ग्रामीण विकास

सौर ऊर्जा आणणे, सांडपाण्याची सोय करणे, स्थानिक प्रशासन मजबूत करणे आणि ग्रामीण विकासासाठी बरेच काही करता येण्यासारखे आहे.

देणगी द्या

icon

आव्हाने

स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव, अपुरी वीज, पायाभूत शैक्षणिक सुविधांचा आभाव

icon

रणनीती

पायाभूत सुविधांचा विकास, समुदाय उभारणी, स्थानिक तरुणांना सक्षम करणे

icon

उपलब्धी

संपूर्ण महाराष्ट्रात जल पुनर्भरण खड्डे खोदण्यात आले, लाइट अ होम प्रोजेक्ट राबविण्यात आले

आढावा

ग्रामीण भारत पुकारत आहे! केवळ सांडपाण्याची सोय, स्वच्छ पिण्याचे पाणी, वीज, आर्थिक विकास इ. मुलभूत गरजा आणि इतर गोष्टींसाठीच नाही तर दीर्घकालीन बदलांसाठी. शौचालय बांधून जर ते कोणी वापरणार नसेल तर त्याला काही अर्थ नाही. गावातील कोणालाही जर सौर वीज वापरायला येत नसेल तर सौर केंद्र चालवण्यात काहीच अर्थ नाही. गावातील लोकांच्या समस्यांचा विचार न करता आदर्श गाव योजना राबवण्यात काहीच अर्थ नाही.

चांगली जीवनशैली आणि नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ गावातून शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना, ग्रामीण भागातील अडचणींकडे लक्ष देण्याची तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे. आणि त्यावर मात करणेही आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही असे मानतो की ग्रामीण जनतेचा सक्रीय सहभाग हा यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे, आम्ही जेव्हा शौचालय बांधतो तेव्हा जनतेला ते वापरण्यासाठी उद्युक्त करतो. जेव्हा आम्ही सौर ऊर्जा केंद्र उभारतो तेव्हा सौर उर्जेची उपकरणे बसवण्यासाठी आणि चालवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देतो. जेव्हा आम्ही आदर्श गावांबद्दल बोलत असतो तेव्हा आम्ही गावातील अडचणी समजून घेतो आणि तेथील स्थानिक जनतेतील जे कोणी या समस्या सर्वात जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात, त्याना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तेजन देतो.

थोडक्यात, आम्ही समाज प्रबोधन आणि मुलभूत सुविधांचा विकास दोन्ही एकत्रच करतो. हा मुख्य पाया मानून आम्ही खालीलप्रमाणे काम करत आहोत:

  • अतिशय दुर्गम गावांमध्ये सौर उर्जेचा पुरवठा करणे.
  • ग्रामीण युवक आणि स्त्रियांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देणे.
  • शौचालये बांधणे आणि जनतेला ते वापरण्यासाठी प्रवृत्त करणे.
  • स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय.
  • स्थानिक प्रशासन मजबूत करणे.
  • गावांना स्वयंपूर्ण बनवणे.

जेव्हा तळागाळातील लोकांना स्वतःबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल, त्यांच्या परंपरा आणि भाषेबद्दल आत्मविश्वास वाटू लागेल तेव्हा भारत खऱ्या अर्थाने सशक्त होईल.

- गुरुदेव श्री श्री रवि शंकर

योजना

ग्रामीण विकास उपक्रमात एकच वेळी ३ स्तरांवर काम केले जाते.

  • पायाभूत सुविधांचा विकास:

    सामाजिक सुविधा जसे कला कौशल्य केंद्रे किंवा चांगल्या प्रशासनासाठी माहिती विकास केंद्रे. आम्ही स्थानिक लोकांच्या गरजांना प्राधान्य देतो.

  • स्थानिक युवकांना समस्या सोडवण्याच्या दृष्टीने तयार करतो:

    कर्म योग (आधीचा वाय एल टी पी) प्रोग्राम द्वारे व्यक्तीमत्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास केला जातो. त्यामुळे त्यांना आपल्या समाजासाठी लागणारे सेवा उपक्रम सुरु करणे, राबवणे याच्यासाठी लागणारे नेतृत्व, कौशल्य, प्रेरणा आणि क्षमता येते. आम्ही या युवा नेत्यांना उपक्रम राबवण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत करतो.

  • सामाजिक एकात्मकतेसाठी उपाययोजना:

आर्ट ऑफ लिव्हिंग प्रोग्रामद्वारे आम्ही जनसमुदायाला एकत्र आणतो. सामाजिक एकात्मकतेसाठी वेगवेगळ्या योजनांद्वारे आम्ही सर्व जनतेला गावाच्या विकासासाठी सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करतो.

प्रभाव

icon

७०,००० गावे

भारतात

icon

१,००,००० आरोग्य शिबिरे

आयोजित

icon

४,७५,००० पेक्षा जास्त तरुण

ग्रामीण भारतातील ५७४ जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण दिले

icon

३० लाख शेतकरी

नैसर्गिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण दिले

icon

४,७५,००० पेक्षा जास्त लोक प्रशिक्षित

१४ वर्षांपासून विविध व्यावसायिक कौशल्यांमध्ये

icon

११० ग्रामपंचायत मॉडल

विकसित केले जात आहे

icon

१,११,००० पेक्षा जास्त महिला प्रशिक्षित

व्यावसायिक कौशल्यांमध्ये

icon

३,८१९ घरे

६२,००० पेक्षा जास्त शौचालये आणि १,००० बायोगॅस संयंत्रे बांधली

icon

१,००,००० पेक्षा जास्त स्वछता अभियान

स्वयंसेवकांद्वारे आयोजित केले

icon

४५,००० लोक

HIV/AIDS जागरूकता ग्रामीण किशोरवयीन (HARA) मोहिमेद्वारे भारतातील १२ राज्यांना फायदा झाला

icon

१५,००० पेक्षा जास्त तरुणांना

व्यसनमुक्ती कार्यक्रमाचा फायदा झाला

icon

४,००० पेक्षा जास्त पंचायत सदस्य

सुशासनासाठी प्रशिक्षित