जागतिक विक्रम

आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था संस्कृतींमधील वैविध्य साजरे करते, 
आणि संगीताद्वारे त्यांना एकत्र आणते.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे एक ध्येय म्हणजे आंतरधर्मीय आणि सांस्कृतिक बंध मजबूत करणे. गुरुदेव श्री श्री रविशंकर संस्कृतींमधील वैविध्य साजरे करण्यावर भर देतात आणि विविधतेचा आनंद घेण्यासाठी संगीत हेच एक साधन आहे. तो आनंद संगीताद्वारे व्यक्त करण्यापेक्षा अजून दुसरा चांगला मार्ग असूच शकत नाही!

स्कॉटलंडच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या बॅगपाइप्सपासून ते सतारीच्या सुरांपर्यंत, संगीत हे एक समान धागा आहे जो समाज आणि लोकांमधील दरी कमी करण्यास मदत करतो. आर्ट ऑफ लिव्हिंगने कलाकार आणि चाहत्यांना इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आणले आहे की हीच एक उल्लेखनीय कामगिरी बनली आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगने असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आहेत ज्यांना इतक्या भव्य कामगिरीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे!

१. ०९ जानेवारी २०१३ – शांततेसाठी शिंग फुंकले

भारतातील केरळमधील कोल्लम येथील आर्ट ऑफ लिव्हिंगने ४४४ संगीतकारांचा समावेश असलेला हा सर्वात मोठा पवनवाद्ययंत्र समूह बनवला. ४४४ संगीतकारांनी कोम्बू किंवा श्रृंग नावाच्या इंग्रजी सी-आकाराच्या लांबलचक भारतीय पवनवाद्य वादनाचा कार्यक्रम केला.हा कार्यक्रम २५ मिनिटे चालला.

२. १३ नोव्हेंबर २०१२ – शांती आणि सौहार्दासाठी मेणबत्त्या

एकाच ठिकाणी एकाच वेळी सर्वाधिक १२,१३५ मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या .दिवाळीच्या दिवशी भारतातील अहमदाबाद येथील आर्ट ऑफ लिव्हिंगने हा विक्रम केला.

३. १६ मे २०१२ - बल्गेरियन बॅगपाइप्स

बल्गेरियातील सोफिया येथील नॅशनल पॅलेस ऑफ कल्चर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ३३३ वादकांनी सर्वात मोठा बॅगपाइप तयार केला.

४. १७ जानेवारी २०१२ – ताल निनाद

भारतातील सोलापूर जवळील हुंबरवाडी इस्टेट येथे आर्ट ऑफ लिव्हिंगने तबला व तत्सम थाप वाद्ये वाजवणाऱ्या १२३० कलाकारांचा समावेश असलेला सर्वात मोठा समूह तयार केला व त्याचा कार्यक्रम सादर केला.

५. २१ फेब्रुवारी २०११ – अभंग नाद

आर्ट ऑफ लिव्हिंगने कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात १,३५६ सहभागींनी सर्वात मोठे ढोल वादन सादर केले. (कालावधी: अंदाजे २३ मिनिटे)

संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग

गुरुदेव श्री श्री रविशंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर हे जागतिक मानवतावादी, अध्यात्मिक नेते आणि शांतीदूत आहेत. तणाव मुक्त, हिंसा मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अभूतपूर्व अशा जागतिक चळवळीचे नेतृत्व ते करतात.

आणखी जाणून घ्या

६. १२ फेब्रुवारी २०११ – नाट्य विस्मयम

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पुथरीकंदम मैदानावर आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमात १५० सहभागींनी सर्वात मोठे कथकली नृत्य सादर केले. (कालावधी: प्रत्येकी सुमारे २० मिनिटांचे २ कार्यक्रम)

७. ३० जानेवारी २०११ – नाद वैभवम

१२१,४४० लोक असलेला सर्वात मोठ्या गायकवृंद होता आणि हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगने चेन्नईतील पेरुंगलाथूर येथे आयोजित केला होता.

८. ११ नोव्हेंबर २०१० – मेहरान दे रंग

या सर्वात मोठ्या भांगडा नृत्यात २,१०० सहभागींचा समावेश होता आणि हा विक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगने भारतातील लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठ कॅम्पसमध्ये साध्य केला. (कालावधी: अंदाजे १५ मिनिटे)

९. २ नोव्हेंबर २०१० - अन्न ब्रह्म

आर्ट ऑफ लिव्हिंगने अहमदाबाद येथील श्री श्री धाम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वात मोठ्या शाकाहारी बुफेमध्ये ५६१२ वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश होता.

