श्री श्री शांती प्रस्थापित करू शकतील अशी लॅटिन अमेरिकेस आशा I Latin America looks to Sri Sri for peace

इंडिया
19th of डिसेंबर 2016

मेक्सिको येथील तुरुंग, ब्राझील मधील पोलीस, अंमली पदार्थांचे व्यसनी, सिनेटर आणि व्यावसायिक यांना शांतीचा अनुभव

बेंगळूरू, डिसेंबर १९ :

आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी दक्षिण व मध्य अमेरिकेतील, जगातील सर्वात जास्त हिंसक अशा लॅटिन अमेरिकेतील आठ देशांमधील १३ शहरांना, शांती प्रस्थापित करण्याच्या कार्यास गती येण्यासाठी भेटी दिल्या. जगातील सर्वश्रेष्ठ वर्तमानपत्रांपैकी, पॅरिसमधील ले मोंडे यांनी, “ जेथे कुणालाही आशा वाटत नव्हती अशा ठिकाणी ” असे वर्णन केले आहे.

ग्वाटेमाला येथील ‘चेंज दि रोड टू पीस’ या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून आलेले आमंत्रण ते मीरा फ्लोर लॉक या पनामा कालव्याचे अगदी क्वचितच उघडले जाणारे दरवाजे उघडण्याचा सन्मान मिळणाऱ्या श्री श्रीं ना, सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी 'लोकांच्या मनावर प्रभाव पाडू शकतील असा नेता' असल्याची ओळख प्राप्त झाली.  

श्री श्री आणि पोप या दोघांनाच पनामा कालवा उघडण्याचा मान दिला गेला आहे. पनामा प्रोव्हिन्स चे राज्यपाल यांनी ‘मान्यवर अतिथी’ म्हणून त्यांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे रेसिफे, ब्राझील येथील सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

ग्वाटेमाला या मेक्सिकोमधील सर्वात जास्त हिंसक राज्यात अतिशय भव्य अशा सभेत राज्यपाल हेक्टर आस्तुदुलो यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी त्यांना ‘शांतीदूत’ अशी मान्यता देऊन त्यांचा सन्मान केला. हा सन्मान आतापर्यंत फक्त तीन जणांना दिला गेला आहे.

भारत आणि संघर्षग्रस्त इराक आणि सिरीयासह संपूर्ण जगात ज्यांच्या ‘वेलनेस शिबिरांनी’ नाव कमावले आहे अशा बऱ्याच देशांमध्ये, तेथील भारतीय राजदूतांनी त्यांचे स्वागत केले. 

मेक्सिकोमध्ये मादक पदार्थांमुळे होणारी युद्धे आणि टोळी युद्धे यामुळे सर्वदूर पसरलेली हिंसा यावर श्री श्री रविशंकर यांनी सर्वंकष असे मार्ग सुचवले. मेक्सिकोमधील सँटा मारता अॅकातीतला आणि रेक्लुसोरिओ व्हारोनील नोर्ते या दोन सर्वात मोठ्या आणि अट्टल गुन्हेगार आणि मादक पदार्थांचे अधिपती यांनी भरलेल्या तुरुंगाना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कैदी पुनर्वसनाच्या कार्यक्रमांमुळे हिंसेचे प्रमाण अतिशय कमी झालेल्या व्यसनमुक्ती केंद्रांनाही भेट दिली.

गुएरेर्रा येथील मादक पदार्थांचे उत्पादन आणि तस्करी करणाऱ्या, कारखानदारांमधील युद्ध, ज्यात दररोज सरासरी सहा जणांची हत्या होते, हे सर्व रोखण्यासाठी त्यांना मदत करण्याची राज्यपालांनी विनंती केली.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये ' अधिकृत मान्यता : आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक असून मानवतावादी नेते,अध्यात्मिक गुरु आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ते शांतिदूत आहेत,' असा उल्लेख आहे.

