smiling young professional wellness substance user

वेलनेस प्रोग्रॅम फॉर सब्स्टन्स यूजर्स

एक कार्यशाळा ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक औषधांचा वापर न करता प्रभावशाली प्राणायामाच्या पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इलाज केला जातो.

मादक पदार्थ आणि दारू सोडाआजार बरे करास्वच्छ रहा.

१५ तासांचे शिबिर (५ दिवस, ३ तास/दिवस)
नोंदणी करा !

या शिबिरातून मला काय मिळेल?

icon

मादक द्रव्यपासून दूर रहायला शिका.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारची मादक द्रव्य घेत असाल जसे की दारू, गांजा, इंजेकशन मार्फत किंवा नाकातून श्वासाद्वारे घेण्याचे मादक पदार्थ या सर्वांपासून मुक्त व्हायला शिका. आम्ही तंबाखू सेवन करणाऱ्यांसाठी एक स्वतंत्र कार्यशाळा देखील घेतो.

icon

तुम्हाला आतून चांगले वाटेल आणि आरामदायी वाटेल.

प्राणायामच्या पद्धतीने ध्यान केल्याने आपल्याला संपूर्ण विश्राम मिळतो आणि खूप चांगले देखील वाटते ते पण कोणतेही मादक द्रव्य घेता. तसेच ध्यान प्राणायामाचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

icon

आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

मादक द्रव्यांचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. या कार्यशाळेत अनेक तंत्र आहेत ज्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदयाच्या विकाराची शक्यता कमी होते, ऊर्जा वाढते.

icon

ताण तणाव, चिंता व निद्रानाश यांपासून मुक्तता

या कार्यशाळेमध्ये आपण ताण तणावापासून मुक्त होतो. ताण तणाव आपल्याला मादक द्रव्य घेण्याचे कारण ठरतो. तसेच काही पडताळलेल्या पद्धतीने आपण मादक द्रव्य घेतल्याने होणारी चिंता निद्रा नाश यांपासून दूर राहतो.

icon

सुदर्शन क्रिया

सुदर्शन क्रिया ही लयबद्ध श्र्वासोश्वासची एक प्रक्रिया आहे. जी या कार्यशाळेत शिकवली जाते. सुदर्शन क्रियेचे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेले अनेक फायदे आहेत. मादक द्रव्य सेवन करणाऱ्यांनी ही क्रिया केल्यास जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत होते.

icon

पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते.

पुनरावृत्ती टाळणे हे दररोज मादक द्रव्य घेणाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक असते. या कार्यशाळेत आपण काही नैसर्गिक पद्धती शिकतो ज्याने आपल्याला लालसा आणि पुनरावृत्ती नियंत्रित करता येते.

मादक द्रव्या संदर्भात काही गैरसमज

डॉ नीरज नागाईच, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हेपटोलॉजिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल, जयपूर

icon

लाल वाईन हृदयासाठी चांगली असते.

icon

दारू ठराविक प्रमाणात घेणे सुरक्षित आहे.

icon

बियर ही धोकादायक नाहिये.

icon

अति प्रमाणात दारू पिणे ठीक आहे.

आमचे या शिबिराचे सल्लागार मंडळ

मला हे शिबिर करायचे आहे पण...

ऑनलाईन कार्यशाळा अजून चालू आहे का?

हो, चालू आहे.

या कार्यशाळेचा कालावधी किती आहे? वेळा काय आहेत?

ही कार्यशाळा१५ तासांची आहे. ( ५ दिवस रोज ३ तास ). तुम्ही कार्यशाळेची वेळ तुमच्या सोयीप्रमाणे शोधू शकता.

मला याची भीती वाटते की कुणी मला या कार्यशाळेत बघितलं तर त्यांना कळेल की मी तंबाखू सेवन करतो.

आमच्या गोपनीयता धोरणाने आम्ही सर्व विद्यार्थ्यांची माहिती गुपित ठेवतो. तसेच तुम्ही ऑनलाईन असल्याने आपल्या घरातच असाल, तुम्ही हेड फोन वापरू शकता.

मी एकाजागी खूप वेळ बसू शकत नाही. ध्यानासाठी बसायचा संयम माझ्याकडे नाही.

प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा करताना असे होऊ शकते. पण एकदा सुदर्शन क्रिया आणि ध्यान केले की तुम्हाला खूप वेळ बसायला अजिबात त्रास होणार नाही याची प्रचिती येईल.

माझ्या मादक द्रव्य सेवनाबद्दल सविस्तरपणे दुसऱ्या व्यक्तीला सांगायला मला तितकेसे चांगले वाटत नाही.

काळजी करू नका. आम्ही वचन देतो आम्ही तुमच्या वयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत नाही , तसेच तुमच्या सवयीचे सांत्वन किंवा विरोध करत नाही. तुम्हाला चांगले वाटणे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.

सुदर्शन क्रिया ही प्राणायाम पद्धत केल्याने माझ्या आरोग्यात सुधारणा होईल?

हो. अनेक अभ्यास आणि वैयक्तिक अनुभव असे आहेत की सुदर्शन क्रिया केल्याने अयोग्य आणि एकूणच जीवनशैलीत सुधारणा झाली आहे. मग ती व्यक्ती मादक द्रव्य घेणारी असो किंवा नसो. हे सिद्ध झाले आहे की सुदर्शन क्रिया केल्याने झोप चांगली लागते, ताण तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि असे बरेच फायदे आहेत. तुमच्या प्रशिक्षकास तुमच्या सध्याच्या आरोग्याच्या स्थिती विषयी सविस्तर माहिती द्या आणि आम्ही तुम्हाला वैयक्तिक आणि सटीक सल्ले देऊन तुमचा अनुभव उंचावू शकू.