मधुमेहाचे नैसर्गिक व्यवस्थापन

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात २०१४ साली ४२२ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि आपल्या काळातील हा सगळ्यात सामान्य आजार आहे.  रक्तामध्ये साखरेच्या गरजेपेक्षा अधिकच्या प्रमाणामुळे हा आजार होतो आणि त्यामुळे शरीररातील इतर महत्वाच्या अवयवांना इजा पोहोचू शकते. इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाच्या शरीरातील कमी उत्पादनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. 

मधुमेह होण्यामागची कारणे:

  • ताणतणाव
  • अनुवांशिक कारणे
  • दोषपूर्ण जीवनशैली

मधुमेहावर नैसर्गिक घरगुती उपाय

घरगुती आयुर्वेदीक उपाय आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून मधुमेह नियंत्रणात आणला जाऊ शकतो.  तुमच्यासाठी काही घरगुती आयुर्वेदीक उपाय:

कारले मधुमेहावर रामबाण उपाय आहे.  दिवसातुन कमीत कमी एक चमचा कारल्याचा रस प्या.  यामुळे रक्तातील आणि मुत्रातील साखरेचे प्रमाण कमी होईल.

प्यालाभर पाण्यात दहा तुळशीची पाने, दहा कडुलिंबाची पाने आणि दहा बेलाची पाने टाकुन प्या.  दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा रस घ्या.  यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 

चमचाभर आवळा रस कपभर कारल्याच्या रसामध्ये घालून प्या. स्वादुपिंडाद्वारे पुरेसे इन्सुलीन तयार होण्यासाठी दररोज दोन महिने याचे सेवन करा.

१०० ग्राम मेथी बीया, ५० ग्राम हळद आणि पांढरी मिरी बारीक वाटून पूड तयार करुन  घ्या.  चमचाभर पूड दररोज दोनवेळ प्यालाभर दुधात टाकून घ्या.

मधुमेह नियंत्रणासाठी हे साधेसोपे व प्रभावी घरगुती उपाय आहेत. आयुर्वेदामध्ये सांगितल्या प्रमाणे मधुमेहावरील उपाय वाचून समजून घ्या. मधुमेहावर प्रभावी आहार उपाय जाणून घेण्यासाठी व्यावसायिक आयुर्वेदीक वैद्याचा सल्ला घ्या.

जीवनशैलीतील इतर बदलांचा समावेश करा

समग्र उपायांमध्ये केवळ काही उपचारांचा समावेश होत नाही तर जीवनशैलीत काही बदल आवश्यक असतात. मधुमेह नियंत्रणासाठी काही उपाय दिलेले आहेत:

  • दररोज योग साधनेचा अभ्यास करा: काही विशिष्ट योगासने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.  तज्ञ योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली या आसनांचा दररोज अभ्यास सकारात्मक परीणाम मिळवण्यासाठी आवश्यक आहे.  योगाभ्यास मधुमेहा विरूद्धच्या उपचारात कशी मदत करतो हे जाणून घ्या.
  • ध्यान करा: ध्यान केल्याने मधुमेहासाठी कारणीभूत असलेला ताणतणाव आणि चिंता नाहीशी होते.  दररोज ध्यान केल्याने मन आणि शरीरातील तणाव दूर होतो. मार्गदर्शित ध्यान साधनेने याची सुरूवात करू शकता.
  • सुदर्शन क्रिया शिकून घ्या: सुदर्शनक्रियेसारख्या प्रभावी श्वसन अभ्यासाचा परीणाम अगदी DNA पर्यंत होतो. सुदर्शन क्रियेच्या फायद्यांबाबत अधिक  जाणून घ्या.

जीवनशैली मधील सकारात्मक बदल आरोग्य सुधारण्यावर दूरगामी परिणाम करतात. शरीर आणि मन सुध्दा सदृढ़ बनवतात. विशेषत: योग आणि औषधे किंवा कुठलाही शारिरीक व्यायामाचा अंतर्भाव असणारी पद्धती रोजच्या जीवनात अनुसरल्याने सकारात्मक बदल घडून येतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचा ‘लिव्हिंग वेल प्रोग्राम’ निरोगी जीवनासाठी  एक उत्तम सुरुवात असू शकते.

विवेक शेणाँय, यांच्या लिखाणातून. दि आर्ट आँफ लिव्हिंग.  

    Hold On! You’re about to miss…

    The Grand Celebration: ANAND UTSAV 2025 

    Pan-India Happiness Program

    Learn Sudarshan Kriya™| Meet Gurudev Sri Sri Ravi Shankar Live

    Beat Stress | Experience Unlimited Joy

    Fill out the form below to know more:

    *
    *
    *
    *