नवशिक्यांकरिता ध्यान करण्याच्या ८ सूचना (meditation for beginners in Marathi)

ध्यानाच्या तयारीकरिता केवळ काही वेळ दिल्याने, तुम्हाला ध्यानाचा गहन अनुभव येऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या सुलभतेकरिता ध्यानाच्या तयारीकरिता खाली काही सूचना दिल्या आहेत. हे करून झाल्यानंतर ध्यान सुरु करण्याकरिता खालील मार्गदर्शित ध्यान यावर क्लिक करावे.

# १. सोयीस्कर वेळ निवडा.

 

 

 

 

 

 

 

ध्यान ही मूलतः विश्रांतीची वेळ आहे, म्हणून ते करणे हे संपूर्णपणे तुमच्या सोयीनुसार व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही आत्ता करीत आहात त्या ध्यानानंतरचे सर्व ध्यान करण्याकरिता अशी वेळ निवडा की त्यावेळेत तुम्हाला कोणताही व्यत्यय येणार नाही आणि विश्रांत व्हायला तसेच आनंद लुटायला तुम्ही पूर्णतः मोकळे असाल.

सूर्योदय आणि सूर्यास्त, जेव्हा निसर्ग दिवस आणि रात्र यांच्या रुपांतरामध्ये असतो तेव्हाच्या या दोन वेळा ध्यानाकरिता आदर्श आहेत.

 

# २. शांत जागेची निवड करा.

 

 

 

 

 

 

ज्याप्रमाणे सोयीस्कर वेळ निवडणे जरुरी आहे त्याचप्रमाणे अशी जागा निवडा जिथे तुम्हाला व्यत्यय येणार नाही.

शांत आणि निःशब्द परिसरामुळे ध्यानाच्या अनुभवाचा अधिक आनंद लुटता येतो आणि संपूर्ण विश्रांती मिळते.

# ३.सुखासनामध्ये बसावे.

 

 

 

 

 

 

तुमच्या शरीराची ढब याने बराच फरक पडतो. तुम्ही शिथिल आहात, सुखावह आणि स्थिर आहात याची खात्री करा.

पाठीचा कणा सरळ ठेवून ताठ बसा, खांदे आणि मान यांना ढिले सोडा आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डोळे बंद ठेवा.

ध्यान करण्याकरिता पद्मासनातच बसावे हा ध्यानाविषयीचा एक मोठा गैरसमज आहे. 

# ४. रिकाम्या पोटी ध्यान साधना करावी.

 

 

 

 

 

 

जेवण्याच्या आधी ध्यान करणे ही चांगली वेळ आहे.

जेवल्यानंतर ध्यान केल्यास, तुम्ही झोपी जाण्याची शक्यता असते. मात्र, तुम्ही एकदमच उपाशी असताना ध्यान करण्याची स्वतःवर बळजबरी करू नका.

भुकेच्या मुरड्यामुळे तुम्हाला त्रास होईल किंवा तुम्ही पूर्ण वेळ अन्नाचाच विचार करीत बसाल. अशा परिस्थितीत, तुम्ही जेवण जेवल्यानंतर दोन तासांनी ध्यान करू शकता.

# ५.सुरुवात थोड्या हलक्या व्यायामांनी करा.

 

 

 

 

 

 

ध्यानाला बसण्याअगोदर थोडे हलके व्यायाम किंवा सूक्ष्म योग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, आळस आणि अस्वस्थता निघून जाते आणि शरीर हलके वाटू लागते.

तुम्ही स्थिरपणे अधिक काळासाठी बसू शकाल.

# ६.थोडे दीर्घ श्वास घ्या.

 

 

 

 

 

 

 

ध्यान करणे सोपे व्हावे म्हणून ही पुन्हा एकदा तयारी आहे. ध्यान करण्याच्या आधी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे तसेच थोडे नाडीशोधन प्राणायाम करणे हे नेहमीच उपयुक्त ठरते.  

यामुळे श्वासाचा ताल स्थिर होण्यास मदत होते आणि ते मनाला शांत ध्यानस्थ अवस्थेत घेऊन जाते.

# ७.चेहऱ्यावर मंद हास्य ठेवा.

 

 

 

 

 

 

तुम्हाला स्वतःला फरक लक्षात येईल.

मंद हास्य सतत ठेवल्याने तुम्हाला शिथिल, शांत वाटते आणि ते ध्यानाच्या अनुभवला वर्धित करते.

# ८. तुमचे डोळे हलके हलके मंद गतीने उघडा.

 

 

 

 

 

 

 

जेव्हा तुमचे ध्यान संपत येते तेव्हा डोळे उघडण्याची आणि त्वरित कामाला लागण्याची घाई करू नका.

स्वतःबद्दल आणि तुमच्या सभोवतालच्या परिसराबाबत जागरूक होत तुमचे डोळे मंद गतीने आणि सावकाश उघडा.

 

ध्यान करण्यास तयार आहात का?
मार्गदर्शित ध्यान (Guided Meditation)वर क्लिक करा आणि ताजेपणा अनुभवा.