आपल्या काळातील सर्वात मोठ्या संकटाशी लढा
पर्यावरणाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जलसाठ्याचे पुनर्जीवीकरण, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम, कचरा व्यवस्थापन यंत्र, स्वच्छता मोहीम व सेंद्रिय शेती
रणनीती
मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणासारखे सामाजिक प्रकल्प सुरू करा.
मातीची गुणवत्ता टिकवण्यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करा.
प्रभाव
-
जगभरात १० करोड़ झाडे लावली
-
७५ नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे
व्याप्ती
-
१८ कचरा व्यवस्थापन प्लांट बसवले
-
३० लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले
आढावा
आपली नैसर्गिक संसाधने मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहेत. आपल्याला पिण्याचे शुद्ध पाणी रसायन मुक्त उत्पादने व स्वच्छ हवा देखील मिळत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास केवळ आपल्यासाठीच नाही तर अर्थव्यवस्थेसाठी देखील चांगला नाही. एका अंदाजानुसार पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे भारताला दरवर्षी १८ अब्ज डॉलर्स चा खर्च येतो जो सकल देशांतर्गत उत्पादनाच्या अंदाजे ६% आहे. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन जगभरातील स्वयंसेवकांनी पर्यावरणाच्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांमध्ये मिशन ग्रीन अर्थ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, सुकलेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, मंदिरातील कचऱ्याचे व्यवस्थापन व मातीची गुणवत्ता टिकवून ठेवणारी नैसर्गिक शेती चा समावेश आहे. आपले प्रकल्प मुख्यतः नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व या प्रक्रियेत स्थानिक लोकांचे जीवनमान सुरक्षित करण्या भोवती फिरतात. आपल्या देशात येऊ घातलेल्या जल संकटाचा सामना करण्यासाठी ७५ नद्या आणि उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे.आपण पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, या जगाचे नागरिक म्हणून हे आपले पहिले आणि मुख्य कर्तव्य आहे. आपण जर पर्यावरणाची काळजी घेतली तर ते आपली काळजी घेईल आणि आपल्याला आरोग्य, समृद्धी आणि आनंद मिळेल
- गुरुदेव श्री श्री रवि शंकर
पर्यावरणीय प्रकल्प
परिणाम
१० करोड़ वृक्ष
जगभरात लागवड
३० लाख शेतकऱ्यांना
नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण
७५ नद्या
आणि त्यांच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन केले जात आहे
५१२ टन कचरा
स्वच्छ यमुना अभियानात काढण्यात आला.
१,००,००० पेक्षा जास्त स्वच्छता मोहीम
यशस्वीरित्या पार पडल्या.
१८ ठिकाणी कचरा व्यवस्थापन
महत्त्वाच्या संयंत्रे बसविण्यात आली
११,६०० किलो
सगळ्या संयंत्रांची दैनंदिन कचरा व्यवस्थापन प्रक्रिया क्षमता



