रजाक रहमान आणि नमिता मलिक यांनी शिक्षणाच्या सामर्थ्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ग्रामीण त्रिपुरामध्ये प्रवास केला. आणि त्यांनी जे पाहिले ते म्हणजे, राज्याच्या सर्वात दूरच्या भागात या संस्कृतीचा सर्वोच्च समानता आणणारा घटक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मोफत शाळांना धन्यवाद देत आहेत.
ज्या जगात स्विमिंग पूल आणि वातानुकूलित खोल्यांच्या संख्येवर शाळांचे मूल्यांकन केले जाते, त्या जगात त्यांना ‘शाळा’ मानले जात नाही. पण त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या संदर्भात बघितले तर पुढच्या पिढीसाठी फक्त आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मोफत शाळा, आशेचा किरण बनतात. ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील दुर्गम भागात आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे चालवल्या जाणाऱ्या ४१ मोफत शाळांची ही कथा आहे. या शाळा केवळ गरीब मुलांना मोफत शिक्षण देत नाहीत तर आसपासच्या समुदायांमध्ये दूरगामी सामाजिक परिवर्तनासाठी केंद्रबिंदू म्हणून काम करत आहेत.
अमरसिंग जमातिया, पश्चिम कुफिलॉंग, दक्षिण त्रिपुरा जिथे एक शाळा आहे, येथील स्थानिक नेते यांचे हे विधान, “या शाळेने या समाजातील मुलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या कलागुणांची तर भरभराट झाली आहेच, पण त्यांच्यात सामाजिक आणि नैतिक मूल्येही वाढली आहेत.” हे विधान या शाळांमधून लाभ घेणार्या स्थानिकांच्या भावना व्यक्त करतात. राज्यभरातील ४१ शाळा १,८५५ मुलांना शिक्षण देत आहेत. गणवेश, पुस्तक, शाळेचं दप्तर आणि माध्यान्ह भोजन यासह सर्व सुविधा पूर्णपणे मोफत पुरवल्या जातात.
बंदुकीच्या निशाण्यावरील शिक्षण
या शाळा त्रिपुरातील दुर्गम ठिकाणी आहेत. “त्रिपुरातील बहुतेक गावे २००० ते २००८ पर्यंत बंडखोरीमुळे ग्रासलेली होती. कोणीही या भागात जाण्याचे धाडस केले नाही कारण अपहरण आणि हत्येच्या घटना घडल्या आहेत,” असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्यभरातील या शाळांचे कामकाज पहाणारे स्वयंसेवक स्वपन पटारी स्पष्ट करतात.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवक यांना सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून येथे काम करावे लागले. त्रिपुरातील शालेय प्रकल्पाचे समन्वयक देबब्रत बनिक, दक्षिण त्रिपुरातील मलसूमपारा येथे शाळा सुरु करण्याचे काम करत असताना त्यांना सामोरे जावे लागलेल्या एका भयानक घटनेची आठवण होते. “मला शाळा सुरू करण्यासाठी ‘गावातील प्रचंड दहशत असलेल्या व्यक्ती ’कडून‘ परवानगी ’घेण्यास सांगण्यात आले. मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो शेजारी एके ४७ रायफल घेऊन बसला होता! तेव्हा मला कळले की तो TNLF (ट्रायबल नॅशनल लिबरेशन फ्रंट) चा नेता आहे. या भागात सशस्त्र चळवळ चालवणारा नेता! त्याच्या सुरुवातीच्या या पवित्र्याने मी घाबरलो, पण त्याने नंतर परवानगी दिली! तो म्हणाला, की ते गावासाठी चांगले करण्याचा हेतू असलेल्या कोणालाही मी त्रास देणार नाही.”
