उदात्त हेतूसाठी अशासकीय संस्था एकत्र (NGO's for a common cause in Marathi)

कोईमतूर : रोटरी क्लब सभासदांचे ‘स्वयंसेवक-संमेलन’

गुरुचरण आंब्रेश्वर : ०९५६६३२८६०४

कोईमतूर, तामिळनाडू : तामिळनाडू वाय.एल.टी.पी. ने रोटरी क्लबशी एकत्र येऊन ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ अभियान सुरु केले आहे ज्यामध्ये दोघांच्या संयुक्त विद्यमाने सेवा प्रकल्प आणि निधी उभारणी अभियान सुरु करतील. ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ या रोटरी क्लब, कोईमतूरच्या पुढाकारामुळे विविध अशासकीय संस्था एकत्र येण्याचा पाया घातला गेला.

रोटरी क्लबद्वारा तामिळनाडूमध्ये ग्रामीण भागात वाय.एल.टी.पी.ची व्यवस्थित अंमलबजावणी करणेसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कोईमतूरच्या रामकृष्ण हॉल येथे ४ व ५ ऑक्टोबरला सर्वसामान्यांना त्यांच्या यशस्वी अभियानाची माहिती देण्यासाठी केंद्र उभारले होते. उत्कृष्टपणे तयार केलेली माहितीपत्रके आणि आकर्षक सादरीकरण यामुळे पर्यटक त्यांच्या केंद्राकडे आकर्षिले जात होते.

या कार्यक्रमामध्ये आयुर्वेदिक उत्पादनांचे प्रदर्शन आणि सेंद्रीय शेतीबाबतची माहिती मिळत असल्याने या केंद्राकडे गर्दी खेचली जात होती. बहुतांशी पर्यटकांना देशी गाय आणि सौर उत्पादनांची माहिती हवी होती. तीन युवाचार्य आणि दोन स्वयंसेवकांनी या केंद्रावर सादरीकरण केले.