Intuition-Program-Banner-3-scaled.jpg

इन्ट्युशन प्रोसेस (प्रज्ञा योग) शिका

लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी जगातील पहिल्या क्रमांकाचा प्रोग्राम - इंट्युशन प्रोसेस

तुमच्या मुलाला स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्यात तरबेज करा!
अंतःप्रज्ञाक्षेत्रातील चाळीस पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव पाठीशी!!

इंट्युशन प्रोसेस

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी तयार केलेला एक अनुभवसिद्ध कार्यक्रम. मुलांना आणि किशोरांना त्यांच्या अंतःप्रज्ञेचा वापर करुन, बुद्धीचा विकास करतो. प्रगतीतील अडथळे पार करुन यशस्वी होण्यासाठी विश्वास निर्माण करतो. केवळ २१ तासांचा कार्यक्रम, ३ शनिवार रविवार, तुमच्या सोयीच्या वेळेनुसार उपलब्ध आहे.

पालक आणि मुले दोघांसाठी फायदेशीर

आनंदी मुले –तणावमुक्त पालक

icon

डिजिटल आकर्षणा पासून दूर ठेवण्यासाठी उत्तम

एकाग्रता वाढते, लक्षपूर्वक ऐकण्याची सवय लागते.

icon

सहाव्या इंद्रियाला (अंतःप्रज्ञेला) संधी द्या

योग्य वेळी योग्य विचार येणे, चांगले निर्णय घेणे, ही अंतःप्रज्ञा आहे. तुमच्या मुलाला ही शक्ती मिळते.

icon

परीक्षेची भीती आणि चिंताग्रस्ततेवर मात करा

कितीही दबाव असला तरी चिंता न करता कामगिरी करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करा. सर्जनशीलता वाढवा.

icon

घरी आणि शाळेत एकमेकातील संबंधात सुधारणा

वादविवाद आणि मारामाऱ्या कमी होऊन एकमेकात सुसंवाद साधा.

icon

भविष्यात यशस्वी होण्यासाठी सज्ज व्हा

सर्जनशीलता, चिकित्सकपणे विचार करणे आणि भावनिक बुद्धिमत्ता यात वाढ होते. यामुळे तुमची मुले चाकोरीबाहेरचा विचार करण्यास शिकतात व भविष्यात यशस्वी व्हायला सिद्ध होतात.

icon

वैयक्तिक लक्ष

तुमच्या मुलाला शिकवलेल्या तंत्रांचा सराव करण्यास मदत करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षकांकडून सराव सत्रे.

icon

आळस आणि अस्वस्थता सोडून द्या

तुमच्या मुलाला प्रत्यक्ष कृती करण्यास आणि निर्धाराने पुढे जाण्यास प्रोत्साहित करा. त्याची आंतरिक क्षमता पूर्णतः सक्रिय होऊ द्या.

icon

स्वतःबद्दल शंका घेणे सोडा, आत्मविश्वास वाढवा

“मी करु शकत नाही” हे सोडून “मी करु शकतो” याकडे प्रवास.

मुले दैनंदिन दिनचर्येत प्रभुत्व मिळवतात त्यामुळे त्यांना पूर्वीपेक्षा १० पटीने कमी काळात अपेक्षित फळ मिळू शकते.

 

आर्ट ऑफ लिव्हिंगची इंट्युशन प्रोसेस तुमच्या मुलाला त्याच्या अंतःप्रज्ञेच्या शक्तीद्वारे त्यांची पूर्ण क्षमता उलगडण्यास मदत करते. वैदिक ज्ञानावर आधारित नैसर्गिक, सध्या सोप्या तंत्रांच्या मार्गदर्शनाने, तुमचे मूल आत्मविश्वासाने, स्पष्टतेने आणि लवचिकतेने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास शिकते.

मुलांनी जसे बनायला हवे तसे बनण्यास हा प्रोग्राम सक्षम करतो - बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण, भावनिकदृष्ट्या संतुलित आणि सामाजिकदृष्ट्या विश्वासार्ह. त्याच्यातील जेता बनण्याच्या वृत्तीचे संगोपन होऊन, आत्मविश्वास निर्माण होईल, तो सक्षम निर्णय घेईल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करेल.

याचे फलित काय? तर सतत बदलणाऱ्या या वेगवान जगात उज्ज्वल भविष्यासाठी तयार असलेला एक अंतर्ज्ञानी तरुण नेता तयार होईल.

कार्यक्रमात काय आहे

 

इंट्युशन प्रोसेस ज्युनिअर (वयोगट ५-८ वर्ष)

कालावधी: १० दिवस

शिबिराचे वेळापत्रक

दिवसस्वरूपकालावधी
आठवडा १: शुक्र-रविव्यक्तीशः तास/दिवस
आठवडा १: सोम-रविऑनलाईन (झूम)१५ मिनिटे/दिवस
आठवडा २: रविवारव्यक्तीशः तास

शिबिराचा तपशील

इंट्युशन म्हणजे योग्य क्षणी योग्य विचार करणे

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

इंट्युशन प्रोसेस किड्स (वयोगट ८ ते १३ वर्षे)

इंट्युशन प्रोसेस टीन्स (वयोगट १३ ते १८ वर्षे)

कालावधी: १७ दिवस

शिबिराचे वेळापत्रक

दिवसस्वरूपकालावधी
आठवडा १: शुक्र-रविव्यक्तीशः तास/दिवस
आठवडा १: सोम-गुरुऑनलाईन (झूम)१५ मिनिटे/दिवस (किड्स),
३० मिनिटे/दिवस (टीन्स)
आठवडा २: शुक्र-रविव्यक्तीशः तास/दिवस
आठवडा २: सोम-शनिऑनलाईन (झूम)३० मिनिटे/दिवस
आठवडा 3: रविवार  व्यक्तीशः तास/दिवस

शिबिराचा तपशील

इंट्युशन प्रोसेसवरील संशोधन

icon

२२%

किशोरांच्या
अचूकतेमध्ये वाढ

icon

२९%

मानसिक
आरोग्यामध्ये वाढ

icon

६९%

भावनिक
समस्यांमध्ये घट

icon

६७%

अतिक्रियाशीलतेत
घट होते

icon

५०%

समवयस्कांच्या
समस्यांमध्ये घट

icon

७८%

वर्तणूक
समस्यांमध्ये घट

संस्थापक

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.
आणखी जाणून घ्या

मला माझ्या मुलाच्या नावाची नोंदणी करायची आहे पण...

इंट्युशन काय आहे?

इंट्युशन म्हणजे तर्क किंवा तार्किक विश्लेषणावर अवलंबून न राहता काहीतरी समजून घेण्याची किंवा जाणून घेण्याची क्षमता. इंट्युशन आपल्या सर्वांमध्ये नैसर्गिकरित्या असते, परंतु मनाच्या या पैलूचे पालनपोषण आणि विकास करण्याकडे फारसे लक्ष दिल्या जात नाही..

इंट्युशन विकसित करण्याचे काय फायदे आहेत?

मजबूत इंट्युशन क्षमता जीवनाच्या सर्व क्षेत्रात यश मिळवण्याचा मार्ग मोकळा करतात.

  • शिकण्याची क्षमता सुधारते
  • अधिक चांगले निर्णय घेणे
  • वाढलेली सर्जनशीलता आणि नाविन्यता
  • समस्या सोडवण्याच्या कौशल्यात सुधारणा
  • उत्तम दूरदृष्टी
  • मजबूत आत्मविश्वास
  • उत्तम आंतरवैयक्तिक कौशल्ये
  • अज्ञाताची भीती कमी

तुम्ही हे शिबिर फक्त मुलांसाठी आणि किशोरांसाठी का चालवता?

आपण सर्वजण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे जाणण्याची नैसर्गिक अंतःप्रज्ञेची क्षमता घेऊन जन्माला आलो आहोत. ही क्षमता मुलांमध्ये विशेषतः दिसून येते. याचे कारण असे की त्यांचे मन अजूनही ताजे, कमी पछाडलेले आणि निसर्गाशी अधिक सुसंगत आहे.

