वृक्ष – वृक्ष, झाड; आसन – योगासन
आसनाचा उच्चार वृक-शा-सा-न असा होतो
संस्कृत शब्द “वृक्ष” म्हणजे झाड. डाव्या पायावर सरळ उभे राहून उजवा पाय वाकवून उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा. अशा प्रकारे जमिनीवर झाडासारखे उभे रहा. याला “वृक्षासन” म्हणतात.
वृक्षासन कसे करावे
- पाय एकत्र आणि हात बाजूला ठेवून उभे रहा (ताडासन पहा).
- उजवा पाय गुडघ्यात वाकवा, उजवी मांडी वर करा आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीच्या आतील बाजूस शक्य तितक्या वर आणा.
- डाव्या पायावर समतोल साधत, दोन्ही हात डोक्यावर वर करा आणि कोपर न वाकवता तळवे एकत्र करा. साधारण १० पूर्ण श्वासापर्यंत नाकपुड्यातून हळूवार श्वास घेत आसन धरून रहा.
- हात आणि उजवा पाय खाली करा आणि परत ताडासन करा, दोन्ही पाय एकत्र आणि हात बाजूला ठेवून उभे राहा. काही क्षण थांबा आणि उजव्या पायावर पुन्हा करा.
फायदे
- हे आसन आपणास ताजेतवाने करते. आपले पाय, पाठ आणि हात प्रसरण पावतात आणि स्फूर्ती देते.
- हे आपल्या मनात संतुलन आणि समतोल आणते.
- हे एकाग्रता सुधारण्यास मदत करते.
- या आसनामुळे काही सायटीकाच्या केसेसमध्ये आराम मिळाल्याचे आढळले आहे.
- हे पाय मजबूत करते, संतुलन सुधारते आणि नितंब उघडते.
- जे सायटिकाग्रस्त आहे त्यांना मदत करते.
हे आसन कोणी करू नये
जर आपणास मायग्रेन, निद्रानाश, कमी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर हे आसन करणे टाळा. (उच्च रक्तदाब असलेले लोक हे आसन करू शकतात परंतु हात वर न करता. कारण हात वर करण्याने त्यांचा रक्तदाब आणखी वाढू शकतो).
सर्व पहा – उभे राहून करावयाची योगासने.
सर्व योगासने मागील योगासन : प्रसारित पादहस्तासन पुढील योगासन: पश्चिम नमस्कारासनवृक्षासनावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आपणास जितक्या कालावधीसाठी आरामदायक वाटेल तितक्या कालावधीसाठी वृक्षासनाचा सराव करा. प्रत्येक पायावर १ मिनिटापर्यंत आसन धरून ठेवा. हे आसन प्रत्येक पायावर पाच वेळा पुन्हा करू शकता.
आपणास मायग्रेन, निद्रानाश, चक्कर येणे, गुडघे किंवा घोट्याचे दुखणे आणि कमी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास वृक्षासन करणे टाळवे. डोक्यावर हात वर केल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी हात वर करणे टाळावे. त्यांनी प्रत्येक पायावर त्यांचे शरीर संतुलित करावे.
