झोपेप्रमाणे उत्साहवर्धक – योगनिद्रा घ्या आणि स्वतःला संपूर्णपणे शिथिल करा (Yoga nidra in Marathi)

या क्रमाक्रमांच्या सूचनांचे पालन करीत योग्य योगनिद्रेद्वारा आपला रोजचा योग सराव संपवा.

‘विनासायास शिथिल होणे’ केवळ याच शब्दात वर्णिल्या जाणारी योगनिद्रा ही तुमच्या योगासंनाचा सराव संपवण्यासाठी फारच महत्वाची आहे. योगासंनामुळे शरीराचे तापमान वाढते आणि योगनिद्रेमुळे ते थंडावते.

योगाच्या सरावानंतर तुम्ही काय करता? – स्वतःला जरा विचारा. खिडकीतून बाहेर पाहता, तुमच्या दिवसभराच्या कामांची योजना बनवता, सरबत प्यायला जाता?

अनेक लोक योगाला व्यायामचा एक प्रकार मानतात पण सत्य तर हे आहे की योगाच्या नियमित सरावाने शरीर आणि मनाची झीज भरून येते. आणि तुमचा हा नियमित सराव आणखी परिणामकारक करण्यासाठी योगनिद्रेने योगाच्या सरावाचा अंत होणे हे आदर्श आहे.

जसे लांबवर गाडी चालवून गेल्यानंतर गाडीचे इंजिन बंद करून त्याला थंड होऊ देणे गरजेचे असते त्याचप्रमाणे योगासने केल्यानंतर आपल्या शरीराला योगनिद्रेद्वारा थंड करणे जरुरीचे आहे. त्यामुळे योगासनांच्या सरावामुळे प्राप्त झालेली ऊर्जा जतन करण्यात आणि दृढ होण्यात मदत होते. योगनिद्रा आपल्या संपूर्ण शरीर-प्रणालीला शिथिल करते आणि प्राणायाम आणि ध्यानासाठी तयार करते. म्हणूनच योगासनांनंतर योगनिद्रेकरिता पुरेसा वेळ देणे महत्वाचे आहे.

चला तर मग योगनिद्रेसाठी तयार होऊ या

योगनिद्रेमध्ये आपण जागृतपणे आपले लक्ष शरीराच्या विविध अवयवांकडे नेतो. यामुळे त्या अवयवात असलेल्या नसांना चालना मिळते आणि याचा फायदा असा होतो की योगासनांचा परिणाम आपल्या शरीर-प्रणालीमध्ये अंतर्भूत होण्यास मदत होते.

योगनिद्रेसाठी क्रमाक्रमाने मार्गदर्शन :

टीप : शरीरातील उष्णता कायम राहण्यासाठी अंगावर पांघरून ओढून घ्या. योगासने केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि अचानक उष्णता खाली जाणे हे शरीरासाठी हितकारक नाही.

योग निद्रेचा तुम्हाला काय फायदा होतो ?

- योगासाने केल्यानंतर शरीराचे तापमान थंड      करते, पूर्ववत सामान्य तापमान करते.

- योगासनांच्या परिणामांना शोषून घेण्यासाठी    चेतासंस्थेला कार्यांवित करते.

- शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर फेकते.

१. शवासन या आसना मध्ये पाठीवर सरळ झोपा.डोळे बंद करा आणि शिथिल व्हा. थोडे खोल श्वास आत घ्या आणि सोडून द्या. हळू, खोल आणि आरामशीर श्वास घ्यायचे..उज्जयी श्वास घायचे नाहीत हे लक्षात ठेवा.

टीप : जर तुम्हाला कोणताही त्रास होत असेल किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना, होत असतील तर तुमचे आसन जरा बरोबर करून घ्या किंवा आसन जास्त आरामदायी होण्यासाठी पायाखाली उशी घेऊन जरा पायांना थोडे वर ठेवा.

२.हळुवारपणे आपले लक्ष आपल्या उजव्या पावलाकडे घेऊन जाण्याने सुरुवात करा. आपल्या पावलाला शिथिल करता करता आपले लक्ष तिथेच काही सेकंद राहू द्या. नंतर आपले लक्ष हळुवारपणे वरच्या दिशेने नेत उजव्या गुडघ्यावर आणा, मग उजवी मांडी आणि उजवे नितंब (पुन्हा काही सेकंद लक्ष तेथेच राहू द्या). आपल्या संपूर्ण उजव्या पायाला जागृतपणे अनुभवा. हीच प्रक्रिया डाव्या पायाबरोबर करा.

३.अशाच प्रकारे आपले लक्ष आपल्या शरीराच्या सर्व भागाकडे न्या: लिंग, उदर, नाभीचा भाग, छाती, उजवा खांदा आणि उजवा हात, त्याच्यानंतर डावा खांदा आणि डावा हात, गळा, चेहरा, डोके आणि डोक्याच्या वर.

४. एक खोल श्वास घ्या आणि शरीरातील संवेदनांबाबत जागृत व्हा आणि या अवस्थेत काही मिनिटे आराम करा.

५. आता आपले शरीर आणि आसपासचा परिसर याबाबत जागृत व्हा, आपल्या उजव्या कुशीवर वळा आणि काही मिनिटे तसेच पडून रहा.

६. तुम्हाला हवा असेल  तेवढा वेळ घ्या, सावकाशपणे उठून बसू शकता, आणि जेंव्हा उघडावेसे वाटतील तेव्हा हळुवारपणे आणि सावकाश आपले डोळे उघडा.

त्वरित योगिक शिथिलता येण्याकरिता सूक्ष्म योगाचासुद्धा सराव करतात.

योगनिद्रा ही अशाप्रकारे एक आनंददायक, विनासायास पद्धत आहे तुमचा योगाचा सराव समाप्त करण्याची. मुक्त व्हा, शिथिल व्हा आणि येणाऱ्या अनुभवाची मजा लुटा.

(ज्येष्ठ योग शिक्षक दिनेश काशीकर आणि श्रीराम सर्वोथम यांच्या माहितीवर आधारित)

Interested in yoga classes?