क्रोध आपल्यावर काबू करण्यापूर्वीच क्रोधाला काबूत ठेवा (How to control anger in Marathi)

क्रमशः  क्रोध कमी करण्यासाठी सूचना

क्रोध कमी करण्यासाठी आणखी काही सूचना, खालीलप्रमाणे.

धारणांपासून मन स्वच्छ करणे

ताणतणाव उच्छवास करा

सुदर्शन क्रिया अशी प्रभावी श्वसन प्रक्रिया आहे, जी शरीरामध्ये आणि मनामध्ये 'धारणां’च्या स्वरुपात गोळा झालेला ताणतणाव मुक्त करण्यास मदत करते. ती आपली संपूर्ण शरीर व्यवस्था शुद्ध आणि सुसंगत करते.

"पूर्वी माझ्या रागाचा पारा नेहमी चढलेला असायचा म्हणून माझे मित्र माझ्या संगतीत राहणे टाळायचे. सुदर्शन क्रियेच्या सततच्या सरावामुळे माझा क्रोध खरोखरच कमी झाला आहे आणि आता माझे मित्र सांगतात की ते आता माझ्या सोबत आणखी मोकळेपणाने राहू शकतात" -  आदित्य सिंह तनेजा

दृढ शांती

सहज समाधी ध्यानामध्ये मंत्राच्या सहाय्याने ध्यान करणाऱ्यांना गहन शांतीचा अनुभव मिळतो. आपल्या चेतनेमध्ये साठलेले धारणांचे मळभ स्वच्छ करण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरतो. सहज समाधी ध्यानात सरावामुळे जबरदस्त स्पष्ट आकलनशक्ती आणि निश्चित दृढ शांती देते.

ज्ञान हे तुमच्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनू द्या.

क्रोधावर नियंत्रण मिळवा.

दरवेळी क्रोध आल्यावर कुंपणामध्ये खिळे ठोकणाऱ्या मुलाची कथा आपणास ऐकीवात आहे. अर्थात आपणास तसे करण्याची गरज नाही. परंतु, जेव्हा तुमच्यामध्ये क्रोध जागृत होऊ लागेल तेव्हा तुमच्या मध्ये उठणाऱ्या भावनांच्या प्रति सजग व्हा, जागृत व्हा ज्या क्षणी तुम्ही या बाबतीत सजग होता, मनामध्ये एक बदल घडतो आणि क्रोध निवळतो. तथापि, आपले मन आणि त्यामध्ये उठणाऱ्या भावनांकडे साक्षीभावाने पहाण्याची क्षमता प्राप्त होण्यासाठी ध्यानाचा सराव आवश्यक आहे.

कार्य-कुशलता = शांत, मन

"सर्वोत्कृष्टतेचा आग्रह असल्यामुळे क्रोध जागवतो" - श्री. श्री.

म्हणजेच जेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत तेव्हा तुम्ही रागावता परंतु बहुतांशी वेळी तुमच्या क्रोधाचा शेवट पश्चाताप किंवा दु:खामध्येच होता, होय ना? हा पश्चाताप, खेद मनामध्ये बैचेनी, अशांती निर्माण करतो.

परिस्थिती स्विकारणे हाच त्याच्यावर रामबाण उपाय आहे. तुम्ही रागावले आहात, ठीक आहे, हे जाणुन घ्या, रागाबाबतचा हा स्विकार देखील तुम्हाला शांत बनवेल, शांत मन तुम्हाला रचनात्मक विचार करण्याची आणि आवश्यक कृती करण्याची क्षमता देऊ शकते, हे जाणून घ्या की, सर्वोत्कृष्टता शांत मनानेचे प्राप्त होऊ शकते.

जेव्हा मन आनंदी आणि समाधानी असेल, शांत असेल, ध्यानस्थ स्थिती मध्ये असेल तेव्हा राग मूळापासून नाहीसा हाईल. हे जाणून घ्या की, झालेली चूक क्रोधामुळे दुरुस्त होऊ शकणार नाही तर या जाणिवेमुळे ती दुरुस्ती शक्य होऊ शकते.

तुम्ही सतत क्रोधीत होत असाल तर:

  • आहारावर लक्ष द्या, तंतुमय हिरव्या भाज्या, फळे आणि  शाकाहारी, आरोग्यदायी आहार घ्या.
  • सहा ते आठ तासांची विश्रांती होते आहे, याची खात्री करुन घ्या.
  • दररोज ध्यान करा. तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी ध्यान करु शकता. शांत जागी ध्यान केल्याने तुमच्या मनाचे भटकणे कमी होऊन खोल ध्यानाची अनुभुती मिळेल. आपल्या स्वकीयांसोबत ध्यान करु शकता. सामुहिक ध्यानाचा परिणाम द्विगुणीत होतो.

रागवण्याऐवजी राग दाखवा

मनाजोगी कामे होण्यासाठी काही वेळा रागवावे लागेल, असे काही वेळा वाटू शकेल. उदा. आपण पालक असाल तर काही वेळा ठाम राहून राग दाखवत असाल. परंतु जाणून घ्या की, राग दाखवणे हे रागावण्यापेक्षा वेगळे आहे. जेव्हा राग दाखवत असता तेव्हा तुम्ही रागावल्याचा अभिनय करत असता परंतु मनामध्ये तुम्ही शांत असता. ध्यानाच्या सरावामुळे रागावण्याऐवजी तुम्हाला राग दाखवणे (गरज असेल तेथे) शक्य होते.

"सततच्या ध्यान सरावामुळे माझे मन कोणत्याही परिस्थिती मध्ये शांत ठेवण्यास मला मदत होते. म्हणून आता आवश्यक त्या प्रसंगी मी क्रोधाग्नीत जळून न जाता आतून शांत राहून राग दाखवु शकते." - दिप्ती सचदेव

क्रोध ‘महाग’ करा - हास्य ‘स्वस्त’ करा.

सतत हसत रहा - तुम्ही हसण्यात मश्गुल असता तेव्हा तुम्ही रागावू शकत नाही. क्वचित रागावणारी आणि सतत हसत मुख व्यक्ती असण्याबद्दल अभिमान बाळगा.

स्वत:च्या वेगळेपणाचा त्याग करा.

आत्ता या क्षणी घडणाऱ्या घटनांबाबतीत तुम्ही रागावता, श्री श्री म्हणतात, "कोणतीही भावना पाण्यावरील तरंगा एवढीच राहिली पाहिजे." हेच तुमच्या क्रोधालादेखील लागू होते. क्रोध निर्माण होईल आणि निघून जाईल. तथापि तुमच्या आध्यात्मिक साधनेमुळे क्रोध उठणाऱ्या पुनरावृत्तीमध्ये लक्षणीय घट होईल. ज्या घटना पूर्वी तुम्हाला सतावत असत, त्यांचा आता तुम्हाला त्रास देखील होत नाही हे तुम्हाला जाणवेल.

क्रोधाचे रुपांतर द्वेषामध्ये होऊ देऊ नका. असे झाल्यास तुमच्या जीवनातील आनंद आणि प्रेम निघून जाईल. आनंदी असणे ही चैन नाही तर ती एक गरज आहे. ध्यानामार्फत स्वत:शी एकरूप होणे हीच आनंदी होण्याची गुरुकिल्ली आहे.

श्री श्री रविशंकर यांच्या ज्ञान चर्चेमधून प्रेरीत,

ध्यान तज्ञ भारती हरिष यांच्या सहयोगामुळे