आयुर्वेदाच्या सहाय्याने आपले आरोग्य संतुलित राखा | Balance Your Health Through Ayurveda in Marathi

परिचय | Introduction

वात असंतुलन | Vata Imbalance

वात असंतुलनाची लक्षणे | Symptoms of Vata Imbalance |वाताचे लक्षणे |वात कशामुळे होतो

वात असंतुलनाचे परिणाम | Effects of Vatta Imbalance |वात रोग प्राणायाम

पित्त असंतुलन |Pitta Imbalance

पित्त के सामान्य लक्षण|Symptoms of Pitta Imbalance

पित्त के लंबे समय के असंतुलन के प्रभाव | Effects of Pitta Imbalance

कफ असंतुलन |Kapha Imbalance

कफ के लक्षण |Symptoms of Kapha Imbalance

कफ के लंबे समय के असंतुलन के प्रभाव | Effects of Kalpha Imbalance

 

परिचय | Introduction

आयुर्वेद ला जीवनाचे शास्त्र म्हणतात. असे मानले जाते की संपूर्ण ब्रम्हांड हे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंच महाभूतांनी बनलेले आहे. ही पंच महाभूते आपल्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा स्त्रोत आहेत आणि म्हणून एकमेकाशी ताळमेळ राखत ते शरीरभर व्याप्त असतात. आयुर्वेद देखील पंच महाभूतांच्या सिद्धांतावर कार्य करते. शरीरातील या पंच महाभूतांच्या संतुलनावर आपले आरोग्य टिकून असते.

प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ऊर्जा स्त्रोत इतर स्त्रोतांपेक्षा जास्त प्रमाणात असतो आणि त्यावर त्या व्यक्तीची प्रकृती बनत असते. शरीराचे प्राकृतिक दोष असे असतात.

  • वात दोष --- वायू आणि आकाश तत्व जास्त असणे
  • पित्त दोष --- अग्नी तत्व जास्त असणे
  • कफ दोष --- पृथ्वी आणि जल तत्व जास्त असणे

हे दोष व्यक्तीचे शरीर, प्रवृत्ती (आहाराची आवड, पचन), मन आणि भावनांना प्रभावित करतात.

उदा. कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये मजबूत शरीरयष्टी, मंद पचन, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि भक्कम भावनात्मकतेमुळे पृथ्वी तत्व स्पष्ट दिसते. बहुतांश व्यक्तींची प्रकृती दोन दोषांच्या संयुगांची बनलेली असते. जेंव्हा वात, पित्त आणि कफ यांच्यामध्ये संतुलन नसते तेंव्हा या दोषांच्या असंतुलनाची लक्षणे प्रकट होतात.

 

 

वात असंतुलन | Vata Imbalance | वात दोष | वात रोग

वात दोष तिन्ही दोषांमध्ये प्रमुख दोष आहे. कारण जर वात दोष जर दीर्घ काळासाठी असंतुलित राहिला तर पित्त आणि कफ यांचे असंतुलन देखील प्रकट होऊ लागते. वात वायू आणि आकाश तत्वाचे संयोजन आहे.

वात असंतुलनाची लक्षणे | Symptoms of Vata Imbalance |वाताचे लक्षणे |वात कशामुळे होतो

शारीरिक |Physical

वागणुकीतील लक्षणे | Behavioural

अपचनअकारण चिंता, काळजी
वायूअधीर होणे
पाण्याची कमतरताजीवनाप्रती नैराश्य
कोरडी त्वचाजबाबदाऱ्या टाळणे
शरीरात वेदनाघबराट वाटणे
तोंडाला आंबटपणा आणि करपट ढेकरसारे फालतू वाटणे
अशक्तपणा, थकवा, ओजसची कमीअधिक चालणे,फिरणे आणि बोलणे
अनिद्रा 
शरीरात कंप 
भ्रमित होणे, अकारण घबराट 
थंडीची जाणीव, गरम वातावरणाचे आकर्षण 

वात असंतुलनाचे परिणाम | Effects of Vatta Imbalance |वात रोग प्राणायाम

  • १. स्नायूंचे थकणे
  • २, सांधेदुखी
  • ३. सांधे आखडणे
  • ४. डोके दुखी
  • ५. अपचन
  • ६. वजन घटणे
  • ७. मरगळ
  • ८. शरीर ताठरणे
  • ९. शरीर थरथरणे
  • १०. अशक्तपणा
  • ११. पोटदुखी
  • १२. कोरडेपणा
  • १३. भीती

पित्ताचे असंतुलन|Pitta Imbalance

पित्त दोष अग्नी आणि उष्णतेशी संबंधित आहे. जेथे परिवर्तन आहे तेथे पित्त प्रकृती कार्य करत असते. आंतडे, यकृत, त्वचा, डोळे आणि मेंदू या सर्व ठिकाणी पित्त कार्य करते.

पित्त असंतुलनाची लक्षणे|Symptoms of Pitta Imbalance |पित्त लक्षणे

शारीरिक |Physical

वागणुकीतील लक्षणे |Behavioural

जास्त तहान-भूक लागणेबोलण्या चालण्यातील फरक
छातीत जळजळकाम करताना चिडचिड
डोळे, तळहात आणि तळपायांची जळजळराग, चिडचिड आणि आक्रमक असणे
वाद विवाद प्रिय
खूप गरम होणेउतावळेपणा आणि गडबड
त्वचेवर फोड आणि चट्टे उठणेनैराश्य
उलटीतून पित्त पडणे 
उजेड सहन न होणे 
शरीराला उग्र गंध 
डोकेदुखी, भीती वाटणे 
पोट झाडणे 
तोंडात कडू चव 
गरम वाटणे आणि थंड वातावरणाची इच्छा 

दीर्घ काळासाठी पित्त असंतुलित राहिल्याचा प्रभाव | Effects of Pitta Imbalance

  • १. अत्याधिक पित्ताचा त्रास
  • २. शरीरात जागोजागी सूज येणे
  • ३.रक्तस्त्राव
  • ४.उच्च रक्तदाब
  • ५.जळजळणे
  • ६.पोट झाडणे
  • ७.त्वचेवर फोड, चट्टे उठणे
  • ८.अनिवार इच्छा उठणे

कफ असंतुलन |Kapha Imbalance

कफ दोष सर्वात मोठा दोष मानला जातो. कफामुळे शरीराला सुडौल आकार आणि स्निग्ध रसायन प्राप्त होतात. कफाच्या या गुणधर्मामुळे वात शरीरभर संचालित होत असतो आणि पित्त संतुलित रहात असते. भक्कम शरीरयष्टीच्या मैदानी खेळाडूंमध्ये भरपूर प्रमाणात कफ असतो. कफ शरीरातील पृथ्वी आणि जल तत्व मिळून बनतो.

कफ असंतुलनाची लक्षणे|Symptoms of Kapha Imbalance

शारीरिक |Physical

वागणुकीतील लक्षणे |Behavioural

आळसजडपणा
भूक न लागणेअवसाद
जीव घाबरणेदुःख
शरीरात पाणी होणेकामात मन न लागणे
शरीर आखडणेदुसऱ्यांवर विसंबून असल्याची भावना
बेकाबू बनणेलालच
तोंडात पाणी फिरणेमोह
श्वास घेण्यास त्रास 
ज्यादा प्रमाणात झोप येणे 
तोंडात गोडी राहणे 

दीर्घ काळासाठी कफ असंतुलन असण्याचे प्रभाव |Effects of Kalpha Imbalance

  • १. लठ्ठपणा
  • २. सूज
  • ३. शरीरात पाणी होणे
  • ४. अधिक चंचलता
  • ५. भविष्याबध्दल चिंता
  • ६. अवसाद

आपल्या शरीरातील या दोष आणि विकारांना ओळखून उपयुक्त उपचार घेऊन यांना आपल्या शरीरात पुन्हा संतुलित करू शकतो. आत्ता जेंव्हा आपल्याला अस्पष्टता, अकारण भीती किंवा शरीरावर लाल चट्टे दिसतील तेंव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्या शरीरात कोणता दोष निर्माण झाला आहे. एखाद्या व्यावसायिक वैद्याद्वारे त्या दोषावर उपाय करू शकता. शरीराला विकारांपासून वाचवण्याचा एकमात्र रामबाण उपाय आहे या त्रिदोषांना संतुलित राखणे. आत्ता आपणास माहित झालेच आहे की हे त्रिदोष असंतुलित कां होतात, मग वैद्याशी संपर्क साधा, योग्य उपचार घ्या, त्रिदोष संतुलित करा आणि जीवन निरोगी ठेवा.