ध्यान (Meditation in Marathi)

ध्यानधारणा म्हणजेच संपूर्ण विश्रांती

जे तुम्हाला गाढ विश्रांती देते ते आहे ध्यान

जे तुम्हाला गाढ विश्रांती देते ते आहे ध्यान. ध्यान अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये साधक बसतो आणि मनाला हरवतो. आर्ट ऑफ लिविंगमधील ध्यान अशी साधी सोपी क्रिया आहे जे कोणीही करू शकतात. “ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे तर ध्यान एकाग्रतेच्या विरुध्द आहे,” असे आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी म्हणतात.  गाढ झोपेपेक्षा गहरी विश्रांती ध्यानामुळे मिळते. जेंव्हा मन चंचलतेपासून मुक्त होऊन शांत, स्थिर होते तेंव्हा ध्यान लागते.

ध्यानाचे ९ लाभ | 9 Benefits of meditation

ध्यानाचे असंख्य लाभ आहेत. मानसिक स्वच्छतेसाठी याची नितांत आवश्यकता आहे.

  • शांत मन
  • उत्तम एकाग्रता
  • चांगला संवाद
  • आकलनशक्ती मध्ये स्पष्टता
  • सृजनशीलता आणि कुशलतेचा विकास
  • अचल आंतरिक शक्ती
  • उपचार, स्वास्थ्य
  • ऊर्जा स्त्रोताशी संधान
  • विश्राम, ताजेतवाने आणि भाग्यशाली होणे.

हे सर्व नियमित ध्यानाचे लाभ आहेत.

ध्यानासाठी ४ सूचना | 4 tips for meditation

पहिल्यांदा ध्यान करणारे या सोप्या सोप्या सूचनांचे पालन करून ध्यानात गहिरे उतरू शकतात.

  • सोयीची आणि ठराविक वेळ आणि जागा नक्की करा.
  • ध्यान करण्यापूर्वी पोट हलके राहू द्या. पोट खूप भरलेले असेल तर ध्यान करू नका.
  • हलका फुलका व्यायाम आणि दीर्घ श्वासांनी सुरवात करा.
  • ध्यान करतेवेळी चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य नक्की असू द्या.

ध्यान कसे करावे | How to meditate

  • घरात एक स्वच्छ जागा निवडा. दुपारच्या जेवणाआधी ऑफिसात खुर्चीत बसून देखील ध्यान करू शकता.
  • घरी ध्यानासाठी निवडलेल्या जागेवर इतर काही कामे करणार नाही याची खबरदारी घ्या.
  • आपली ध्यानासाठी नक्की केलेली जागा प्रकाश वाली, हवेशीर आणि शांत असावी.
  • तुम्ही निर्देशित ध्यान देखील करू शकता. याची सुरवात ग्रुपमध्ये करणे योग्य होईल.
  • दररोज एका ठराविक वेळी ध्यान केल्याने ते नियमित साधनेत बदलून जाते. सकाळी सकाळी ध्यान करणे सर्वात उत्तम.
  • सुरवात २०-२५ मिनिटाच्या ध्यानाने करा. सुरवातीलाच खूप वेळ ध्यान करू नका. एक गजर लाऊन ठेवणे योग्य होईल.
  • मोबाईल शांत ठेवा.
  • सैलसर कपडे वापरा. सुती कपडे अति उत्तम.

श्री श्री रविशंकर जी म्हणतात ध्यानाचे ३ नियम आहेत - अकिंचन, अचाह आणि अप्रयत्न - मी कोणीच नाही , माझी काहीच इच्छा नाही, आणि मी काही करत नाही.

ध्यानाचे महत्व | Importance of meditation

  • ध्यान आत्म्याचा आहार आहे. त्यामुळे सामाजिक मुल्ये, एक दुसऱ्यांची काळजी, जबाबदारी आणि अहिंसा आणि शांती वृध्दिंगत होते. ते आपापसात जोडण्यासाठी मदत करते. या मूल्यांमुळे तर ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना स्वीकार करण्यासाठी मदत होते.
  • समस्त मानव जातीमध्ये कधीही आणि कश्यानेही कमी होणार नाही असा आनंद शोधण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. ध्यानामुळे हि तृप्ती प्राप्त होते.
  • आपल्या जीवनात सर्व काही ठीक चाललेले असून देखील आपण असहज होतो. ध्यान आपणास ज्ञात आणि अज्ञात अश्या दोन्ही तणावापासून मुक्ती देऊन विश्राम आणि स्थिरतेची अनुभूती देते जी आपण सर्वजण शोधत असतो.
  • ध्यानाच्या सहाय्याने आपण जीवनातील चढ उतारांना विश्वास, स्थिरता आणि संपन्नतेने सामना करू शकतो. महत्वाचे हे आहे कि सततच्या ध्यानामुळे आपल्यामध्ये एक लवचिकता येते. आपण आपल्या भावना आणि परिस्थितींना खंबीरपणे सामना करू शकतो.
  • दुःखाच्या प्रसंगी ध्यानासारखा सल्लागार दुसरा कोणीही असू शकत नाही.

ध्यानाचे अजून काही फायदे | Advantages of meditation

  • कामाच्या ठिकाणच्या तणावाचा स्तर पाहता ध्यान करण्यासाठी फार बुद्धिमान असणे गरजेचे नाही. वर्क लाईफ बॅलंस प्राप्त करण्यासाठी ध्यान खूप गरजेचे आहे. ध्यानामुळे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि आपापसातील विश्वास, रचनात्मकता, नवीन शोध आणि यायोगे प्रज्ञेस चालना मिळते.
  • नाते संबंधांमध्ये सुधारणा होते. आपला स्वभाव मधुर आणि इतरांशी मन मिळाऊ होऊ लागतो. लोकांना जसे आहे तसे स्वीकारण्याची क्षमता वाढू लागते. हे स्वभाव सर्वत्र उपयोगाचे असले तरी एकत्र काम करण्याच्या ठिकाणी यांचे महत्व खूप आहे.
  • यामुळे स्वास्थ्य आणि संपन्नतेचा खोलवर अनुभव येत राहतो. ध्यानाच्या नियमित सरावाने शरीर, मन आणि आत्म्याला लाभ होतो. ध्यानाचा गहरा अनुभव कामाच्या ठिकाणी आणखी सक्रीय बनवतो.

सहज समाधी ध्यान | Sahaj Samadhi Dhyan

सहज समाधी ध्यान हे मंत्रावर आधारित ध्यान आहे. जेथे एक मंत्र ठराविक पद्धतीने उच्चारल्यास,गहन विश्रांती मिळते आणि आपल्याला जागरूक ठेवते.हे ध्यान आपले जागृत मन विनासायास स्थिर करते.आणि जेव्हा मन पूर्णपणे स्थिर होते तेव्हा ते सर्व ताणतणावापासून मुक्त होऊन वर्तमानात येते.

अधिक वाचा >>

 

ध्यानाची ताकद

ध्यानाचे अनुभव सर्वांना कळू द्या

Zoran Imsiragic

Graphic Software Expert, Serbia