icon-love

४४ वर्षांची परंपरा

icon-earth-globe

१०,००० पेक्षा जास्त संपूर्ण जगभर ध्यान केंद्रे

icon-location

१८२ देश

icon-group

८० करोड़ पेक्षा जास्त लोकांनी अनुभवलेले

जागतिक ध्यान दिन: एक जागतिक क्रांती

चार दशकांपासून, गुरुदेवांनी लाखो लोकांना आपल्या स्वतःतील शक्ती जाणून घेण्यासाठी प्रेरित केले आहे; व्यक्ती,समाज आणि राष्ट्रांमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. युद्धे थांबवणे, अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्यास मदत करणे ते शिक्षणात क्रांती घडवून आणण्यापर्यंत आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यापर्यंत, गुरुदेवांनी ध्यानाचा वापर करुन प्रचंड बदल घडवून आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांनी तुरुंगातील असंख्य कैद्यांचे, ग्रामीण महिलांचे जीवन बदलले आहे आणि तरुणांसाठी अमली पदार्थ मुक्त विद्यापीठ परिसर तयार करण्यास, कॉर्पोरेट कल्याणाला चालना देण्यास आणि जागतिक सुसंवादाला चालना देण्यास मदत केली आहे, ज्याचा परिणाम १८० हून अधिक देशांमध्ये लाखो लोकांवर झाला आहे.

२०२४ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी २१ डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला. या ऐतिहासिक घटनेसाठी, २१ डिसेंबर २०२५ रोजी जगभरातील लाखो लोक गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान करतील.

सक्रीय ध्यान

गुरुदेवांनी आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना केली.

१९८१

गुरुदेवांना युक्रेमधील एडिनबर्ग येथे स्कॉटिश संसदेत भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

२००४

भारतातील बेंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या रौप्य महोत्सवी समारंभात १५० हून अधिक देशांतील २५ लाखांहून अधिक लोक गुरुदेवांसमवेत ध्यान करण्यासाठी एकत्र आले. देशादेशातील सीमा जणुकाही नाहिशा झाल्या आहेत.

२००६

वॉशिंग्टन डी सी येथील जॉन एफ. केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे गुरुदेवांनी मानवी मूल्यांसंबंधी कार्य करणाऱ्या संस्थेची घोषणा केली.

२००७

जर्मनीतील बर्लिन येथील ऑलिंपिक स्टेडियममध्ये १५१ देशांतील ७०,००० हून अधिक लोक एकत्र आले आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्याचा आणि विविधतेचा उत्सव साजरा केला.

२०११

अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे गुरुदेवांबरोबर १,५०,००० लोकांनी लाइव्ह संगीत आणि मूक ध्यानाचा अनोखा मिलाफ अनुभवला.

२०१२

आय मेडीटेट आफ्रिका - आफ्रिकेत शांततेला प्रोत्साहन देणारी एक अतिशय सोपी मोहीम सुरु केली, मुख्य प्रवाहातील शांतता,मुलभूत घटक म्हणून ध्यानाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे - ज्याचा परिणाम अखेर आफ्रिकेतील लाखो लोकांवर झाला.

२०१३

इराकमधील सर्वात धोकादायक युद्धग्रस्त भागांना गुरुदेवांनी भेट दिली आणि लोकांना भेटून त्यांचे सांत्वन केले.

२०१५

“जागतिक सांस्कृतिक महोत्सव २” जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या रंगमंचावर ३७.५ लाखाहून अधिक लोकांनी गुरुदेवांसमवेत ध्यान केले आणि १०० हून अधिक देशांमधील लोकांनी रोमांचक सांस्कृतिक सादरीकरण केले.

२०१६

पन्नास वर्षे जुना संघर्ष संपवण्यासाठी ध्यानाची शक्ती दाखविण्याच्या गुरुदेवांच्या प्रयत्नांमुळे FARC-कोलंबिया शांतता करार शक्य झाला आहे.

