ध्यानाची निवारक शक्ती (Power Of Meditation in marathi)

Benefits of meditation

“ध्यानाची शक्ती निवारक आहे. जेव्हा मन शांत, सावध असते आणि संपूर्णतः समाधानी असते तेव्हा ते लेझरच्या झोताप्रमाणे असते – ते फारच शक्तिशाली असते आणि तेव्हा ते निवारक असते.” – श्री श्री रविशंकर

एक निरोगी कळीच फक्त उमलू शकते. त्याचप्रमाणे एक निरोगी व्यक्तीच केवळ यशस्वी होऊ शकते.

तर मग हे निरोगी असणे म्हणजे काय?

आदर्श निरोगी अवस्था प्राप्त करण्याकरिता व्यक्तीने मानसिक दृष्ट्या शांत, स्थिर असले पाहिजे आणि भावनिकदृष्ट्या भक्कम असले पाहिजे. ‘स्वास्थ्य’ म्हणजे तब्येत. त्याचा अर्थ आपण आपले स्वत्वात असणे असा सुद्धा आहे. स्वास्थ्य किंवा तब्येत ही केवळ शरीर व मन यांच्यापूर्ती मर्यादित नसून ती चैतन्यासोबत सुद्धा जोडलेली आहे. आपले चैतन्य जितके निर्मळ तितके अधिक आरोग्यदायी असते.

ध्यानामुळे प्राणशक्तीमध्ये (जीवन ऊर्जेमध्ये) वृद्धी होते.

शरीर आणि मन या दोहोंच्या आरोग्य आणि स्वास्थ्याकरिता प्राण (अतिमहत्वाची जीवन ऊर्जा) ही मूळ पाया आहे. ध्यानाद्वारे तुम्ही प्राणिक ऊर्जा प्राप्त करू शकता. जेव्हा तुमच्या शरीरात अधिक प्राणिक ऊर्जेचा संचार होतो तेव्हा तुम्हाला अधिक जागृत, उत्साहपूर्ण आणि हजरजबाबीपणा यांचा अनुभव येतो. प्राणाच्या कमतरतेमुळे सुस्ती आणि उत्साहाची कमी हे आढळून येते.

ध्यानाद्वारे आजारपणाबरोबर सामना.

असे म्हणतात की आजारपणाचे मूळ हे मनात / चेतनेमध्ये असते. म्हणूनच, मनाची काळजी घेऊन, मनातील क्षोभ शांत केल्याने बरे होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. आजारपण निर्माण होण्याची कारणे आहेत:

  • नैसर्गिक नियमांचे उल्लंघन करणे. उदा. अतिप्रमाणात जेवणे.
  • निसर्गाने लादलेले. उदा. सामान्य सर्दी, साथीचा रोग
  • गतजन्माचा प्रभाव किंवा कर्मे यांच्यामुळे

निसर्ग स्वतः या आजारपणांवर उपाय देण्याची तरतूद करतो. आरोग्य आणि आजारपण हे भौतिक निसर्गाचा भाग आहेत. ध्यानाचा नियमित सराव केल्याने विविध तणाव, काळज्या, अस्वस्थता यांच्यापासून सुटका मिळते आणि मनाची अवस्था संपूर्णपणे सकारात्मक होते. याचा अतिशय सकारात्मक परिणाम भौतिक शरीर, मेंदू आणि चेतावस्था यांच्यावर होतो आणि मग आजारपण दूर होते.

आरोग्य आणि आजारपण हे भौतिक निसर्गाचा भाग आहेत. तुम्ही त्याबद्दल खूप काळजी करू नका. जेव्हा तुम्ही आजारपणाबद्दल काळजी करता तेव्हा तुम्ही आजारपणाला अधिक शक्ती देता. तुम्ही आरोग्य आणि आजारपण यांचे एक मिश्रण आहात. जेव्हा तुम्ही याची मनात खुणगाठ बांधता आणि मन सकारात्मक ठेवता तेव्हा आजारपणात बदल घडून येतो.

  • ध्यानाद्वारे मनाच्या जखमा भरून येतात
  • ध्यान हे तणावाला दूर ठेवते तसेच ते शरीरात साठलेल्या तणावाला बाहेर काढून टाकते. आरोग्य, आनंद आणि व्यक्तीमध्ये सकारात्मक अवस्थेचा उदय होतो.
  • ध्यानाचा सराव हा मेंदूला शीतलता देतो, हे म्हणजे शरीर आणि मन यांचे सर्व्हिसिंग करण्यासारखे आहे.

