क्रोध आणि सत्य !! Anger and truth in Marathi

क्रोध / राग कां येतो?

ज्या व्यक्ती क्रोध करतात त्या निव्वळ सत्याचा आधार घेऊन क्रोधीत होतात. पण सत्याची कल्पना करणे खूपच सीमित आहे. या पृथ्वीतलावर काहीही घडू शकते, आपणास फक्त धैर्य राखणे गरजेचे आहे.

सत्याची इच्छा ठेवणे, मला सत्यानेच जगायचे आहे असे म्हणत राहणे आणि सर्वांनी आत्ता लगेच सच्चे बनावे, हे शक्य नाही.

सर्वांनी खरेपणाने आणि चांगुलपणाने वागावे हि इच्छा ठीक आहे पण मग लोकांना खूप वेळ द्यावा लागेल. सहनशीलतेने सच्चाईची इच्छा केल्यास राग येत नाही. नाहीतर आपण म्हणतो कि, मी सच्चा आहे, आणि इच्छा धरतो कि सर्वांनी माझ्याप्रमाणेच असावे, मग राग येतो. आणि जेंव्हा राग येतो तेंव्हा आपली सच्चाई आणि अच्छाई आपण स्वतः गमावतो. एखादी व्यक्ती वाईट वागत असल्यास आपण क्रोधीत होतो हे देखील तेवढेच वाईट आहे.

समजा कोणीतरी हि जागा स्वच्छ केली नाही आणि कचरा तसाच पडला आहे. तुम्ही येथे येता आणि रागावता. त्या व्यक्तीने कचरा साफ न करून एक चूक केली. हे काही बरोबर नाही केले. पण याच गोष्टीवर तुमचे चिडणे, ओरडणे हि दुसरी चूक होय.

रागावर नियंत्रण । Anger Management in Marathi

दोन चुका एका चुकीला ठीक करू शकत नाही. जर एखाद्याने चूक केली असेल तर त्याला शांतपणे दोन तीनदा समजाऊया, त्याला प्रशिक्षित करूया. प्रशिक्षक बनण्यासाठी तुमच्यामध्ये खूप धीर हवा. शाळेतील शिक्षकांची एक समस्या आहे. त्यांनी मुलांना एकच गोष्ट दहादा समजाऊन सांगितली तरी ते ऐकत नाहीत. मुलांच्या मध्ये ध्यान कमी असण्याचे लक्षण असते. मुले त्यावर लक्ष देत नाहीत. म्हणून सहनशीलतेची आवश्यकता असते. म्हणून धैर्य हा एक सद्गुण आहे, सहा संपत्ती मधील एक संपत्ती आहे. शम (मानसिक शांती), दम (आत्म संयम), उपरती (संसारिक सुख आणि भौतिक साधनापासून अलिप्त), तितिक्षा (सहनशक्ती), श्रद्धा (विश्वास) आणि समाधान, संतोष आणि धैर्य मिळवण्यासाठी असते. हे अत्यंत गरजेचे आहे.

सुदर्शन क्रिया (Sudarshan Kriya) स्वतःला शांत करण्यास खूप परिणामकारक आहे. तुम्ही तिचा अनुभव घेऊ शकता. सुदर्शन क्रिया आर्ट ऑफ लिविंगच्या हप्पिनेस प्रोग्रॅम (Happiness Program) मध्ये शिकवली जाते.

आणखी माहिती साठी तसेच आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी संपर्क –website.india@artofliving.org