शिव तत्व आपला स्वभाव आहे I Your Nature is Shiva

  • शांती हा आपला स्वभाव असला तरी आपण अस्वस्थ राहतो.
  • स्वातंत्र्य हा आपला स्वभाव असला, तरी आपण बंधनात राहतो.
  • आनंद हा आपला स्वभाव असला तरी आपण काही ना काही कारणास्तव दु:खी होतो.
  • संतुष्टी हा आपला स्वभाव असला तरी आपण इच्छांमध्ये अडकलेले आहोत.
  • परोपकार हा आपला स्वभाव असला तरी आपल्या हातून ते घडत नाही.
  • आपल्या मूळ स्वभावाकडे परतण्याचा एकमेव मार्ग म्हणजे साधना.
  • साधनेमुळे आपण ‘स्व’कडे परततो.

“शिवतत्व” हा आपला मूळ स्वभाव आहे. शिवतत्व हे शांत, अनंत, सुंदर आणि एकमेवाद्वितीय आहे. रात्री म्हणजे विश्राम घेणे. शिवरात्री म्हणजे शिव तत्वामध्ये विश्राम करणे.