ध्यानाद्वारे भावनिक प्रदूषण दूर करा

भविष्यात अशी एक वेळ येणे शक्य आहे जेव्हा लोक उदास असले की त्यांना दंड भरावा लागेल, कारण ते भावनिक प्रदूषण निर्माण करीत आहेत! तुमच्या सभोवताली असणाऱ्या लोकांचे शब्द ऐकल्याने तुमच्या मनःस्थितीवर परिणाम होतो. एक तर ते तुम्हाला शांतता आणि आनंद देऊ करतात, नाहीतर मग (मत्सर, क्रोध, वैफल्यता किंवा दुःख अश्याप्रकारचा) क्षोभ निर्माण करू शकता. मन हे आत्म्यात केंद्रित नसल्यामुळे तुमच्यावर परिणाम होतो.

ध्यान हे ‘भावनिक प्रदूषणा’ला नियंत्रित करण्याची गुरुकिल्ली आहे.

ध्यानाद्वारे बहरणे

ध्यान हे अध्यात्मिक कायापालट घडवून आणते. जसजसे तुम्हाला जीवनाबद्दल अधिक समजू लागते तसतसे समग्र निर्मितीचे गुपित तुमच्यासमोर उघड होते. तेव्हा मग तुमच्या मनात उठणारे प्रश्न म्हणजे – जीवनाचा अर्थ काय आहे? त्याचे उद्देश्य काय आहे? हे जग काय आहे, प्रेम म्हणजे काय, ज्ञान काय आहे ...?

एकदा का असे प्रश्न तुमच्या मनात उठू लागले तर समजून जा की तुम्ही फारच भाग्यवान आहात. या प्रश्नांना समजून घेण्याची गरज आहे; ज्यांची उत्तरे कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. तुम्हाला त्यांच्यामध्ये जगावयाचे आहे आणि होणाऱ्या कायापालटाचे साक्षी व्हावयाचे आहे. ते म्हणजे आदर्श स्वास्थ्य; तुमचे आतून रुपांतर घडून आले आहे. आणि एका कळीचे सुंदर फुल बनले आहे.

ध्यानाद्वारे जगाचे कल्याण करा

ध्यानामुळे वातावरण शुद्ध होते. ध्यान आणि सुदर्शन क्रिया यांच्यामुळे लोकांमधील आक्रमकता आणि हिंसा यांचे परिवर्तन होऊन त्याची जागा अनुकंपा, प्रेम आणि इतरांची काळजी घेण्याची प्रवृत्ती यांनी घेतली जाते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश करता जिथे कोणी संतापलेले आहे तेव्हा तुम्हाला कसे वाटते याचे निरीक्षण केले का? तुम्हालासुद्धा तसेच वाटू लागते!

त्याचप्रमाणे जेव्हा सलोख्याचा किंवा उत्सव साजरा होत असेल तर तुम्हाला चांगले वाटते. असे का होते याचे तुम्हाला नवल वाटत असेल. भावना ह्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरापुरत्याच मर्यादित नसतात – त्यांचा संचार सर्वत्र असतो. त्या संपूर्ण वातावरणात असतात, कारण मन हे पंचमहाभूत (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) यांच्यापेक्षा सूक्ष्म असते. जर एखाद्या ठिकाणी आग पेटवली असेल तर आगीची उष्णता ही केवळ आगीपुरती मर्यादित नसते तर ती चौफेर उत्सर्जित होते.

सूचना: जर तुम्ही असंतुष्ट आणि निराश आहात तर या भावनांची अनुभूती करणारे तुम्ही एकमेव नसून; या भावना तुम्ही संपूर्ण वातावरणात पसरवत आहात.

कलह आणि रोगराई या जागतिक परिस्थितीमध्ये दररोज थोडे तरी ध्यान करणे अतिशय महत्वाचे आहे. ध्यानाद्वारे तुम्ही वातावरणातील नकारात्मक स्पंदनांना निष्प्रभावी करू शकता, आणि अश्या प्रकारे सलोख्याचे वातावरण निर्माण होईल.

रोगनिवारक श्वास आणि ध्यान

सुदर्शन क्रिया म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मुकुटातील हिरा म्हणून ओळखल्या जाते.

हे असाधारण श्वसनाचे तंत्र भरपूर उर्जा प्रदान करणारे आहे:

  • प्रत्येक पेशीला प्राणवायू मिळतो आणि त्यामध्ये नवजीवनाचा संचार होतो.
  • नकारात्मक विचारांना शरीराच्या बाहेर काढून लावते.
  • तणाव, वैफल्य आणि क्रोध यापासून मुक्ती देते.
  • अस्वस्थता, निराशा आणि सुस्ती यांना दूर करते.
  • मन आणि शरीर यादोहोंना आराम देते.

सरावानंतर आपल्याला शांत, केंद्रित आणि हास्य तरळत राहते.

‘रोगनिवारक श्वास घ्या आणि ध्यान करा. या सरावांमुळे तुमच्यामध्ये संपूर्ण रूपांतरण घडून येईल, आणि तुमच्यात प्रेमाची ज्योत चेतावेल.’