व्हर्टिगो म्हणजे काय
चक्कर येणे हे व्हर्टिगोचे एक प्रकारचे लक्षण आहे, ज्यामध्ये मेंदूतील समतोल आणि संतुलन बिघडल्यामुळे गरगरल्या सारखे वाटत संतुलन बिघडल्याची भावना दिसून येते. कॅल्शियम किंवा द्रव जमा झाल्यामुळे किंवा अगदी विषाणूंमुळे कानाच्या आतल्या भागावर याचा परिणाम होतो, जिथून आपल्या हालचालींच्या दिशानिर्देशांवर लक्ष ठेवले जात असते. तथापि, हे सिद्ध झाले आहे की काही योगाभ्यासामुळे संतुलन सुधारते आणि मज्जासंस्थेला उत्तेजन मिळते, त्यामुळे चक्कर येण्याचा त्रास(व्हर्टिगो) निश्चितपणे दूर होतो.
कारणे आणि लक्षणे
जेव्हा कानाच्या आतल्या भागाला पुरेसा रक्त प्रवाह मिळत नाही, तेव्हा प्रामुख्याने व्हर्टिगो किंवा चक्कर येणे हा त्रास होतो. “सर्दी” किंवा “फ्लू” ची बाधा आणणारे विषाणू कानाच्या आतल्या भागावर आणि मेंदूशी जोडून असलेल्या मज्जातंतूंवर हल्ला करू शकतात, त्यामुळे देखील व्हर्टिगोचा खूप त्रास होऊ शकतो. कवटीला होणारे कोणतेही नुकसान किंवा बाधा यामुळे मळमळ वाटणे आणि श्रवणशक्ती कमी होणे यासह व्हर्टिगोचा घातक त्रास होऊ शकतो. काही अन्नपदार्थ किंवा हवेतील कण (जसे की धूळ, बुरशी, परागकण, कोंडा इ.) ज्यांची अलर्जी असेल ते देखील ही लक्षणे वाढवू शकतात.
मल्टिपल स्क्लेरोसिस, सिफिलीस, ट्यूमर इत्यादी मज्जातंतूंचे आजार देखील संतुलनावर परिणाम करू शकतात.
व्हर्टिगो उपचारांसाठी योगासने का फायदेशीर आहेत
यात अशी आसने निवडली जातात जी मज्जासंस्था आणि कानाच्या आतल्या भागातील संतुलन केंद्रे सक्रिय करतात, तसेच लक्ष केंद्रित करत एकाग्रता वाढवतात. त्यांचा सिम्पथेटीक मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो तसेच डोके आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. मेंदूच्या पेशींमध्ये निरोगी, शुद्ध रक्तप्रवाह हा व्हर्टिगो बरा करण्याच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. मज्जासंस्थेला उत्तेजित करणारी आणि मेंदूकडे जाणारे रक्त शुद्ध करणारी योगासने उपचार म्हणून सर्वात योग्य आहेत.
व्हर्टिगो रुग्णांसाठी विशेष फायदेशीर असलेले योग व्यायाम:
अशी आसने निवडली जातात जी मज्जासंस्था आणि कानाच्या आतल्या भागातील संतुलन केंद्रे सक्रिय करतात, तसेच लक्ष केंद्रित करतात आणि एकाग्रता वाढवतात. व्हर्टिगोवर मात करण्यासाठी या सोप्या व्यायामांचा सिम्पथेटीक मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो आणि डोके आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
- षण्मुखी मुद्रा
- नाडी शोधन प्राणायाम
- सलंब शीर्षासन
- हलासन
- पश्चिमोत्तानासन
- शवासन
१. षण्मुखी मुद्रा

ही मुद्रा रोज केल्यास मेंदू आणि मज्जासंस्थेला शांतता लाभते आणि चिंता, चिडचिड किंवा राग रोखण्यास आणि कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. यामुळे डोळे आणि चेहऱ्यावरील नसा आणि ऊतींना आराम मिळतो आणि त्या पुनरुज्जीवित होतात.
षण्मुखी मुद्रेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
२. नाडी शोधन प्राणायाम
नाडी शोधन प्राणायामाचे फायदे

ही प्रक्रिया रक्त आणि श्वसन प्रणाली शुद्ध करते. दीर्घ श्वास घेतल्याने रक्तात ऑक्सिजनची वाढ होते आणि श्वसन प्रणाली मजबूत होते आणि मज्जासंस्थेचे संतुलन होते.
३. सलम्ब शिर्षासन
गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे या आसनात अवयवांकडे रक्तप्रवाह वाढतो. हे आसन यकृत, मूत्रपिंड, पोट, आतडे आणि पुनरुत्पादक अवयवांच्या समस्यांवर मात करण्यास मदत करते. हे आसन व्हर्टिगो बरा करण्यासोबतच, अजून काही काळ सराव केल्यास, पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथींना देखील उत्तेजित करते, ज्यामुळे लैंगिक संप्रेरकांच्या वाढीस आणि निर्मितीस मदत होते.
४. हलासन

हलासन हे एक योगासन आहे जे मान, खांदे, पोट आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी देते आणि मोकळे करते. हे आसन मज्जासंस्था शांत करते, ताण कमी करते आणि थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना देखील ते मदतीचे ठरते. हलासन कसे करावे ते शिका.
५. पश्चिमोत्तानासन

हे योगासन ताण कमी करणारे म्हणून काम करते आणि चिंता, राग आणि चिडचिड दूर करते. ते मासिक पाळीला संतुलित करते आणि महिलांनी, विशेषतः प्रसूतीनंतर, करणे अतिशय उपयुक्त ठरते.
पश्चिमोत्तानासन म्हणजे काय ते जाणून घ्या.
६. शवासन

शवासनाचे फायदे :
या आसनाने विश्रांतीची गहिरी, ध्यानस्थ स्थिती येते, जी ऊती आणि पेशींच्या दुरुस्तीस आणि तणावातून मुक्त होण्यास मदत करू शकते. रक्तदाब, चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास देखील या आसनाची मदत होते.
टाळण्यासारखी आसने
सामान्यतः, व्हर्टिगोच्या रुग्णांना अचानक पुढे वाकण्यापासून सावध केले जाते. खालच्या दिशेने तोंड करून केलेली आसने देखील टाळली पाहिजेत. शिवाय, व्हर्टिगोच्या रुग्णांनी चक्कर येऊ नये म्हणून हळूहळू योगासने करावी.
शेवटी, हे सांगायलाच हवे की मेंदूच्या पेशींमध्ये निरोगी, शुद्ध रक्त प्रवाह हा व्हर्टिगोचा त्रास दूर करण्याच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे. मज्जासंस्थेला उत्तेजित करणारे आणि मेंदूकडे जाणारे रक्त शुद्ध करणारे व्यायाम उपचार म्हणून सर्वात योग्य आहेत.