हे शिबिर ऑनलाईन आहे की व्यक्तीशः?

अंतर्ज्ञान प्रक्रिया छोट्या मुलांसाठी, बालकांसाठी आणि किशोरांसाठी हे संकरित शिबिर आहे ज्यात ऑनलाईन आणि वैयक्तिक सत्रे हे दोन्ही सामील आहेत.

इंट्युशन प्रोसेस छोट्या मुलांसाठी या  शिबिरात चार दिवस दररोज दोन तासांच्या व्यक्तीशः सत्रांचा समावेश असतो. यात प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सात ऑनलाईन सत्रांना (सोमवार ते शनिवार) देखील समाविष्ट केले आहे.

इंट्युशन प्रोसेस बालके आणि किशोरवयीन या शिबिरामध्ये ७ दिवस व्यक्तीशः सत्रे आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली १० दिवसांची ऑनलाईन सत्रे असतात

मुलांची इंट्युशन वाढवण्यासाठी तुम्ही कोणती तंत्रे शिकवता?

या कार्यक्रमात मुलांना खालील गोष्टींची ओळख करून दिली जाते

  • मन शिथिल करण्याची आणि इंट्युशन मिळविण्यात मदत करण्यासाठी लागणारी योगिक तंत्रे.
  • वयानुसार श्वसनाची तंत्रे.
  • मार्गदर्शित ध्यान आणि विश्रांतीची तंत्रे.
  • इंट्युशन सुधारण्यासाठी खेळ आणि क्रीयाकलापातून मौजमजेत शिक्षण.
  • घरी सराव करावयाच्या बाबतीत सूचना.

मुलाची अंतःप्रज्ञेची क्षमता विकसित होण्यासाठी किती वेळ लागतो?

कार्यक्रमाचे फायदे सर्वांसाठी आहेत. कार्यक्रमाच्या शिकवणींचे पालन केल्यावर मुले आणि पालक त्यांचे अनुभव सांगत असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

प्रत्येक मूल अद्वितीय आहे. इंट्युशन क्षमता निर्माण करण्यासाठी लागणारा वेळ हा प्रत्येकाचा वेगळा असतो. मुलाच्या स्वतःच्या प्रयत्नांवर आणि दैनंदिन सरावावर प्रगती अवलंबून असते.

हा कार्यक्रम मुलाला दररोज १५ ते २५ मिनिटे घरगुती सराव करण्यास प्रोत्साहित करतो. नियमित सराव केल्याने मुले आणि पालकांनी त्यांच्या इंट्युशन क्षमतांमध्ये सुधारणा नोंदवली आहे. हा महत्त्वाचा शोध मुलांनी अनुभवलेल्या प्रगतीवर आधारित आहे.

हे शिबिर किती काळाचे आणि कोणत्या वयोगटासाठी आहे?

इंट्युशन प्रोसेस छोट्या बालकांसाठी (५ ते ७ वर्षे)

१०-दिवसीय कार्यक्रम - व्यक्तीशः सत्र प्रत्येकी २ तासांसाठी ४ दिवस, ऑनलाईन सत्र प्रत्येकी १५ मिनिटांसाठी ६ दिवस

इंट्युशन प्रोसेस किड्स (८+ ते १३ वर्षे)

१७-दिवसीय कार्यक्रम - व्यक्तीशः सत्र प्रत्येकी २ तासांसाठी ७ दिवस, ऑनलाईन सत्र प्रत्येकी १५ मिनिटांसाठी १० दिवस.

इंट्युशन प्रोसेस टीन्स ( १४  ते १८ वर्षे)

१७-दिवसीय कार्यक्रम - व्यक्तीशः सत्र प्रत्येकी २ तासांसाठी ७ दिवस, ऑनलाईन सत्र प्रत्येकी ३० मिनिटांसाठी १० दिवस.