सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस (मान दुखी) ला योगाद्वारे ठीक करण्याचे उपाय | Yoga for Cervical Spondylosis

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस काय आहे? | What is cervical spondylosis?
सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसची कारणे| Causes of cervical spondylosis
सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसची लक्षणे | Symptoms for cervical spondylosis
सर्वाईकल स्पॉन्डीलोसिससाठी योगाभ्यास |Yoga exercises for cervical spondylosis in hindi
सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस बरा करण्याचे सात सोपे उपाय | 7 Tips to heal cervical spondylosis

 

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस काय आहे?

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस एक असा आजार आहे जो मानेच्या मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या अवस्थेत हाडे आणि कुर्चा यांच्या मध्ये बिघाड झाल्याने मानेमध्ये अत्यंत वेदना होत असतात आणि सर्वसाधारण जीवन जगताना अडचणी निर्माण होतात. हा आजार ५०-६० वयामध्ये निर्माण होतो कारण हाडांच्या घर्षणाची समस्या वयानुसार वाढत जाते. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ओर्थोपेडिक सर्जन्सच्या मतानुसार सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसच्या रुग्णांपैकी ८५% रुग्ण ६० वर्षावरील आहेत. आधुनिक जीवनशैलीमुळे हा आजार युवकांमध्ये देखील आढळतो.

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसची कारणे

उतार वयामध्ये हा आजार होण्याची अन्य कारणे देखील असू शकतात. चुकीच्या स्थिती मध्ये बराच काळ बसणे, कामामुळे मानेवर अति ताण येणे, मान तसेच पाठीच्या कण्याला मार लागणे, स्लिप डिस्क आणि लठ्ठपणा ही या आजाराची इतर कारणे आहेत. अनुवंशिकतेने देखील भावी पिढीला हे होऊ शकते.

 

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिसची लक्षणे

मानेमध्ये अत्याधिक वेदना हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय खांदेदुखी आणि डोकेदुखी ही देखील लक्षणे आहेत.

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिससाठी योगाभ्यास

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिससाठी योगाभ्यास हा नैसर्गिक उपाय आहे. या प्राचीन अभ्यासामुळे आपणास लवचिक शरीर, शांत मन आणि जीवनाप्रती सकारात्मक दृष्टीकोन प्राप्त होतो. श्री श्री योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. एक वेदना रहित जीवन प्राप्त करण्यासाठी खालील योगासनांना आपल्या जीवनाचा हिस्सा बनवूया.

Bhujangasan

या आसनामुळे छाती प्रसरण पावते आणि पाठीच्या कण्याला मजबुती येते. सायटिकाच्या दुखण्यामध्ये देखील या आसनाचा लाभ होतो.

अर्ध मत्स्येन्द्रासन

या आसनामुळे मान आणि खांद्यामध्ये तणाव निर्माण होतो आणि पाठीच्या कण्यामध्ये ऊर्जा निर्माण होते.

 

Dhanurasana

हे आसन मानेमध्ये तणाव निर्माण करते आणि मानेच्या भागांना कार्यरत बनवते.

पाठीचे दुखणे कमी करते.

सेतु बंधासन

मान आणि पाठीच्या कण्यामध्ये तणाव निर्माण करते. डोक्यामध्ये रक्तस्त्राव वाढवते, त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. 

मत्स्यासन

पाठ मजबूत बनते तसेच मान आणि गळ्यामध्ये तणाव निर्माण करते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस बरा करण्याचे सात सोपे उपाय | 7 Tips to heal cervical spondylosis

सर्वाईकल स्पॉन्डीलोसिस विना ऑपरेशन बरा होऊ शकतो. योग्य निदान आणि उपचार, नियमित योग आणि चांगली देखभाल यामुळे बरा होऊ शकतो. फ़िजिओथेरपी आणि वेदनाशामक औषधांचा वापर देखील लाभदायक आहे. तसेच स्वतःच्या बसण्याची ठेवण सुधारल्यामुळे मानेचे दुखणे कमी होते.

  • मानेवर दाब येईल अशी कामे करू नका.
  • जड वस्तू उचलू नका.
  • सलग काम करताना मध्ये मध्ये छोटे ब्रेक घ्या, जेणेकरून मानेला विश्रांती मिळेल.
  • शरीराची दररोजची कॅल्शियामची गरज पूर्ण करा.
  • भरपूर पाणी प्या.
  • फळे आणि हिरव्या भाज्या खा.
  • दररोज व्यायाम करा पण सावधानपणे.

खबरदारी : आपल्या नियमित औषधांमध्ये बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

योगाभ्यास शरीर आणि मनाला लाभदायक असला तरी तो औषधांना पर्याय होऊ शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंगच्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे लाभदायक आहे. काही शारीरिक आणि मानसिक व्याधी असतील तर आपले डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत योगाभ्यास सुरु करणे उचित. डॉक्टर आणि योग प्रशिक्षक यांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग शिबीर आपल्या जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रामध्ये जाऊन शिकू शकता. विविध शिबिरे यांची माहितीसाठी तसेच आपणास काही सूचना करावयाच्या असतील तर info@artoflivingyoga.in या संकेतस्थळावर संपर्क करा.