डोळ्यांसाठी योग: नैसर्गिकरित्या दृष्टी सुधारा | Yoga for eyes – Improve eyesight naturally

शरिराच्या प्रत्येक अवयवाची कार्यशक्ती वाढवण्यासाठी त्यानुसार योगासने / मुद्रा आहेत. तसेच डोळ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीही व्यायाम उपलब्ध आहेत. ही आसने डोळ्यांच्या संबंधित समस्या निवारण करण्यास मदत करतात. जसं-

  • मायोपिया - जवळचा दृष्टीदोष
  • हाइपरमेट्रोपिया - दूर दृष्टीदोष

आजच्या युगात लोकसंखेच्या ३५% लोकांत ऱ्हस्व व दिर्घ दृष्टीदोष कमी-अधिक प्रमाणात आढळतात.

चष्मा किंवा लेन्सच्या सहाय्याने नेत्र विकारांवर उपचार केले जातात. हे उपचार डोळ्यांचा अपवर्तक दोष कमी करतात. मात्र त्यामुळे डोळ्यांतील दोष दूर होत नाहीत. वास्तविक शक्तीशाली लेन्स डोळ्यांचे दोष वाढवतात. म्हणून गरज असेल तेंव्हाच चष्म्याचा उपयोग केला पाहिजे.

मोतीबिंदू आणि काचबिंदू सारखे डोळ्यांचे आजार जीवाणूंच्या संक्रमणाने होतात. इतर बरेचसे आजार डोळ्यांच्या स्नायूंच्या दुर्बलतेमुळे होतात. हि दुर्बलता दीर्घ मानसिक आणि भावनिक तणावामुळे होऊ शकते. योगासनाने डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित समस्या, जसे जवळचा किंवा दूरचा दृष्टीदोष, ठीक होऊ शकतात.

या योगासनांचा काही महिने सराव करत राहिल्यास डोळ्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सामान्य होते. महत्वाची सूचना :डोळ्यांची योगासने सुरू करण्यापूर्वी डोळ्यांवर काही काळ थंड पाणी शिंपडावे.

योगोपचारात खालील व्यायामप्रकारांचा समावेश होतो

 

  • डोळे बंद करून शांत बसा व काही दिर्घ श्वास घ्या व सोडा जेणेकरून तुम्हाला पूर्ण विश्रांती मिळेल.
  • दोन्ही तळहात एकमेकांवर गरम होईपर्यंत घासा. मग गरम तळहात डोळ्यांवर ठेवा.
  • तळव्यांवरील उर्जा डोळ्यांवर उतरत असताना व डोळ्यांना आराम होताना अनुभवा. तुमचे डोळे सुखकर अंधारात भिजत असल्याचा आनंद घ्या.
  • तळव्यांवरील संपूर्ण उर्जा डोळ्यांत शोषली जाईपर्यंत याच स्थितीत राहा.
  • डोळे बंदच ठेऊन हात खाली घ्या.
  • पुन्हा एकदा तळवे एकमेकांवर घासून हिच प्रक्रिया कमीतकमी तीन वेळा करा.

 

  • डोळे उघडे ठेऊन आरामात बसा.
  • दहा वेळा जलद गतीने पापण्या फडकवा.
  • नंतर डोळे बंद करून २० सेकंद आराम करा. सावकाश आपले लक्ष्य श्वासाकडे न्या.
  • हाच व्यायाम पाच वेळा करा.

 

  • पाय पुढयात सरळ करून बसा.
  • आता मुठी बंद ठेऊन व हातांचे अंगठे वरच्या दिशेला ठेऊन हात वर उचला.
  • तुमच्या समोरील डोळ्यांच्या पातळीत असलेल्या एका बिंदूवर नजर स्थिर करा.
  • ह्या स्थितीत डोके स्थिर ठेवा आणि खालील गोष्टींवर नजर, एकानंतर एकावर फिरवत, केंद्रित करा:
  • भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
  • डाव्या अंगठ्याकडे पहा.
  • पुन्हा भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
  • उजवा अंगठा
  • पुन्हा भुवयांच्या मधल्या मोकळ्याजागी पहा.
  • डाव्या अंगठ्याकडे पहा.
  • असे १०-२० वेळा पुनःपुन्हा करा.
  • हा व्यायाम झाल्यानंतर डोळे बंद करून आराम करा.

वरील व्यायाम करतेवेळी श्वासाच्या खालील लयबध्दतेवर लक्ष द्या-

  • शून्य स्थितीत श्वास घ्या.
  • बाजूंना पाहताना श्वास सोडा.
  • श्वास घेत पुन्हा मध्य अवस्थेत या.

 

  • पाय शरिराच्या सरळ रेषेत ठेऊन ताठ बसा.
  • आता तुमच्या डाव्या हाताची बंद मुठ डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा अंगठा मात्र वरच्या दिशेला सरळ ठेवा.
  • डोळ्यांसमोरील एका बिंदूवर नजर केंद्रित करा.
  • याच अवस्थेत डोके न हलवता एक दिर्घ श्वास घ्या.
  • श्वास सोडा व डाव्या अंगठ्यावर नजर केंद्रित करा.
  • पुन्हा श्वास घ्या व डोळ्यांसमोरील एका बिंदूवर नजर केंद्रित करा.
  • आता तीच क्रिया उजव्या हाताचा अंगठा उजव्या गुडघ्यावर ठेऊन करा.
  • नंतर डोळे बंद ठेऊन आराम करा.