१०. १२ जानेवारी २०१० – अंतर्नाद

आर्ट ऑफ लिव्हिंगने भारतातील पुणे येथील अंतर्नाद या कार्यक्रमात 'वंदे मातरम्' गीत गाण्याचे सर्वात मोठे आयोजन केले होते आणि त्यात १,०४,६३७ सहभागींनी सहभाग घेतला होता. (कालावधी: ५ मिनिटांपेक्षा जास्त)

. २१ नोव्हेंबर २००८ - ब्रह्मनाद

दिल्लीतील नोएडा येथे आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वात मोठा सतारवादक वृंद होता.यात १,०९४ वादकांचा सहभाग होता. (कालावधी: सुमारे ७ मिनिटांच्या ३ सिम्फनी)

१२. २८ नोव्हेंबर २००६ - मोहिनीअट्टम

केरळमधील कोचीन येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रौप्य महोत्सवी समारंभात मोहिनीअट्टम नृत्य सादर करणारे सर्वाधिक १,२०० लोक होते. (कालावधी: अंदाजे १२ मिनिटे)

सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम

जागतिक सांस्कृतिक महोत्सव २०१६

जागतिक सांस्कृतिक महोत्सवाची पुन्हा अनुभूती…

आर्ट ऑफ लिव्हिंगने मार्च २०१६ मध्ये आपला ३५ वा वर्धापन दिन साजरा केला.
या भव्य आठवणींना उजाळा द्या आणि आपल्या जागतिक विविधतेच्या सौंदर्याचा आनंद लुटा.

जागतिक सांस्कृतिक महोत्सव

विविधतेत सुसंवाद साजरा करणे

आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक संयुक्त राष्ट्र मान्यताप्राप्त ना-नफा संस्था आहे. हा महोत्सव आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा झाला होता. यामधील कार्यक्रमांमुळे जगभरातील १५१ देशांमधील ५५ दशलक्षाहून अधिक लोकांना फायदा झाला आहे.

रौप्य महोत्सवी समारंभ

जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी एक ऐतिहासिक मेळावा

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी बंगळुरूमध्ये कार्यक्रमामध्ये एक ऐतिहासिक मार्गदर्शित ध्यान घेतले. यामध्ये १५० हून जास्त देशांतील ३० लाखांहून अधिक लोक एकत्र आले होते आणि अशाप्रकारे देशांच्या सीमांच्या पलीकडे जागतिक शांती, अहिंसा आणि एकता वृद्धिंगत झाली.

आंतरराष्ट्रीय महिला परिषद

मन आणि चेतनेचे रहस्य

आंतरराष्ट्रीय महिला परिषद - जागतिक स्तरावर महिला नेत्यांमध्ये एकजूट निर्माण करते, संवाद आणि कार्यशाळांद्वारे सक्षमीकरण, नेतृत्व आणि शांतता यांना प्रोत्साहन देते.

वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस 

आंतरराष्ट्रीय नेतृत्व परिसंवाद

वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस या द्वारा नैतिक नेतृत्व आणि प्रशासनाला प्रोत्साहन दिले जाते, मूल्यांवर आधारित व्यवसाय पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी संवाद, परिसंवाद आणि भागीदारीसाठी जागतिक व्यासपीठ मिळते.

जागतिक नेतृत्व मंच २०२३

मानवी भविष्य घडवणे

व्यवसाय, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील १००० हून अधिक जागतिक नेत्यांना विचार आणि उपायांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि आपल्या काळातील प्रमुख कॉर्पोरेट आणि सामाजिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि भागीदारी निर्माण करण्यासाठी ग्लोबल लीडरशिप फोरम (GLF) आयोजित केले जाते.

ध्यान: एक जागतिक क्रांती

गुरुदेवांसोबत जग ध्यान करते

संयुक्त राष्ट्रांनी २०२४ मध्ये २१ डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला. या ऐतिहासिक घटनेच्या वेळी गुरुदेवांनी २१ डिसेंबर २०२४ रोजी जगभरातील लाखो लोकांचे मार्गदर्शित ध्यान घेतले.