

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमची मोहीम
महिलांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील सक्षमीकरण

आव्हान
समाजातील जुनाट आणि बुरसटलेल्या विचारसरणीमुळे असलेला लिंग भेद.

धोरण
महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी समाजाला एकत्र येऊन काम करण्यासाठी प्रवृत्त करणे.

व्याप्ती
१,११,००० पेक्षा जास्त महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण.
आढावा
भारतात, मुलींना अडचण, ओझे समजले जाते. यामुळे स्त्रीभ्रूण हत्या आणि बालविवाह यासारख्या वाईट प्रथा निर्माण झाल्या.
मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही, त्यामागे लग्नानंतर त्यांना घरच तर सांभाळायचे आहे असा समज असतो. यामुळे ज्या महिलांना आर्थिक क्षेत्रात काम करायचे आहे, एखादे नवीन कौशल्य विकसित करायचे आहे किंवा छोट्या व्यवसायासाठी पैसे जमा करायचे आहेत अशांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
आर्ट ऑफ लिव्हिंग महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत आग्रही आणि प्रयत्नशील आहे. यासाठी आम्ही बहुआयामी पद्धतीचा अवलंब करतो.
त्यामध्ये महिलांना व्यवसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देणे, समाजात स्त्री पुरुष समानतेबद्दल जागरूकता निर्माण करणे, आरोग्य विषयक चांगल्या सुविधा देणे, एकमेकांच्या सहकार्यासाठी आणि नवीन कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. एवढेच नाही तर आम्ही महिलांना तणाव मुक्ती आणि आत्मविश्वास वाढवणारी साधन देतो.
खरे सांगायचे तर मला कधीही वाटले नव्हते की मी माझे स्वतःचे पार्लर काढू शकेन. या प्रशिक्षणामुळे मला हे करणे आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करणे शक्य झाले. हे प्रशिक्षण मी घेतले…
स्वाती शेरखाने
दोन वर्षीय बाळाची आई, पदवीधर - सौंदर्यप्रसाधन प्रशिक्षण केंद्र, धरावी, मुंबई
समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खरंतर ही एकच गोष्ट एखादा समाज सुदृढ आणि सामंजस्य पूर्ण आहे की नाही हे ठरवत असते. महिला समाजाचा कणा आहेत.
- गुरुदेव श्री श्री रवि शंकर
धोरण
आमच्या धोरणात खालील गोष्टींचा समावेश आहे
व्यवसायिक प्रशिक्षण देणे : आम्ही ग्रामीण महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य वाढवणारे प्रशिक्षण देतो, जसे की शिवणकाम, नक्षीकाम, मण्यांचे काम, ज्यूटच्या पिशव्या बनवणे, अगरबत्ती बनवणे इत्यादी, जेणेकरून त्या आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील.
समाज प्रबोधन : द गर्ल चाइल्ड कॅम्पैन २०१३ आणि द ॲक्ट नाऊ कॅम्पैन २०१४ (The Girl Child Campaign 2013 and The Act Now Campaign 2014) यासारख्या मोहिमा राबवून, गर्भनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या याबद्दल समाज प्रबोधन करण्यासाठी आम्ही काम केले आहे.
व्यक्तींचे सशक्तीकरण : आम्ही महिलांना ताण-तणाव कमी करण्याचे तंत्र शिकवतो, त्यामुळे त्या आतून मजबूत होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
एकमेकांना सहकार्य करणारा समाज निर्माण करणे : समाजातील विविध आव्हानांचा व्यक्तिगत सामना करण्याऐवजी, समान आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आम्ही एकजूट राखण्याची भावना निर्माण करतो. विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी, एकमेकांच्या सहकार्यासाठी आणि महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करतो.
आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे : आम्ही ग्रामीण आणि शहरी भागातील वंचित महिलांसाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करतो
परिणाम
२,००,००० पेक्षा जास्त
अधिक लोक
मुलींच्या रक्षणासाठी वचनबद्ध
७१,०५१
पौगंडावस्थेतील मुलींना
मासिक पाळीतील आरोग्य आणि स्वच्छता याविषयी प्रशिक्षित केले.
१ लाख +
अधिक लोकांना
लिंग निदान चाचणी न करण्याविषयी जागरूक केले
६२३ पेक्षा जास्त
बचतगटांची
बचतगटांची स्थापना.
१.५० लाख
बिहारमध्ये लोकांचे
बालविवाह न करण्याविषयी प्रबोधन केले.
१,१०,००० पेक्षा जास्त
धूररहित चुलींचे
६२ महिला उद्योजकांद्वारे वितरण.
१,११,००० पेक्षा जास्त
ग्रामीण महिलांना
व्यावसायिक प्रशिक्षण दिले
नियमित
वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
आशिया खंडातील सर्वात मोठी देहविक्रय करणाऱ्यांची वस्ती सोनागाची येथे देहविक्रय कामगाऱ्यांसाठी