भितीला जिंकण्यासाठीची ३ अव्यक्त गुपीते

एकदा मला प्रेझेंटेशन द्यायचे होते. मी तयार नव्हतो. मला आतमधून कशाची तरी भीती वाटत होती. माझ्या हातापायांना घाम फुटला होता, छातीत धडधड वाढली होती. मी काय वाचतोय यावर लक्ष केंद्रीत करु शकत नव्हतो. मला कळत होतं मी घाबरलो आहे- इतक्या साऱ्या लोकांना सामोरे जायची भीती.

मी लगेचच एका बाजूला शांत जागी गेलो आणि काही मिनिटे ध्यान केले. त्या मोक्याच्या काही क्षणांच्या खोल शांततेनं

  • भीतीचे पत्रकार
  • अपयशाची भीती
  • मृत्यूची भीती.
  • लोकांसमोर बोलायची भीती
  • सततच्या चिंतेमुळे वाटणारी भीती
  • परिक्षेची भीती
  • उडण्याची भीती
  • उंचीची भीती
  • बुडण्याची भीती
  • नकाराची भीती

 

तर जादू झाली, मला आतून खूप शांतता आणि आत्मविश्वास जाणवला. 

माझ्या लक्षात आले की मला नष्ट होण्याची भीती वाटत होती, आणि ती निसर्गतः होती. जितके जास्त मी ध्यान केले, तितके माझ्या लक्षात आले की, हि भीती घालवण्यासाठी माझा माझ्याबद्दलचा दृष्टीकोन वाढवणे हा एकच मार्ग आहे. माझी ओळख माझ्या शरीराची नाही तर जे आतील चैतन्याची आहे. भीतीला हरवायचा दुसरा मार्ग म्हणजे विश्वास. माझ्याबरोबर जे होईल ते माझ्या चांगल्यासाठीच हा विश्वास. भीतीशी सामना करण्यासाठी, हे दोन विचार माझे आधारस्तंभ झाले.

अविश्वास हे सुद्धा भीतीचे कारण आहे. दुराव्यामुळे अनिश्चितता आणि भीती निर्माण होते, आणि हे कुठल्याही कुटुंबाच्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. जेव्हा एका देशातील लोकांचा एकमेकांवर विश्वास नसतो. तेव्हा भीती निर्माण होते. कायद्याची भीती वाटली पाहिजे, पण सततच्या दहशतीमधे समाजात काम करणे अशक्य होते. अधिकाऱ्यांची भीती असो, तुमच्यापेक्षा मोठ्यांची भीती असो, प्रिय व्यक्ती गमावण्याची भीती, नोकरी जाण्याची भीती किंवा छळ होण्याची भीती. सत्य हे आहे की भीतीच्या छायेखाली तुम्ही काहीही काम करु शकत नाही. भीती गरजेची आहे, पण तेव्हाच उपयोगाची आहे जेव्हा ती चिमूटभर मीठाएव्हडी असते. पण, इथे भीतीवर विजय मिळवण्यासाठीची ३ गुपीते सांगितली आहेत, जी आपल्याला कधीच सांगितली गेली नव्हती. भीतीमुक्त आयुष्य जगा.

भीतीवर विजय मिळवण्यासाठीची ३ गुपीते

#१ भूतकाळातील ओझे टाकून द्या, भीती पासून सुटका करून घ्या.

बऱ्याचदा भूतकाळातील घटना अस्वस्थ करतात, आणि वर्तमानकाळातील त्रास बनून राहतात. तुम्हाला कुत्र्यांची भीती वाटते कारण कदाचित भूतकाळात तुम्हाला काही वाईट अनुभव आला असेल. परत तशाच अनुभवातूनच जाणे टाळण्यासाठी, तुम्ही कुत्र्यांच्या जवळ जायला घाबरता.

लहान मुलांना सहसा कशाची भीती वाटत नाही, कारण त्यांच्या मनावर कसलेही छाप नसतात. पण आपण जसे मोठे होत जातो तसे चांगले वाईट अनुभव गोळा करतो, ज्या आपल्या छाप बनत जातात.आणि याच छापांची  भीती बनत जाते. ध्यान मनावरील हे छाप काढून टाकते आणि तुम्हाला आतून मुक्त करते.

"मला अंधारात चालायची भीती वाटायची; असं वाटायचं की मागून कुणीतरी ‌हल्ला करेल. एका मित्राच्या सल्ल्यानुसार, मी नियमित ध्यानाला बसायला सुरुवात केली. याला जवळपास दोन वर्षे झाली आणि आता मला अंधाराची अजिबात भीती वाटत नाही." रुपल राणा सांगते.

#2 चिंतेला सामोरे जा

कसलीतरी चिंता रोजच्या आयुष्यात असतेच. तुम्ही जेव्हा चिंतित होता तेव्हा तुमचे मन बेफाम विचारांच्या भोवऱ्यात अडकते. विचार जसे की "आता काय होणार?" हे कायमच असतात. या विचारांच्या माऱ्याने आपण घाबरुन जातो.

ध्यान तुम्हाला शांत करते आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायची आत्मशक्ती देते.

तुमच्या मध्ये असा आत्मविश्वास निर्माण ‌करते की माझ्याबरोबर जे काही होईल, ते चांगलेच होईल, जरी ते 'काही' तुम्हाला माहिती नसले तरी. 

अज्ञात भविष्याची भीती घालवण्यासाठी आणि मन वर्तमान क्षणात आणण्यासाठी ध्यान मदत करते. वर्तमान ‌क्षणाचे एक रहस्य आहे. सर्व कृती या फक्त वर्तमान क्षणात होत असतात. आणि सर्व कृती या वर्तमान क्षणातच शक्य आहेत, कारण आपण भविष्यात कृती करु शकत नाही. निश्चिंत मनाने आपण भीतीवर विजय मिळवून आवश्यक कृती करु शकतो.

"MBA च्या परिक्षांच्या वेळी ध्यान जणू माझा रक्षणकर्ता होता. आधी, मी जो अभ्यास केलाय तो विसरुन जाईन अशी भीती वाटायची. पण ध्यान करायला शिकल्यानंतर MBA च्या परिक्षा सोप्या जायला लागल्या आणि नापास व्हायची भीती जादू झाल्यासारखी नाहिशी झाली." साहीब सिंग सांगतो.

चिंतेचे अजून एक कारण म्हणजे प्राणशक्तीची कमतरता. ध्यान केल्याने शरीरातील प्राणशक्ती वाढते, ज्याने मन चिंतामुक्त होते. 

#3. 'मी' सोडून द्या

आपला रोजंच लोकांशी संबंध येत असतो. बऱ्याचदा आपण, रोज ज्यांना भेटतो त्यांना प्रभावित करु की नाही, या शर्यतीत आणि भीतीत असतो. लोकांचे आपल्या बद्दल काय मत असेल, याला न घाबरण्यासाठी मेहनत लागते. याला कारण आपला 'अहंकार.'

याउलट जेंव्हा तुम्ही मित्रांसोबत असता तेंव्हा अगदी आरामात आणि सहज असता. सहजता हा अहंकारावरचा उतारा आहे. नियमित ध्यानसाधना तुम्हाला तुमच्या नैसर्गिक स्वभावाकडे आणते. तुम्हाला सहजता देते. भीती म्हणजे प्रेमाचे उलटे रुप आहे. सहसा, जे आवडतं नाही किंवा जे माहिती नाही, त्याची आपल्याला भीती वाटते. आणि, असं काहीतरी आहे जे, या भीतीला परत 

प्रेमामध्ये बदलवू शकते. ते म्हणजे ध्यान. २० मिनिटांची कृती, भीतीची बीजं नष्ट करु शकते.

"माझ्या जवळपासचे लोकं, मित्रमंडळी यामध्ये मी एकटीच शाकाहारी, त्यामुळे हे लोक मला कसे स्विकारतील याची काळजी असायची. माझ्या मित्र-मैत्रिणींना प्रभावित करण्यासाठी मी मांसाहार काढल्याबद्दल खोटं बोलायचे. त्यांना सत्य सांगायचा धीर, नियमित ध्यानाने आला आणि आज मला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे." कामना अरोरा यांनी सांगितले.

निर्भयपणे जगण्यासाठी ध्यानाच्या ६ टिपा

जेंव्हा तुम्हाला भीती किंवा चिंता वाटते, तेंव्हा काही मिनिटांचे ध्यान उपयोगी पडते.

हममम क्रिया - भीतीवरचा ताबडतोब उपयोगी पडणारा उतारा. स्वतःला आठवण करत रहा की जे होते ते चांगल्यासाठीच होते.

नियमित साधना चालू ठेवा. रोज २० मिनिटे ध्यान केल्याने, हळूहळू, तुम्हाला तुमच्या विविध भीतींवर विजय मिळवता येईल.

सकाळची वेळ ही ध्यानासाठी उत्तम आहे परंतु, दिवसभरात कधीही पोट रिकामे असताना तुम्ही ध्यान करु शकता.

ध्यान अधिक चांगले होण्यासाठी शांत जागा निवडा.

भीतीची दुसरी बाजू

थोडीफार भीती असेल तर शांत रहा! जेवणामध्ये जसे मीठ, तसंच आयुष्यात योग्य मार्गावर राहण्यासाठी थोडी भीती आवश्यक आहे. कल्पना करा की, लोकांना जर कशाचीच जर भीती वाटत नव्हती तर काय झाले असते? नापास होण्याची भीती नसती तर विद्यार्थ्यांनी असल्यासच केला नसता. शहाणे वर्मा आणि तुमच्या मध्ये असलेल्या थोड्याशा भीती चा उपयोग ओळख.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या विस्डम टॉक्स वरून प्रेरीत

चिंकी सेन, फॅकल्टी,‌आर्ट आॅफ लिव्हिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या सचदेव यांनी लिहिलेले.