त्यांना स्वप्न बघायला शिकवतो
शाळा उघडण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगला बंदुकीपेक्षा “पालकांचे जागरुक नसणे” यावर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागला, शाळा अशा ठिकाणी आहेत, जिथे अशिक्षित आणि भूमिहीन मजुरांचे वर्चस्व आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलाच्या शिक्षणाला जास्त महत्त्व देत नाहीत. जेव्हा पालक शेतात जातात तेव्हा अनेक मुलांना शेतात काम करण्यास किंवा त्यांच्या लहान भावंडांची काळजी घेण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे अनेक मुले शाळेत जात नाहीत. शिवाय, इतर स्थानिक शाळांची स्थिती पालकांसाठी निराशाजनक होती. इतर स्थानिक शाळांमध्ये शिक्षक येत नाहीत. “दुपारच्या भोजनासाठी जे दिले जाते तेच खाण्यासाठी मुले तेथे जातात. त्यामुळे आमच्या मुलांना तिथे पाठवून आम्हाला काहीच उपयोग वाटला नाही,” भूमिहीन मजूर आणि दोन मुलांचे वडील मनोज कांती चिरन सांगतात.
या पार्श्वभूमीवर, पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायला पटवून देणं सोपं काम नाही. गुलारीबारी येथील शाळेचे दैनंदिन कामकाज पहाणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे ३० वर्षीय युवाचार्य (युवा नेते), बुध्दा कुमार स्पष्ट करतात, ज्यांनी हे दिवस अनुभवले आहेत, “सुरुवातीला आम्ही घरोघरी जाऊन पालकांची समजूत काढली. त्यांना त्यांच्या मुलांना स्थानिक हायस्कूलमध्ये पाठवण्यात काही अर्थ दिसत नव्हता ज्यामध्ये एकूण १४ वर्गांसाठी फक्त सहा शिक्षक आहेत,”
गुलारीबारी, पश्चिम त्रिपुरा येथील श्री श्री सेवा मंदिरात इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलाची पाठ थोपटत, मुलाचे वडील पुढे म्हणाले. “आता ही शाळा (श्री श्री सेवा मंदिर) आमच्या मुलांना खरे शिक्षण देत आहे आणि आम्ही त्यांच्या उज्ज्वल भविष्याची आशा करू शकतो,” या शाळेने त्यांना शिक्षणात इतका आत्मविश्वास दिला आहे की आज ते आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत.
मने जिंकणे
गुलारीबारीतील आर्ट ऑफ लिव्हिंगचे आणखी एक स्वयंसेवक देबब्रत बनिक म्हणतात, शाळा सुरु करण्यापूर्वी आम्ही जी ग्रामस्थांची नवाचेतना शिबिरे घेतली, त्याचा ग्रामस्थांची मनोभूमिका बदलण्यामध्ये फार उपयोग झाला. पालकांमध्ये नवीन जागरुकता आली. त्यामुळे शाळेत ८० टक्के हजेरी व शाळा सोडून जाण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य!! परिसरातील जनतेचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की ते त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रोत्साहन देत आहेत.
गुलारीबारीतील आर्ट ऑफ लिव्हिंगचे आणखी एक स्वयंसेवक शामचरण देबवर्मा स्पष्ट करतात. “आमचा सर्वात मोठा फायदा हा होता की आम्ही शाळे व्यतिरिक्त इतर क्षेत्रात केलेल्या वैद्यकीय शिबिरे, आरोग्य आणि स्वच्छता मोहिमेमुळे पालक आमचे ऐकतात,” परिसरातील जनतेचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की ते त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास प्रोत्साहन देत आहेत. जे पश्चिम कुफिलॉंग (दक्षिण त्रिपुरा) शाळेत शिकवतात, ते उत्तम देबनाथ सांगतात “पालक खरोखरच शिक्षक म्हणून आमचा आदर करतात आणि त्यातून हे दिसून येते की, ते आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला महत्त्व देतात,” पश्चिम त्रिपुरातील गौरांगटिल्ला येथे पालक आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतके प्रेरित झाले आहेत की त्यांनी आपल्या मुलांना शाळेत नेण्यासाठी वाहन लावले आहे आणि दरमहा २०० रुपये खर्च केले आहेत. काही शाळांमध्ये, ६० वर्षाचे ज्येष्ठ नागरिक, आपल्या नातवंडांना घेण्यासाठी दूरच्या खेड्यातून आलेले दिसतात.
हा सर्वोत्तम कार्यक्रम होता.
श्रीकृष्णा
स्त्री-पुरुष समान भागीदार
विशेष म्हणजे या मूक ज्ञान क्रांतीचे नेतृत्व महिलाच करत आहेत. अनेक शाळांमध्ये, शाळा सुटण्याची आणि मुलांना घरी घेऊन जाण्याची वाट पाहणाऱ्या महिलांच्या रांगा दिसल्या. काही शाळांमध्ये असे आढळून आले की, मुले शाळेत बसतील याची खात्री करण्यासाठी महिला संपूर्ण दिवस बसून रहातात! पण पुरुषही मागे नाहीत. काही ठिकाणी ते जमीन उपलब्ध करून देत आहेत, काही ठिकाणी ते स्वतः शाळेच्या इमारती बांधत आहेत, तर काही ठिकाणी ते शिक्षकांचे प्रशिक्षण प्रायोजित करत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, हा कार्यक्रम सर्वोत्तम होता.
गौरंगटिल्लामध्ये, स्थानिक क्लबने आधी स्वतःसाठी राखून ठेवलेली संपूर्ण जमीन श्री श्री सेवा मंदिराला दान केली आहे. आणि इशानपूर (पश्चिम त्रिपुरा) मध्ये स्थानिक क्लबच्या इमारतीतच शाळा चालवली जाते. “ही इमारत स्थानिक क्लबसाठी बांधण्यात आली होती, परंतु क्लबचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगला शाळा चालवण्यासाठी देऊ केली आहे. आणि आज शाळा खूप बदल घडवून आणत आहे आणि परिसराच्या वाढीस मदत करत आहे,” न्यू स्टार क्लबचे सचिव निर्मल दास सांगतात. पश्चिम त्रिपुराच्या खोवाई विभागांतर्गत शांतीनगरमध्ये, शाळेची नवीन इमारत स्थानिकांच्या मदतीने बांधण्यात आली.
शिक्षणाने आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो आणि स्वतःचे घरही चांगले करायला प्रवृत्त करू शकतो. ही दृष्टी या अशिक्षित पालकांना कशी मिळते? मलसूमपारा गावातील सुनई भक्तमल मलसूम सांगतात. “आर्ट ऑफ लिव्हिंगचा YLTP (युथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम) केल्यानंतर, २००८ मध्ये जेव्हा गुरुजी- परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर, अरुणाचल प्रदेशात आले तेव्हा मी त्यांना भेटलो. मी उपस्थित असलेल्या ग्रामीण तरुणांच्या सभेला संबोधित करताना, गुरुजींनी आमच्या भागात मोफत शाळा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझ्या गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सर्वात मोठी अडचण होती योग्य इमारत शोधणे. शेवटी, मी माझे स्वतःचे घर दान करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आमच्या कडे खूप कमी मुले होती, पण आता आमच्याकडे ७५ पेक्षा जास्त मुले आहेत,”
दर्जेदार शिक्षण
आर्ट ऑफ लिव्हिंग शाळा त्रिपुराच्या ग्रामीण भागात आणत असलेल्या उच्च दर्जाच्या शिक्षणाबद्दल प्रत्येक पालक आनंदी आहेत. शांतीनगरच्या सपना देब सांगतात, “आम्ही ज्या शहरांच्या सुविधाबद्दल ऐकतो त्या आमच्याकडे नाहीत, पण या शाळेतील शिक्षणाचा दर्जा इतका चांगला आहे की आम्ही एका विकसित शहरात राहतो असे आम्हाला वाटते.” सपना देब हिची शाळेशी खूप भावनिक जवळीक आहे. लग्नानंतर आठ वर्षे ती अपत्यहीन होती. त्यानंतर तिने आर्ट ऑफ लिव्हिंगचा भाग पहिला कार्यक्रम केला आणि त्यानंतर लगेचच ती गर्भवती राहिली. आज तिची मुलगी चार वर्षांची असून आर्ट ऑफ लिव्हिंग शाळेत शिकत आहे.
एका गावातून दुसर्या गावात, एका शाळेतून दुसर्या शाळेत, तुम्ही नेहमीच अनोखे परिवर्तन पाहू शकता. सतरंजन देबवर्मा यांची मुलगी गुलारीबारी येथील नर्सरी मध्ये शिकते. ते म्हणतात, “आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाळेत जाणारी मुले इंग्लिश बोलायला शिकतात.” संजीव दास यांचा मुलगा बागबासा, पश्चिम त्रिपुरा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकतो. ते म्हणतात, “या शाळेतली मुले वेगळीच आहेत. ती घरी अभ्यास करायला आतुर असतात. अशा प्रकारे शिक्षकांनी शिक्षण रंजक केले आहे”.
“आर्ट ऑफ लिव्हिंगने या भागात दर्जेदार शिक्षण आणले आहे,” शांतीनगरच्या पंचायत सदस्य काजलराणी देववर्मा सांगतात. “या शाळेमुळे गावातील सर्व कुटुंबांना दर्जेदार शिक्षण मिळते आणि तेही इंग्रजी माध्यमात जे गावकऱ्यांच्या आवाक्या बाहेरचे होते. मुलांचा सर्वांगीण विकास आश्चर्यकारक आहे,” स्थानिक पंचायतीचे प्रधान रवींद्र दत्ता या प्रतिक्रियेशी सहमत आहेत.
“येथे इयत्ता पहिलीची मुले राष्ट्रगीत गाऊ शकतात तर इतर स्थानिक शाळांचे सहावीचे विद्यार्थी गाऊ शकत नाहीत,” पश्चिम कुफिलॉंगचे अमर सिंह यांनी सांगितले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मोफत शाळांमधून मिळालेल्या प्रेरणेमुळे अनेक सरकारी स्थानिक शाळांमध्येही सुधारणा होत आहेत. “आमच्या भागातील अनेक अंगणवाडी केंद्रे यशस्वी आर्ट ऑफ लिव्हिंग शाळांनी उभ्या केलेल्या निरोगी स्पर्धेमुळे पुन्हा सक्रिय झाली आहेत,” असे निरीक्षण समीर मुझुमदार, दक्षिण त्रिपुरातील कलशी येथील स्थानिक नेते यांनी नोंदवले.
समग्र धडा
केवळ चांगल्या शिक्षणा शिवाय, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मोफत शाळांमध्ये शिकणार्या मुलांची सर्वांगीण वाढ ही लोकांच्या हृदयाला भिडणारी गोष्ट आहे. “येथे चांगल्या शिक्षणाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते. कला, योग आणि ध्यान सुद्धा शिकवले जाते. त्यांची वर्तणूक आणि शिस्तीच्या क्षेत्रात सर्वात मोठी प्रगती दिसून येते. हे उल्लेखनीय आहे कारण या मुलांना घरात पोषक वातावरण नाही,” गौरंगटिल्ला शाळेत गेली चार वर्षे शिकवणारे पदवीधर सुदांगशु दास यांनी हे मत नोंदवले आहे. कमी पगारात जास्त तास काम करूनही शाळेत काम करण्यामागे त्यांनी या दूरगामी परिवर्तनाचे कारण सांगितले. ग्रामीण त्रिपुराच्या उज्वल भविष्यासाठी खडतर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे ते एकटे नाहीत.
मलसूमपारा शाळेत शिकवणारे प्रणव मंडी दररोज २० किमी सायकल वरुन ये जा करतात. सुदांगशु म्हणतात, “येथील मुलांना तणावमुक्त वातावरणात खूप जास्त संधी मिळत आहेत आणि आम्ही हे जवळून पहात आहोत. “दुसऱ्या स्थानिक शाळेत ३५ वर्षे शिकवल्यानंतर मी निवृत्त झालो. पण इथल्या मुलांमध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे, ते मी घडवून आणू शकलो नाही. शिक्षणाची पातळी खूप वरची आहे आणि पद्धत वेगळी आहे. येथे मुले स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकत आहेत,” गौरंगटिल्ला शाळेचे प्रभारी सुशील चंद्र देब यांनी सांगितले.
अभ्यासेतर कार्यक्रमांचा लाभ
या शाळा विविध समुदाय आणि संस्कृतींच्या मिश्रणास प्रोत्साहन देतात. बहुतेक शाळांमध्ये आदिवासी समाज, बंगाली हिंदू आणि बंगाली मुस्लिम विद्यार्थी यांचे मिश्रण आहे. “पूर्वी हे समुदाय वेगवेगळे राहत होते. ही शाळा विविध समुदायांना एकत्र आणण्याचे मोठे काम करत आहे. “त्यांना पाहिल्यावर तुम्हाला सर्व समुदायातील लोक सापडतील”, दक्षिण त्रिपुरातील गर्जी येथील शाळेचे समिती सदस्य सुब्रता आचार्य सांगतात, त्यांनी आपल्या मुलांना घेण्यासाठी आलेल्या महिलांच्या ओळीकडे निर्देश केला. बुरखा घातलेल्या स्त्रिया आणि हिंदू स्त्रिया एकमेकांशी मजेत गप्पा मारताना पाहिल्यावर त्याच्या एकोप्याची साक्ष दिसून आली.
आरोग्य आणि स्वच्छता हे आणखी एक क्षेत्र आहे, जिथे या शाळा ग्रामीण त्रिपुरामध्ये क्रांती घडवत आहेत. केवळ मुलांचेच नव्हे तर पालकांचेही आरोग्य नियमन करण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. “आम्हाला वैद्यकीय शिबिरांचा खूप फायदा झाला आहे,” बिथी राय सांगते, तिची मुलगी गर्जी शाळेत शिकते. कलशी येथे शाळेने सर्व मुले, त्यांचे पालक आणि इतर ग्रामस्थांसाठी हिपॅटायटीस लसीकरणाचे आयोजन केले होते. या भागात काम करणारे युवाचार्य नंदलाल भौमिक असे सांगतात की, “ही शाळा परिसरातील आरोग्य आणि स्वच्छतेसाठी एक आदर्श म्हणून काम करत आहे. गावकरी आमच्या आरोग्य आणि स्वच्छता मोहिमेबद्दल अधिक ग्रहणशील होत आहेत”.
त्रिपुरामध्ये तळागाळातील क्रांतीच्या या कथेला एक आर्थिक बाजू देखील आहे. या शाळा केवळ मोफत शिक्षणच देत नाहीत, तर पालकांसाठी बचतही करत आहेत. जयंता मुझुमदार, अल्पकालीन विमा एजंट ज्यांची मुलगी कलशी येथील शाळेत शिकत आहे ते सांगतात की, “आम्हाला आमच्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवायचे असेल तर आम्हाला दररोज किमान ५० रुपये वाहतुकीसाठी खर्च करावे लागतील. ही शाळा आम्हाला ते पैसे वाचवण्यास मदत करत आहे,” आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बहुतेक शाळा अशा ठिकाणी आहेत जिथे सर्वात जवळची खाजगी शाळा खूप अंतरावर आहे, त्यामुळे या शाळांमध्ये जाणे स्वस्त आहे.
समुदायांचे सक्षमीकरण
केवळ लहान मुलेच नव्हे तर प्रौढांनाही सक्षम बनवले जात आहे. गुलारीबारी शाळेतील शिक्षिका रेश्मा देववर्मा सांगतात, “आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळा केल्यानंतर, मला माझ्या क्षमतेवर इतका विश्वास वाटला की मी आता गावातील शाळेत शिकवू शकेन. मी सरकारी शाळेतून माध्यमिक स्तरापर्यंत शिकले असले तरी स्वतःहून काही करण्याचा आत्मविश्वास नव्हता. पण, आता मी शाळेत शिकवतेय,” आणखी एक मलसूमपारा येथील शांती राय. तिला नववीपर्यंतच शिक्षण घेण्याची संधी मिळाली. “माझ्या गावातील मुलांना संधी नाही म्हणून शिक्षण नाही असे होऊ नये, याची काळजी घेण्याचा मी निर्धार केला होता. म्हणून जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगने शाळा उघडली तेव्हा मी या शाळेत शिकवायचे ठरवले.”
या स्त्रिया सुनीता विल्यम्स नसतील; तरीही त्यांचे यश कमी नाही. त्यांनी सामाजिक अडथळे मोडून काढले आहेत आणि ज्या समाजात अलीकडच्या काळापर्यंत शिक्षणाला स्थान नव्हते अशा समाजात त्या इथपर्यंत पोचल्या आहेत.
खरे तर शिक्षणामुळे जीवन बदलू शकते. शिक्षण हा या संस्कृतीचा सर्वोच्च समानता आणणारा घटक असे कोणी असे कोणी म्हणत असतील, त्यांनी त्रिपुरातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मोफत शाळांना भेट द्यावी, त्यांना त्याची प्रचिती येईल!
(मजकूर – एम राजा रहमान, छायाचित्र – नमिता मलिक)