 

  • पाय पुढयात सरळ करून बसा.
  • आता तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा.
  • उजव्या हाताची मुठ करून अंगठा सरळ दिशेत उजव्या गुडघ्यावर ठेवा. हाताचा कोपरा सरळ ठेवा.
  • याच अवस्थेत डोके न हलवता उजव्या अंगठ्यावर नजर केंद्रित करा.
  • हाताचा कोपरा सरळ ठेऊन उजव्या अंगठ्याने एक वर्तुळ बनवा.
  • पाच वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पाच वेळा विरुद्ध दिशेने अंगठा फिरवत हीच क्रिया करा.
  • हीच क्रिया डावा अंगठा वापरून परत तशीच करा.
  • डोळे बंद करून त्यांना आराम द्या. पूर्ण विश्राम करा.

हा व्यायाम करताना खालीलप्रमाणे श्वासाचा आकृतिबंध पाळा:

  • वर्तुळाचा वरील अर्धगोल श्वास घेत पूर्ण करा.
  • खालील अर्धगोल श्वास सोडत पूर्ण करा.

 

  • पाय पुढयात सरळ करून बसा.
  • दोन्ही हातांच्या मुठी दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. हातांचे अंगठे वरील बाजूस सरळ ठेवा.
  • हात सरळ ठेवत उजवा अंगठा हळू वर उचला. अंगठ्याबरोबर नजर वर न्या.
  • अंगठा जास्तीतजास्त वर न्या. नंतर तो सावकाश सुरवातीच्या स्थितीत खाली आणा. हे करताना डोके स्थिर व नजर अंगठ्यावर असू द्या.
  • हीच क्रिया डाव्या अंगठ्याने परत करा.
  • प्रत्येक अंगठ्याने पाच वेळा असे करा.
  • हे सर्व करताना डोके व पाठीचा कणा ताठ असू द्यात.
  • डोळे बंद करा व आराम करा.

हा व्यायाम करताना खालीलप्रमाणे श्वासाचा आकृतिबंध पाळा:

  • डोळे वर नेताना श्वास घ्या.
  • डोळे खाली आणताना श्वास सोडा.

 

  • मांडी घालून बसा.उजवा हात नाकासमोर सरळ वर उचला. 
  • उजव्या हाताची मुठ करा व अंगठा वरच्या दिशेला सरळ ठेवा.
  • हाताची मुठ बंद करुन अंगठा उभा ठेवा. 
  • नजर अंगठ्याच्या टोकावर केंद्रित करा.
  • थोडा वेळ याच स्थितीत रहा (अंगठा नाकाच्या टोकावर असताना नजर अंगठ्याच्या टोकाकडेच ठेवा).
  • नजर अंगठ्याच्या टोकाकडेच ठेवत हात सरळ करा.
  • हे आसनाचे एक चक्र झाले. 
  • अशी पांच चक्रे करा.

हा व्यायाम करताना खालीलप्रमाणे श्वासाचा आकृतिबंध पाळा:

  • अंगठा नाकाच्या अग्रभागाजवळ आणताना श्वास घ्या. 
  • अंगठा नाकाजवळ असताना श्वास रोखा;
  • हात सरळ करताना श्वास सोडा.

 

  • खुल्या खिडकीजवळ बसा किंवा असे उभे रहा जेणेकरून क्षितीज दिसेल. हात शरीराच्या बाजूला ठेवा.
  • नाकाच्या अग्रावर ५-७ सेकंद नजर केंद्रित करा.
  • असे १०-२० वेळा करा.
  • डोळे बंद करून आराम करा.

खालीलप्रमाणे श्वासाचा आकृतिबंध पाळा:

  • नाकाकडे बघताना श्वास घ्या.
  • क्षितिजाकडे बघताना श्वास सोडा.

वरील सर्व व्यायाम प्रकार करून झाल्यावर काही मिनिटे शवासनात पडून राहा आणि पूर्ण विश्रांती घ्या. सावकाश व नेहमीप्रमाणे श्वास घ्या व सोडा. हे व्यायाम करताना कोणताही विचार अथवा कोणतीही संवेदना रोखू नका.

आजच्या घडीला जगातील ३५% लोकांत ऱ्हस्व व दिर्घ दृष्टीदोष कमी-अधिक प्रमाणात आढळतात. हे दोष चष्मा वापरल्याने सुधारतात, पण पूर्ण बरे होऊ शकत नाहीत. खरे तर, जास्ती नंबरचा चष्मा वापरल्याने दृष्टी आणखी बिघडू शकते. म्हणून अगदी शक्यच नसेल तरच चष्मा वापरावा.

मोतीबिंदू व काचबिंदू ह्यांसारखे काही विकार (जीवाणूंमुळे होणारे) वगळता बाकी बरेच डोळ्यांचे विकार हे डोळ्याच्या स्नायूंच्या कार्यातील बिघाडामुळे होतात, ज्याचे कारण हे जुना मानसिक व भावनिक ताण हे असते. योग तंत्राच्या सहाय्याने दृष्टीच्या स्नायूंचे बिघडलेले कार्य सुधारते, जसे ऱ्हस्व दृष्टीदोष व दिर्घ दृष्टीदोष. हे योग व्यायामप्रकार काही महिने नियमित केल्याने डोळ्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.

योगाभ्यासाने शरीर व मनाचे स्वास्थ्य खूपच सुधारत असले तरी ती औषधांना पर्यायी होऊ शकत नाहीत. योगासने ही श्री श्री योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच शिकली पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचार घेणाऱ्या व्यक्तींनी योगासने डॉक्टरांचा व श्री श्री योगशिक्षकांच्या सल्ल्यानंतरच करावीत. आपल्या भागातील जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रावर श्री श्री योग शिबिर कधी आहे ते शोधा. अभ्यासक्रमांविषयी माहिती हवी असेल अथवा तुम्हाला काही सांगायचे असेल तर ह्या ईमेल आयडी वर लिहा: info@srisriyoga.in