वृक्षासन करण्याबाबतीतचे नियम: आपल्या समोर, दूरच्या वस्तूकडे सरळ पहा. स्थिर नजरेने टक लावून पाहिल्याने समतोल राखण्यास मदत होते. हात आपल्या शरीराच्या बाजूला ठेवून ताठ आणि सरळ उभे रहा. आपला उजवा गुडघा वाकवा आणि उजवा पाय आपल्या डाव्या मांडीवर ठेवा. पाय ठेवण्यासाठी आपण आपला हात वापरू शकता. उजव्या पायाचा तळवा सपाट आणि घट्टपणे मांडीच्या मुळाजवळ ठेवावा. आपला डावा पाय सरळ असल्याची खात्री करा. यास्थितीत स्वतःचा समतोल साधा. पायाचा दबाव मांडीवर पडतो आणि मांडीचा दबाव पायावर पडतो. एकदा आपला समतोल साधला गेला की, एक दीर्घ श्वास घ्या, डौलदारपणे आपले हात बाजूने डोक्यावर वर घ्या आणि तळवे ‘नमस्ते’ मुद्रामध्ये (हात दुमडलेल्या स्थितीत) एकत्र आणा. शरीराला वरच्या दिशेने ताणत राहा. पाठीचा कणा सरळ असल्याची खात्री करा. आपले संपूर्ण शरीर ताणलेल्या लवचिक रबरबँडसारखे असावे. दीर्घ श्वास घेत राहा. प्रत्येक उच्छवासासह, शरीराला अधिकाधिक शिथिल करा. चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. फक्त शरीर आणि श्वासासोबत रहा. मंद उच्छवासासह, हळूवारपणे आपले हात बाजूंनी खाली आणा. हळूवारपणे उजवा पाय खाली ठेवू शकता. आसनाच्या सुरुवातीला जसे उभे होतात तसे ताठ आणि सरळ उभे रहा. उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून ही स्थिती पुन्हा करा. जितक्या कालावधीसाठी आरामदायक वाटेल तितक्या कालावधीसाठी वृक्षासनाचा सराव करा. प्रत्येक पायावर १ मिनिटापर्यंत आसन धरून ठेवा. हे आसन प्रत्येक पायावर पाच वेळा पुन्हा करू शकता.
वृक्षासन करण्याबाबतीतचे प्रतिबंध: आपणास मायग्रेन, निद्रानाश, चक्कर येणे, गुडघे किंवा घोट्याचे दुखणे आणि कमी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास वृक्षासन करणे टाळवे. डोक्यावर हात वर केल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी हात वर करणे टाळावे. त्यांनी प्रत्येक पायावर त्यांचे शरीर संतुलित करावे.
वृक्षासन करण्याबाबतीतचे प्रतिबंध: आपणास मायग्रेन, निद्रानाश, चक्कर येणे, गुडघे किंवा घोट्याचे दुखणे आणि कमी किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्यास वृक्षासन करणे टाळवे. डोक्यावर हात वर केल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी हात वर करणे टाळावे. त्यांनी प्रत्येक पायावर त्यांचे शरीर संतुलित करावे.
उंची वाढवण्यासाठी वृक्षासनाचा लोकांना फायदा झाला आहे. हे करीत असताना पाय ताणले जातात आणि मजबूत होतात. शरीराचे वजन एका पायावर संतुलित ठेवल्यामुळे पायाचे स्नायू बळकट होतात. आपले हात डोक्याच्या वर पसरवताना, आपली मान देखील वर खेचली जाते. हे पीयूष ग्रंथी (पिट्यूटरी ग्रंथी) ला सक्रिय करते जी वाढ संप्रेरक (ग्रोथ हार्मोन) तयार करते.
अनुवंशिकता, जीवनशैलीचे घटक, योग, व्यायाम आणि पोषण हे आपल्या उंचीवर परिणाम करणारे प्रमुख कारणीभूत घटक आहेत. वयाच्या २५ वर्षांनंतर उंची वाढत नाही. उंच दिसण्यासाठी आपण काही मार्ग अवलंबू शकता. जसे आपले वय वाढते, तसे खांदे आणि पाठ झुकल्यामुळे आपली उंची कमी होत आहे असे भासते. योगासनांचा सराव करून उंची कमी होणे टाळता येते.
पाठीचा कणा, नितंब, गुडघे, घोटा आणि हात वाकवले जातात. नितंब बाहेरून वळतात आणि उघडतात. घोटा मागे वाकवला आणि आकुंचन पावला जातो.
वृक्षासन करण्याबाबतीतचे प्रतिबंध: *मायग्रेन *उच्च किंवा कमी रक्तदाब (उच्च रक्तदाब असलेले लोक वृक्षासन करू शकतात परंतु त्यांनी हात वर करणे टाळावे, कारण असे केल्याने रक्तदाब आणखी वाढू शकतो) *निद्रानाश.