सुदर्शन क्रिया (Importance of Sudarshan Kriya in Marathi)

सुदर्शन क्रिया शरीर, मन आणि भावना यांच्यामध्ये श्वसनाच्या नैसर्गिक लयीमध्ये सुसंवाद साधून एकत्र आणते. या अद्वितीय श्वसन प्रक्रियेमुळे ताण-तणाव, थकवा, नैराश्य आणि औदासिन्य सारख्या नकारात्मक भावना निघून जाऊन तुम्ही शांत परंतु उत्साही, केंद्रित परंतु निवांत बनता.

श्वसनाद्वारे भावनांना हाताळणे.

युरोपियन वैज्ञानिकांनी संशोधनांती जाणले आहे की श्वास हा मन आणि शरीर यामधील दुवा आहे – मनातील भावनेमुळे श्वासाची भिन्न भिन्न लय निर्माण होते.

 Angry: Your breath comes in short, quick cycles Sad or upset: Your breath comes in long and deep cycles

क्रोधश्वास छोटा आणि गतिमान होतो.

दु:खी किंवा नाराज: दीर्घ आणि खोल श्वास

याच्या उलटे देखील शक्य आहे, एका विशिष्ट लयीमधील श्वसनामुळे अनुकूल भावना देखील निर्माण करू शकतो. म्हणजेच आपल्या भावनांच्या दडपणाखाली राहाण्यापेक्षा विशिष्ट लयीतील श्वसनामुळे त्या भावनांना आपण बदलू शकतो. सुदर्शन क्रियेच्या द्वारे आपण एक उत्तम श्वसनाचा वापर शिकू शकतो. जिच्यामुळे आपण जसे हवे तसे उदा. ताण- तणाव निर्माण करणाऱ्या क्रोध, चिंता, औदासिन्य या नकारात्मक भावनांचा त्याग करून आपले मन सदैव आनंदी, निवांत आणि उत्साही ठेऊ शकतो.

 

 

निरोगी भावनिक जीवनशैलीमुळे आणखी निरोगी, आणखी उपयुक्त जीवन जगू या.

सुदर्शन क्रियेमुळे आपल्या संपूर्ण अस्तित्वाची सफाई होऊन ताण-तणाव निघून जाऊन संतुलित होत असते. संशोधनाती अंती सिद्ध झाले आहे की, सुदर्शन क्रियेच्या निव्वळ पहिल्या सरावानंतरच प्रोल्याक्टीन नावाचे संप्रेरक- जे चांगले जीवन जगण्यासाठी गरजेचा आहे – तो वाढते.

करोडो लोकांनी, समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी सुदर्शन क्रियेच्या संजीवक शक्तीचा अनुभव घेतला आहे. ग्रामीण व्यक्ती, उच्च पदस्थ अधिकारी, गृहिणी, युवावर्ग, कामगारवर्ग, विद्यार्थी वर्ग आणि विविध भूखंडातील करोडो व्यक्ती या जबरदस्त श्वसन प्रक्रियेच्या वेगवेगळ्या आणि भरपूर लाभाचे साक्षीदार आहेत.

भावनिक आरोग्याचा संबंध उत्पादकता, एकाग्रता, शिकाऊ वृत्ती आणि यश आहे, हे सिद्धच आहे. सुदर्शन क्रियेचा लाभ सहाजिकच कुटुंबे, व्यवसाय आणि संस्था यांना होत असून कालपरत्त्वे हा आलेख वाढतच आहे.

सुदर्शन क्रिया शिका

जबरदस्त श्वसन प्रक्रिया जी तुमचे आयुष्य बदलू शकते.