योग साधनेने मलोत्सर्ग नाहीसा होतो (Yoga for ibs in Marathi)

अनियमित मलोत्सर्ग हा शारीरिक आजार असून त्यामुळे दीर्घकाळ पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणे, पोट फुगणे (तडस लागणे) आणि शौचास वारंवार होणे किंवा पोट नीट साफ न होणे (बद्धकोष्ठता) किंवा जुलाब होणे. पचनस्वंस्थातील बिघाड कोणत्याही वयात होऊ शकतो आणि सामन्यतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, अनियमित मलोत्सर्गामुळे जीवनशैलीवर परिणाम होऊन मानसिक त्रास वाढतो.

यातून सोडवणूक होण्यासाठी उपाय:

जे लोक या आजाराने त्रासले आहेत त्यांना बरेचदा त्यांच्या आहारात बदल करण्यास सांगितले जाते, कारण कदाचित त्यांना ठराविक अन्न पचत नसते. अजून एक उपाय म्हणून त्यांना तंतुमय अन्न किंवा सारक, विरेचक घ्यायला सांगितले जाते. आज उपलब्ध असलेल्या अनेक उपायांपैकी तारणहार म्हणजे –योगा!

योगा – का ?

योगा, हे पुराणकालीन शास्त्र आहे जे शारीरिक आणि मानसिक स्तरावर काम करते आणि अनियमित मलोत्सर्गापासून आराम मिळवून देते. योगसाधनेमुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना व्यायाम मिळून ते बळकट होतात. त्यामुळे कालांतराने या दुखण्यातून बरे होऊन शरीर मूळ अवस्थेत येऊ लागते. योग हा मानसिक विश्रांती देणारा आणि आशंका, चिंता दूर करणारे साधन आहे. त्यामुळे मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकते.

खालील योगासने तुम्हाला वेदनांपासून आराम देऊन अनियमित मालोत्सर्गावर मात करू शकता.



मार्जारासनामुळे पोटाची कार्यक्षमता आणि पचनक्षमता वाढते. त्यामुळे मन शांत होऊन मानसिक तणावापासून सुद्धा मुक्ती मिळते.

पवनमुक्तासनामुळे आतड्यांना आणि पोटाच्या इतर अवयवांना मालिश होऊन शरीरातून जास्तीचा वात (वायू) बाहेर पडतो.

 

अधोमुख श्वानासनामुळे पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. या आसनामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

बसून केलेले आणि पाठीचा अर्धा कणा पिळविलेले आसन यकृत आणि मूत्रपिंडासाठी उपयुक्त असते. या आसनामुळे मूत्रपिंडाजवळील ग्रंथी कार्यान्वित होतात.

 

भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू ताणले जाऊन मजबूत होतात. त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. या आसनामुळे रक्ताभिसरण सुद्धा चांगले होते.

धनुरासनामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात त्यामुळे शरीरातील ताण कमी होतो. अनियमित मलोत्सर्गामुळे मासिकपाळीला त्रास होऊ शकतो. या आसनामुळे तो त्रास कमी होतो.

 

 

आहारविषयक आणि जीवनपद्धती विषयक शिफारशी

अनियमित मलोत्सर्ग हा कमजोर पचनसंथेमुळे किंवा अनियमित सवयीमुळे होतो. कामाचा ताण आणि आरोग्यास हानिकारक जीवनपद्धतीमुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. आहारात आणि जीवनपद्धतीमध्ये थोडेसे बदल करून अनियमित मलोत्सर्ग बरा होऊ शकतो. आयुर्वेद, ज्याचा शब्दशः अर्थ “आयुष्याचे शास्त्र” असा आहे, ते पुरातन भारतीय नैसर्गिक, सकल वैद्यक शास्त्र आहे. शरीरातील विविध मुलतत्वे संतुलित करून आजार नाहीसे करण्याबद्दलचे ज्ञान आहे.

धीर धरणे महत्त्वाचे आहे.

अनियमित मलोत्सर्गामुळे होणाऱ्या वेदनेपासून योगामुळे नक्कीच आराम वाटू शकतो. योग खूपच परिणामकारक असला तरीही त्यापासून होणाऱ्या रोगनिवारणाला काही वेळ लागतो. तुम्ही थोडा धीर धरून ही योगासने चालू ठेवणे गरजेचे आहे, मधेच सोडून देऊ नयेत. काही वेळानंतर तुम्हाला वेदनेपासून मुक्तता मिळून तुम्हाला अनियमित मलोत्सर्गापासून आराम मिळेल.

सावधानतेने मार्गक्रमण करा

पोटाचे दुखणे तुमच्या हालचाली मर्यादित करू शकतात. पण तुम्ही हे सोडून देऊ नका. नियमित व्यायामाने तुमच्या शरीराला या आसनांची सवय होईल आणि तुम्ही अधिक सहजतेने आसने करू शकाल. आपल्या शरीराची क्षमता जाणून जेवढे सहज जमेल तेवढेच करा.

आसने करा आणि पहा तुमचा अनियमित मलोत्सर्गाचा त्रास कसा नाहीसा होतो.

योगासने शरीर आणि मनाच्या स्तरावर खूप परिणामकारक आहेत पण औषधला पर्याय आहेत असे समजू नका. ही योगासने प्रशिक्षित आर्ट ऑफ लिव्हिंग योगा शिक्षकाकडून शिकणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे महत्वाचे आहे. काही वैद्यकीय त्रास असल्यास योगासने डॉक्टरच्या आणि श्री श्री योग शिक्षकाच्या सल्ल्याने करावीत. श्री श्री योग कोर्स बद्दल जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रावर चौकशी करावी. कोर्स बद्दल माहिती हवी असल्यास किंवा काही प्रतिक्रिया असल्यास info@srisriyoga.in  वर इमेल करावी.