दक्षिण अमेरिकेच्या या २० दिवसांच्या शांती मोहिमेतील ८ देशांच्या दौऱ्यात श्री श्री रविशंकर यांनी कोलंबिया, मेक्सिको, एल साल्व्हाडोर, ग्वाटेमाला, निकारागुआ, पनामा, कोस्ता रिका आणि ब्राझील या देशांना भेटी दिल्या. सरकारी जेष्ठ नेते, संसद सदस्य, उच्च पदावरील अधिकारी, व्यावसायिक, शिक्षण तज्ञ, आणि सामान्य जनता या सर्वांनी एक शांतीदूत म्हणून सर्व ठिकाणी त्यांचे सन्मानाने स्वागत केले आणि शांतीचा सर्वंकष मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शवली. 

 

सॅन साल्व्हाडोर, निकारागुआ, ग्वाटेमाला, कोस्टारिका, पनामा, ब्राझील येथील सभागृहे सभेच्या वेळी पूर्णपणे भरलेली होती. 

 

या दौऱ्यातील काही वैशिष्ठ्ये

 

  • युद्धग्रस्त कोलंबिया येथे श्री श्री रविशंकर मुख्य वक्ते होते. त्यांच्या सोबत नोबेल शांती पुरस्कार  विजेते आणि कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मन्युअल सांतोस हेही होते. गुरुदेवांनी कोलंबियाच्या लोकसभेच्या, बोलीवार चौकात जनतेकडून ध्यानही करवून घेतले. तेथे अतार्सियापेलोदास हा लॅटिन अमेरिकन बँड पथकाने संस्कृत मध्ये मंत्र पठणात व ध्यान धारणेत भाग घेतला.
  • कोस्ता रिका येथे श्री श्री रविशंकर यांनी अध्यक्ष लुईस गुईलेर्मो यांच्यासह, देशातील शांती आणि अहिंसा या साठी कार्य करण्याच्या एका करारावर स्वाक्षरी केली.

       पनामा येथे त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष इसाबेल दे सेंट- मालो यांच्या बरोबर शांती प्रस्थापित करणे आणि हिंसाचार        थांबवणे याविषयी चर्चा केली.

  • ब्राझील येथे श्री श्री रविशंकर यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष, मायकेल तेमार ; शिक्षण मंत्री, मेंडोंका फिलो आणि स्वास्थ्य मंत्री आणि मानवी हक्क विभागाचे अध्यक्ष पेद्रे जोआओ या नेत्याशी चर्चा केली. श्री श्रींनी ब्राझील मधील बाहिया च्या सरकार सोबत एक करारही केला ज्यात त्यांच्या पोलीस विभागाच्या सर्व ३२,००० व्यक्तींना आर्ट ऑफ लिव्हिंग चे शिबीर करवायचे आहे. 
  • सॅन सॅल्व्हाडोर मध्ये, त्यांनी केलेल्या शांती कार्य आणि मानवतावादी कार्यासाठी त्यांचा सन्मान केला.
  • लॅटिन अमेरिकेतील तीन आठवड्यांच्या दौऱ्याचा समारोप, रिओ दी जानेरिओ येथील १५,००० लोकांच्या 

       एकत्रित सत्संग व श्री श्रींसोबतच्या ध्यानाच्या कार्यक्रमाने झाला.

  • २९ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या काळात श्री श्रींनी अनेक शहरात स्वयंसेवी प्रकल्प सुरु केले. ज्यात त्यांनी लोकांना रोज एक तास समाज सेवेसाठी देण्याचे आवाहन केले. या मोहिमे इतर प्रकल्पांसह अंतर्गत महिला सुरक्षा, भ्रष्टाचार विरोधी लढा तसेच गुन्हेगारी रोखणे इत्यादींचा समावेश आहे.

       दक्षिण अमेरिकेत आर्ट ऑफ लिव्हिंग गेली १८ वर्षे कार्यरत आहे.श्रीश्रींनी त्यांच्या या भेटीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्यक्रम तुरुंग अधिकारी व शाळा यांच्यासाठी घेण्याचे त्याचप्रमाणे झोपडपट्टीतील मुलांचे पुनर्वसन आणि व्यसनमुक्ती शिबिरे घेण्याचे करार केले.