चिंता आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात व्यत्यय आणते आणि मनःस्तापास कारणीभूत ठरते. सर्वात वाईट म्हणजे ही आंतरिक इंद्रियगोचर घटना शरीरातील इतर अनेक घडामोडींना सोबत घेऊन येते. उदाहरणार्थ सुरुवातीला आपल्याला होत असलेल्या थरकापाबरोबरच आपल्या चेहऱ्यावर घामाचे बिंदू येऊ शकतात आणि आपल्या घश्याला कोरड पडू शकते. सकाळपर्यंत या लक्षणांचे गांभीर्य वाढत जाऊन सकाळी बद्धकोष्ठता किंवा/आणि छातीत दुखणे आणि रात्री झोप न येण्यापर्यंत पाळी येऊ शकते. चिंतेमुळे उद्भवणाऱ्या लक्षणांची श्रेणी विद्युतचुंबकीय लहरींच्या वर्णपटाच्याइतकीच विस्तृत आहे, हे तर उघडच आहे.

तथापि, लक्षणांच्या या विस्तृत वर्णपटाचे मूळ एकच आहे. ते म्हणजे: शरीरातील वात दोष (वायू घटक) यामध्ये असलेले असंतुलन.

दोषाचा समतोल साधण्यासाठी त्या विशिष्ट दोषाच्या विरुद्ध गुण धारण करणारा आहार आणि जीवनशैली यांचे पालन केले पाहिजे. वात दोषात हलकेपणा, कोरडेपणा, शीतलता आणि खडबडीतपणा असे गुण असतात. म्हणून यांना समतोल ठेवण्यासाठी शरीरात उबदारपणा, जडपणा आणि तेलकटपणा येईल असा आहारात आणि जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो.

कोणताही दुष्परिणाम नसणारी आपल्या चिंतेवर विजय प्राप्त करून देणारी हत्यारे

वरील तत्त्व सोप्या उपायांद्वारे सहजपणे प्रत्यक्षात आणले जाऊ शकते. चिंतेसाठी खालील आयुर्वेदिक उपाय आहेत:

  1. वात शमन करणारा आहार

    आपल्या आहारात गोड, खारट आणि आंबट चवींचा समावेश करा. तुरट, कडू आणि तिखट चवीचे पदार्थ टाळा. जेंव्हा आपण गोड म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ बाजारात मिळणारी पांढरी साखर नाही, तर फळांमधील नैसर्गिकरित्या गोड पदार्थ असा अर्थ होतो. थंड आणि कोरड्या पदार्थांऐवजी गरम, तेलकट आणि ओलसर अन्नाचा समावेश करा.

  2. वनौषधींनी आपल्या प्रणालीला शांत करा

    अश्वगंधा, शंखपुष्पी आणि ब्राह्मी यांसारखी वनौषधी मज्जासंस्थेला आराम देतात आणि मेंदूमधील विषारी द्रव्ये करतात. परंतु यांचे सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आयुर्वेदिक डॉक्टर एखाद्याच्या शरीराच्या प्रकृतीनुसार औषधांची शिफारस करतात. सर्वोत्तम योग्य वैद्यकीय शिफारसी मिळविण्यासाठी श्री श्री आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  3. विशेष आयुर्वेदिक मालिश

    शिलाभ्यंग हा एक विशेष आयुर्वेदिक मालिश आहे , जो शरीराला गहरी विश्रांती देतो. यामध्ये विशेष आयुर्वेदिक तेले आणि पाण्यात गरम केलेला काळा बेसॉल्ट दगड यांचा वापर केला जातो. दगडांच्या उष्णतेमुळे वायू तत्वाचे असंतुलन शमन होण्यास मदत होते आणि शरीर आणि मनाची शांती पुनः प्राप्त होते.

  4. दिनक्रम नेमाने पाळा

    दिनक्रमाच्या शिस्तीचे पालन केल्याने वात संतुलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे झोपण्याची, उठण्याची आणि जेवणाची विशिष्ट वेळ आपण पाळणे अतिशय जरुरी आहे.

  5. योग, प्राणायाम आणि ध्यान करा

    हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे की योग, प्राणायाम आणि ध्यान चिंता कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. म्हणून या प्राचीन साधनांचा सराव करण्यासाठी दररोज काही वेळ राखून ठेवण्याची खूपच शिफारस केली जाते. त्यांचा सराव आपल्याला निव्वळ शांत करेल असे नाही तर ते आपल्याला अधिक कार्यक्षम आणि एकाग्र बनवेल.

    तुमच्या जवळच्या श्री श्री योग आणि हँपीनेस प्रोग्रॅम येथे योग, प्राणायाम आणि ध्यान शिका!

art of living store logo white

गुरुदेवांचे कालातीत ज्ञान

पुस्तके, फोटो फ्रेम्स आणि भावपूर्ण ठेवा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

आयुर्वेदानुसार, जेव्हा शरीरातील ‘वात दोष’ (Vata Dosha) असंतुलित होतो, तेव्हा चिंता, भीती आणि अस्वस्थता जाणवू लागते. अनियमित दिनचर्या, अपुरी झोप आणि वात वाढवणारा आहार यामुळे मनाची स्थिरता कमी होते.
चिंता आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी खालील उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात:
१. अभ्यंग (Self-Massage): कोमट तिळाच्या तेलाने शरीराला मसाज केल्याने वात शांत होतो.
२. पुरेशी झोप: दररोज ७-८ तास शांत झोप घेतल्याने मज्जासंस्थेला विश्रांती मिळते.
३. कोमट पाण्याचे सेवन: दिवसभर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (Amma) बाहेर पडण्यास मदत होते.
तुमचा आहार तुमच्या मनावर थेट परिणाम करतो. चिंतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी:
१. ताजे आणि सात्त्विक भोजन: नेहमी ताजे आणि गरम अन्न खावे.
२. कॅफिन टाळा: चहा, कॉफी आणि थंड पेयांचे प्रमाण कमी करा, कारण ते मज्जासंस्थेला उत्तेजित करतात.
३. गोड आणि स्निग्ध पदार्थ: नैसर्गिकरीत्या गोड (फळे) आणि पचायला हलके, स्निग्ध पदार्थ वात संतुलित ठेवण्यास मदत करतात.
आयुर्वेदात अशा अनेक ‘मेध्य’ (बुद्धी आणि मनाला पोषक) वनस्पती आहेत ज्या मानसिक शांती देतात:
१. ब्राह्मी (Brahmi): मनाला शांत करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी.
२. अश्वगंधा (Ashwagandha): तणाव संप्रेरक (Cortisol) कमी करण्यासाठी.
३. शंखपुष्पी (Shankhpushpi): चांगली झोप आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी.
टीप: कोणतेही औषध घेण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
प्राणायाम शरीरातील प्राणशक्ती संतुलित करतो. नाडी शोधन प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम मज्जासंस्थेला त्वरित शांत करतात. आर्ट ऑफ लिविंगचे ‘सहज समाधी ध्यान’ किंवा ‘सुदर्शन क्रिया’ नियमित केल्याने जुनाट चिंता (Chronic Anxiety) मुळापासून दूर होण्यास मदत होते.
जर तुम्हाला अचानक ‘पॅनिक’ किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर:
१. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
२. थोडं कोमट पाणी प्या.
३. तुमच्या तळपायांना तेलाने मसाज करा.
४. काही मिनिटे शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *