सुक्ष्मयोग व्यायामप्रकार: ७ मिनिटांत आराम I Sukshma vyayama in Marathi

तुम्हाला अशा काही दिवसांचा सामना करायला लागतो का जेंव्हा तुम्ही खूपच तणावात असता? जेंव्हा तुमच्या मुठी आवळल्या जातात? तर मग मुठी अजून जास्त आवळा. खरं तर सगळे शरीरच आक्रसून घ्या. श्वास सोडा, पोट आत घ्या, कपाळाला आठ्या घाला, तोंड वाकडे करा. आणि ‘हा’ असा आवाज करत श्वास तोंडाने सोडा. कोणती क्रिया तुम्हाला जास्त चांगली वाटली? मुठ बंद असताना बरे वाटले का ती सुटल्यावर?

हे होतं सुक्ष्म योगाच्या काही तंत्रांपैकी एक तंत्र. ह्या तंत्रांची खासियत अशी आहे की ती साधी, छोटी व तरल आहेत. ज्या दिवशी तुम्ही त्रस्त नसाल त्या दिवशी तुम्ही हे व्यायामप्रकार सहज करू शकता. “हा तुम्ही स्वतःला आराम देण्याचा सर्वात जलद मार्गांपैकी एक आहे,” असे सूक्ष्म योगाचा नेहमी सराव करणाऱ्या पल्लवी जोशी म्हणतात, “तुम्ही हा योग कुठेही, कधीही – घरी, अगदी कार्यालयात अथवा बस, कार किंवा विमान योगा  प्रवास करताना – करू शकता,” सूक्ष्म योगाचा नेहमी सराव करणारी आणखी एक व्यक्ती.

सूक्ष्मयोगाला खूप वेळ किंवा तयारी लागत नाही. हे लहान-लहान व्यायामप्रकार उर्जेचे स्त्रोत कमीतकमी ७ मिनिटांत खुले करतात. तुम्हाला जाणवण्या एवढा फरक पडतो.

चेहरा व मस्तकाचे सूक्ष्मयोग व्यायामप्रकार असे आहेत:

जर काही मनाविरुद्ध घडले तर आपले हात आपण डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, ‘अरे देवा!’ मालिश केल्याने मन शांत होते व मन जर शांत असेल तर जीवन सुरळीत चालते.

अंगठ्याचा व तर्जनीचा वापर करून भुवयांना हलकेच चिमटे घ्या. तुम्हाला माहिती आहे का की आपण आठ्या पाडतो तेंव्हा ७२ स्नायूंचा उपयोग करतो मात्र स्मितहास्य करताना याच्या निम्मेच स्नायू लागतात?

eye excercise

तुमचे डोळे ५-६ वेळा घडाळाच्या काट्याच्या दिशेने व ५-६ वेळा विरुद्ध दिशेने फिरवा.

eye rotation

डोळे घट्ट बंद करा व विस्फारा. असे १०-१५ वेळा करा.

१०-१५ सेकंदांसाठी तुमचे कान खेचा. शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की प्रज्ञा वाढवणारे मज्जातंतू कानाच्या खालील भागात एकवटलेले आहेत. कधी-कधी आई-वडिल व शिक्षक मुलांचे कान खेचतात त्यामुळे त्यांचे भान (प्रज्ञा) वाढते व चुका करण्याचे प्रमाण कमी होते. जर तुम्ही स्वतःच आपले कान खेचले तर दुसरे कुणी तुमचे कान खेचणार नाही.
Sukshma vyayama yoga for relaxation

तुमचे कान पकडा व घडाळाच्या काट्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेने गरम होईपर्यंत फिरवा. (सायकल चालवल्या सारखे)

तुमची तीन बोटे (तर्जनी, मध्यमा व अनामिका) जबड्यापासून हनुवटीपर्यंत फिरवून गालांना मसाज करा. असे करत असताना तोंड उघडेच असू द्यात. जबड्यांच्यामध्ये ज्या गाठी आहेत तेथे ताण-तणाव साठून राहतो.

 

८-१० वेळा जबडा उघडा व बंद करा.

तोंड उघडून जबडा दोन्ही बाजूला ८-१० वेळा फिरवा.

 

मान गोल फिरवा. श्वास घेत डोके मागे न्या आणि श्वास सोडत हनुवटी छातीवर टेकवा. डोके घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवा. श्वास घेत डोके वर न्या (पहिले अर्धवर्तुळ) आणि श्वास सोडताना पूर्व स्थितीत या (दुसरे अर्धवर्तुळ). असे ५-६ वेळा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने व विरुद्ध दिशेने करा.

दोन मिनिटे हातांचे पंजे जोरात हलवा. तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की किती जोरात हलवावेत? तुम्ही कुत्र्याला किंवा मांजराला अंगावरील पाणी झटकताना पाहिले असेल तर तेवढ्यात जोरात झटकण्याचा प्रयत्न करा. ते सर्व झटकून पुढे जातात तसे. हात झटकत राहा आणि सावकाश थांबा. शांत बसा.

 
हे व्यायामप्रकार करतना तुम्हाला जाणवेल की त्यांचा परिणाम तुमच्या मनावर कसा होत आहे. प्रत्येक लहानसहान हालचाल काही प्रमाणात ताण कमी करते. तुमच्या लक्षात येईल की उर्जेचा संचार तुमच्या संपूर्ण शरीरात होत आहे. हे ज्ञान केवळ सरावाने व अनुभवाने मिळेल, वाचन केल्याने नव्हे. तुम्ही अशा अवस्थेत याल जेंव्हा शरीर-मनाचा ताळमेळ सहज व योग्य होईल. तथापि हा योगाभ्यासाचा एक भाग आहे. शिकण्यासारखे बरेच काही आहे. सराव करा!

सूक्ष्म योगा व्हिडीओ (sukshma yoga video)