२०१६

रॉयल अल्बर्ट हॉल, जे सामान्यतः विविध संगीत आणि प्रतिष्ठित नाट्य सादरीकरणांचे ठिकाण आहे, तेथे जेव्हा गुरुदेवांनी हजारो प्रेक्षकांना सखोल ध्यान करण्यासाठी मार्गदर्शन केले तेव्हा ते ठिकाण नीरव शांततेत बुडाले.

२०१६

गुरुदेवांना "ध्यान ते मध्यस्थी" या विषयावर युरोपियन संसदेत भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले.

२०१९

कोविड महामारीच्या काळात, गुरुदेव दोन महिन्यांहून अधिक काळ दिवसातून दोन वेळा लाइव्ह ध्यान घेत असत. जेणेकरुन अलिकडच्या काळात जगाने अनुभवलेल्या सर्वात तणावपूर्ण काळात लाखो लोकांना आंतरिक शक्ती आणि सांत्वन मिळू शकले.

२०२०

"मी शांतीच्या बाजूने आहे" - युरोपमधील संघर्ष आणि युद्धाच्या काळात लोकांना आंतरिक शांती मिळविण्यात मदत करण्यासाठी गुरुदेवांनी युरोप आणि अमेरिकेतील देशांचा दौरा केला आणि ध्यानधारणेचे नेतृत्व केले.

२०२२

वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल मॉलमध्ये जागतिक सांस्कृतिक महोत्सवासाठी ११ लाख लोक जमले, हा १७,००० जागतिक कलाकारांच्या उत्साही सादरीकरणाचा आणि गुरुदेवांच्या नेतृत्वाखाली शांत ध्यानाचा एक अनोखा मिलाफ आहे.

२०२३

मी का सामील व्हावे?

icon

एक ऐतिहासिक क्षण

इतिहासाबद्दल वाचण्यापेक्षा त्याचा भाग असणे चांगले. "मी संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या जागतिक ध्यान दिनाचा भाग होतो" असे सांगण्यास कोणाला आवडणार नाही?

icon

जागतिक ध्यान

जगभरातील लाखो लोक एकत्र ध्यान करणार आहेत आणि जेव्हा हे घडेल तेव्हा अशा ध्यान करण्याचे फायदे अनेक पटीने वाढतील.

icon

ध्यानाचे गुरु

गुरुदेवांसमवेत ध्यान करणे ही केवळ एक घटना नाही - तो एक अनुभव आहे!

जर तुम्ही श्वास घेऊ शकत असाल तर तुम्ही ध्यान करु शकता!

मला अजूनही काही शंका आहेत...

आधी काही पात्रता असणे जरुरी आहे कां ?

जर तुम्ही श्वास घेऊ शकत असाल तर तुम्ही ध्यान करु शकता!

लहान मुले कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात का?

५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे (हो, तुम्ही बरोबर वाचले आहे) या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.

ध्यानाचा पूर्व अनुभव असणे गरजेचे आहे का?

नाही! ध्यानधारणेचे तज्ज्ञ असण्याची आवश्यकता नाही – केवळ स्वतःला आणि आपल्या श्वासाला बरोबर घेऊन या.

कार्यक्रमापूर्वी मी ध्यान करुन बघू शकतो का?

हो, तुम्ही गुरुदेवांच्या युट्यूबवरील "मेडिटेशन्स फ्रॉम गुरुदेव" या ध्यान चॅनेलवर जाऊ शकता आणि शेकडो मार्गदर्शित ध्यानांमधून निवड करु शकता.

डिसेंबर २०२४ मध्ये, न्यू यॉर्कमधील वन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून गुरुदेवांनी घेतलेल्या ध्यानासाठी ८५ लाखांहून अधिक लोक ऑनलाइन सामील झाले.

२०२५ साठी तुमची मोकळी जागा राखीव ठेवा!

    *
    *
    *