जलनेती म्हणजे काय

जलनेती ही एक अशी पद्धत आहे जी योगींनी रोगमुक्त राहण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अडथळ्यांशिवाय त्यांच्या योगिक पद्धती करताना त्यांचा श्वास योग्यरित्या वापरता यावा यासाठी अवलंबिली. दात घासणे ही दंत स्वच्छता आहे, त्याचप्रमाणे जलनेतीची पद्धत म्हणजे नाकाची स्वच्छता. या पद्धतीत नाकपुड्यापासून घशापर्यंत नाकाचा मार्ग शुद्ध करण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करतात.

जलनेती ही हठयोग प्रदीपिकामध्ये उल्लेख केलेल्या सहा-शुद्धीकरण प्रक्रिया पैकी (षट्कर्म) एक आहे.

आवश्यक असलेल्या गोष्टी

  • एक जलनेतीचे भांडे
  • एक चिमूट मीठ
  • कोमट पाणी

जलनेतीचे भांडे सहसा लहान असते आणि त्याच्या एका बाजूला एक लांब नळी असते. ही नळी प्रक्रियेदरम्यान नाकपुड्यात हळूवारपणे घालता येईल इतकी लहान असते.

जलनेतीचे फायदे

  • दैनंदिन सरावामुळे नाकपुड्या मधील श्लेष्मा व इतर अडकलेली घाण आणि जीवाणू (बॅक्टेरिया) काढून टाकून नाकाची स्वच्छता राखण्यास मदत होते.
  • जलनेती नाकाच्या आतल्या संवेदनशील पेशींना शांत करते, ज्यामुळे नासिकेतील त्वचेचा क्षोभ किंवा ऍलर्जीचा त्रास कमी होऊ शकतो.
  • ही दम्याच्या आजारात उपयोगी आहे. यामुळे श्वास घेणे सोपे होते.
  • यामुळे टिनिटस (कानात आवाज येणे) आणि मध्यकर्णामधील जंतुसंसर्ग कमी होतो.
  • सायनसायटिस किंवा अर्धशिशीचा (मायग्रेनचा) उद्भव कमी होण्यास मदत होते.
  • घसा खवखवणे, टॉन्सिल आणि कोरडा खोकला यासारख्या श्वसनमार्गाच्या तक्रारी कमी होतात.
  • डोळ्यातील वाहिन्या स्वच्छ होतात आणि दृष्टी सुधारु शकते.
  • अनुनासिक मार्ग साफ केल्याने वास (गंध) घेण्याची भावना सुधारण्यास मदत होते आणि त्यामुळे पचन सुधारते.
  • मज्जासंस्था आणि मन शांत होते. तणाव कमी करण्यास देखील मदत होते आणि मनातील संदिग्धता कमी होते.
  • जलनेतीचा नियमित सराव केल्याने लोकांना त्यांचा राग कमी झाल्याचा अनुभव आला आहे.
  • ध्यानाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. ध्यान चांगले होते.

जलनेती करताना घ्यावयाची खबरदारी

  • या प्रक्रियेनंतर नाक व्यवस्थित कोरडे करावे.
  • उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी यावेळी काळजी घ्यावी. जर नाक कोरडे करताना चक्कर येत असेल तर प्रक्रिया सरळ उभे राहून करावी.
  • नाकात पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी कारण त्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
  • इतर कोणत्याही योगिक पद्धतीप्रमाणे, जलनेती तज्ञांकडून शिका.

जलनेती नाक स्वच्छ करण्याबरोबरच तुमचे शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रीकरण करण्यास मदत करते. म्हणूनच, ती दररोज केली पाहिजे. केवळ नाक चोंदलेले असताना किंवा सर्दी असतानाच नाही.

निरोगी जीवनशैली हवी आहे ना

श्री श्री योग तज्ञ डॉ. सेजल शाह म्हणतात, “जलनेतीचे वर्णन ऐकून घाबरु नका. ही प्रक्रिया वाटते तितकी कठीण नाही. सहसा, जेव्हा लोक जलनेतीबद्दल ऐकतात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया असते – ‘मला नाकात पाणी कसे घालता येईल?’ पण एकदा केलं की, तेच लोक म्हणतात – ‘हे खूप सोपं आणि विस्मयकारक आहे! माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा देखील असाच अनुभव आहे.’

श्री श्री योग लेव्हल २ प्रोग्रॅममध्ये जलनेतीचा सराव करायला शिका.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *