अंकन आणि अभिव्यक्ती (What is impression and expression in Marathi)

इतरांवर छाप पाडण्याचा किंवा स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करू नका.स्वतःला व्यक्त करण्याचा तुमचा प्रयत्न हाच अडथळा बनतो.तुमचे कोणालातरी प्रभावित करण्याचे प्रयत्न सुद्धा व्यर्थ आहेत.जर तुम्ही छाप पाडण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमचे भाव सहजच  व्यक्त होतात.जेंव्हा तुमचे आतून,आत्म्यातून व्यक्त होणारे भाव परिपूर्ण असतात तेंव्हा तुमचा प्रभाव बराच काळ टिकतो.

बहुतेकदा तुमच्यावर पडणाऱ्या प्रभावांवर (होणाऱ्या संस्कारांवर) आणि तुमच्याकडून होणाऱ्या अभिव्यक्तीवर तुमचेच नियंत्रण नसते.तुमचे प्रभाव आणि अविर्भाव निवडणे हे ज्ञान आहे.जो परम ज्ञानी असतो त्यच्यावर चांगल्या अथवा वाईट अशा कोणत्याही गोष्टींचा प्रभाव होत नाही.तेंव्हा तुम्ही अभिव्यक्त करण्याची कला पूर्णपणे आत्मसात केली असे समजावे. मनावर झालेल्या संस्कारांचा  परिणाम खालील पैकी असू शकतो:

  • गोंधळ
  • लक्ष विचलित होणे
  • अराजकता
  • लक्ष केंद्रित होण्याचा अभाव
  • आणि सर्वात शेवटी, मनाचा भ्रमिष्टपणा

निसर्गाने आपल्यामध्ये एक अंगभूत प्रणाली बनवली आहे ज्याच्या माध्यमाने–स्वप्नांच्याद्वारे आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण काही संस्कारांपासून मुक्त होतो.

स्वत:ला वाजवी पेक्षा अधिक व्यक्त करण्याने आपली गहनता आणि चमक, प्रसन्नता हरवून जाते.ध्यान हे प्रभावांना पुसून टाकते आणि अभिव्यक्ती सुधारते.

मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.

www.artofliving.org/wcf