हा आणि ह्या काही आश्चर्यकारक योग आसनांची मजा घ्या.

नवीन साधकांसाठी दहा सोपी आसने

तुम्ही एकदम नवीन आहात की थोडीफार माहिती आहे की योगामध्ये कुशल आहात, सर्वांसाठी योगाची सुरवात करताना अगोदर थोडे हलके आसन आणि सूक्ष्म व्यायाम करावे असे सुचवले गेले आहे. काही मिनिटांचे सोपी हलकी आसने आपले स्नायूबंध लवचिक बनवतात आणि सूक्ष्म व्यायाम शरीराला तणावमुक्त करतात. त्यानंतर तुम्ही सहज करता येण्यासारख्या काही आसनांचा खालील क्रमाने सराव करू शकता.

  1. पश्चिमोत्तानासन
  2. वीरभद्रासन
  3. मार्जरासन
  4. शिशुआसन
  5. अर्धचक्रासन
  6. हस्तपादासन
  7. उत्कटासन
  8. योगनिद्रा
  9. बद्धकोनासन
  10. कोनासन

१. पश्चिमोत्तानासन

पाठीच्या खालच्या भागात आणि ओटीपोटाला ताण येतो. उदर भागाला व श्रोणि अवयवांना मसाज मिळतो. याशिवाय खांदे बळकट होतात.

२. वीरभद्रासन

Yoga Veerbhadrasna-warrior pose-2-1

शरीराचा समतोल वाढतो, जोम वाढतो. खांद्यामध्ये काही तणाव असेल तर तो कमी होतो. याशिवाय हात,पाय आणि पाठीचा खालचा भाग मजबूत होतो. विशेषतः बैठी जीवनशैली असणाऱ्या लोकांना जास्त फायदेशीर आहे..

३. मार्जरासान

Yoga Cat stretch (Marjariasana)

पचन क्षमता चांगली होते. मन शांत होते. पाठीचा कणा लवचिक होतो. मनगट आणि खांदे बळकट होतात.

४. शिशु आसन

Shishuasana medium

मलावरोध दूर होतो.आणि मज्जा संस्था शांत राहते.

५. अर्ध चक्रासन

Ardha-Chakrasana medium

हात व खांद्याचे स्नायू मजबूत होतात. छातीचा वरचा भाग ताणला जातो.

६. हस्त पादासन

Hastapadasana - inline

उदर,पाठीचा वरचा भाग, मांड्या व पोटऱ्यांच्या स्नायूंना ताण मिळतो.

७. उत्कटासन

पाठीचा खालचा भाग मजबूत होतो. शरीरातील समतोल वाढतो. करारिपणा वाढतो.

८. योगनिद्रा

योगासने केल्याने शरीरावर झालेले परिणाम शोषून घेण्यासाठी आपली मज्जासंस्था  तयार होते. म्हणून नेहमी योगासने केल्यावर योगनिद्रा करून शेवट करावा.

९. बद्धकोनासन

Butterfly pose - baddhakonasana

मलोत्सर्जन चांगले होते. महिलांच्या मासिक पाळीच्या संदर्भातील अडचणी कमी होतात. मांडी आणि कटी प्रदेशातील स्नायूंची लवचिकता वाढते.

१०. कोनासन

Konasana medium

ज्यांना मलावरोधाचा व सायटिकाचा त्रास आहे त्यांना लाभकारी मदत मिळते. पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. हात,पाय आणि उदर भागातील स्नायु मजबूत होतात.

नवीन साधकांसाठी काही टिप्स

१. ही आसने कोण करू शकतो?

ही आसने कुणीही करू शकतो. जर तुम्हाला काही विशिष्ट शारीरिक व्याधी असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि ही आसने योग्य प्रशिक्षकांच्या हाताखाली शिकून घेणे चांगले.

२. ही आसने कुठे करू शकतो?

तुम्ही नवशिके असा की सराईत. सर्वजण योगासने कुठेही घरात किंवा घराबाहेर योगामॅटवर करू शकता. फक्त जागा स्वच्छ, हवेशीर आणि शांत असावी.

३. योगासने केंव्हा करू शकतो?

योगासने दिवसभरात कधीही करू शकता. तथापि जेवणानंतर २-३ तासांचा अवधी असावा. सगळ्यात चांगली वेळ सकाळी रिकाम्या पोटी आहे. सायंकाळी रात्रीचे जेवण घेण्याअगोदर पण करू शकता.

४. लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाची खबरदारी?

लक्षात ठेवा कोणतीही आसन स्थिती अगदी पहिल्यांदा परिपूर्ण होईलच असे नाही. जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढाच ताण शरीराला द्या. कुठल्याही एखाद्या ताण देण्याने जर दुखू लागले तर लगेच थांबा. तुमची ताण सहन करण्याची क्षमता प्रत्येक दिवशी हळूहळू वाढवा

तुमचा अनुभव आणखी चांगला आणि सुरक्षित होण्यासाठी प्रशिक्षित योग शिक्षकांकडे सर्व आसने शिकून घ्या. श्री श्री योगा शिबीर नवीन तसेच काही माहिती असलेल्या अशा सर्व लोकांना चांगला अनुभव देईल.

    Hold On! You’re about to miss…

    The Grand Celebration: ANAND UTSAV 2025 

    Pan-India Happiness Program

    Learn Sudarshan Kriya™| Meet Gurudev Sri Sri Ravi Shankar Live

    Beat Stress | Experience Unlimited Joy

    Fill out the form below to know more:

    *
    *
    *
    *