देवतेला काही अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. भगवान शिव अतिशय साधे आणि निरागस आहेत, त्यांच्या आपल्याकडून जास्त अपेक्षा नाहीत; म्हणून त्यांना भोलेनाथ म्हणतात. त्यांना फक्त ‘बेल-पत्र’ अर्पण करायचे असते . बेल-पत्र अर्पण करणे म्हणजे तम, रजस आणि सत्त्व-स्वभावाच्या तीनही पैलूंचे समर्पण होय. तुम्हाला तुमच्या जीवनातील सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी भगवान शिवाला अर्पण करून मुक्त व्हावे लागेल.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
बेलपत्र म्हणजे काय?
बेलपत्र ही एक वनस्पती आहे. संस्कृतमध्ये बिल्व पत्र असेही म्हणतात. ‘बिल्व’ या शब्दाचा अर्थ बेल वृक्ष आणि ‘पत्र’ म्हणजे पान. बेल पत्र या वनस्पतीमध्ये बेल फळाचाही समावेश होतो.बेलफळाचे कवच कडकअसते आणि ते चवीला थोडे तिखट असते. तुम्ही भारतातील कोणत्या प्रदेशात आहात त्यानुसार बेल पत्राची विविध नावे आणि उच्चार आहेत. वनस्पतीचे सांस्कृतिक, सामाजिक आणि उपचारात्मक मूल्य आहे.
आपण भगवान शिवाला बेलपत्र का अर्पण करतो?
जेव्हा आपण भगवान शिवाची उपासना करतो तेव्हा बेलपत्र अर्पण करणे हा एक महत्वाचा विधी आहे. असे म्हणतात की बेलाची पाने भगवान शंकराला आवडतात. तीन पानांचे बेलपत्र त्रिमूर्तींचे प्रतीक आहे: ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव). शास्त्रानुसार,बेलपत्राची तीन पाने म्हणजे भगवान शंकराचे तीन डोळे आहेत.
जैन लोक बेलपत्राला शुभ मानतात. असे म्हणतात की २३ वे तीर्थंकर, पार्श्वनाथ यांचे निर्वाण बेलाच्या झाडाखाली झाले होते.
बेलाचे आश्चर्यकारक फायदे
बेलाचा विविध प्रकारे कसा उपयोग होतो;जाणून घ्यायचंय ? – एक औषध म्हणून, त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फेस पॅक म्हणून किंवा उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी उत्साहवर्धक पेय म्हणून बेलाचा उपयोग करता येऊ शकतो.
१. बेलपत्राचे औषधी महत्त्व
- बेल पत्राचे खूप अनोखे औषधी फायदे आहेत. त्याचे फळ जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्त्रोत आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी १, बी ६ आणि बी १२ समाविष्ट आहे – हे घटक शरीराची सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहेत.
- आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ हे तीन दोष आहेत आणि बेलपत्राच्या सेवनाने तिन्ही दोष संतुलित होण्यास मदत होते.
- बेल फळामध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि त्यात रेचक गुणधर्म असतात जे अतिसार, आमांश, उलट्या यासारखे पोटाशी संबंधित रोग बरे करण्यास मदत करतात. बेलफळामुळे पचनसंस्था देखील मजबूत राहते .
- बेलपत्राच्या सेवनाने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय समस्या आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या जीवनशैलीतील आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
२. त्वचेसाठी बेल पत्राचे फायदे
- जास्त घाम येणे किंवा त्वचेवर पुरळ आल्याने शारीरिक दुर्गंधीचा त्रास होत असेल तर बेलपत्राचे मिश्रण काही दिवस लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल.
बेलपत्राचा रस घेतल्याने केस गळतीची समस्या दूर होते आणि कोरडया आणि खरखरीत केसांना मऊ करण्यास मदत होते. - औषधांचा दुष्परिणाम म्हणून त्वचेवर पडलेले पांढरे डाग बेलपत्राचे मिश्रण लावल्याने कमी होण्यास मदत होते.
बेलाचे झाड घरी कसे वाढवायचे?
बेलपत्राची वनस्पती फारशी सहज उपलब्ध होत नाही कारण ती सहसा जंगलात उगवते. स्कंद पुराणानुसार, बेलपत्राची वनस्पती देवी पार्वतीच्या घामाच्या थेंबाने वाढली आणि म्हणूनच ती अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते. घरी बेलाची झाडे वाढवण्यासाठी,पावसाळा हा लागण करण्याचा सर्वोत्तम काळ आहे.
३. बेलपत्राचे वास्तूसाठी फायदे
बेल पत्र वनस्पती सर्व नकारात्मक कंपने दूर करते आणि सभोवतालचा परिसर सकारात्मकतेने भरते. यामुळे चांगले आरोग्य मिळते आणि समृद्धी देखील येते. ज्ञानप्राप्तीसाठी बेलाच्या झाडाखाली दिवा लावणे शुभ मानले जाते.
बेलफळाच्या सरबताची कृती
बेलफळाच्या सरबताचा वापर उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे थंड पेय म्हणून देखील केला जातो. हे पेय तुम्ही घरी कसे बनवू शकता यावर एक नजर टाकूया.
करण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
तयार होण्यासाठी लागणारा वेळ: ० मिनिटे
एकूण वेळ: १० मिनिटे करायला एकदम सोपे
साहित्य
- १ बेल फळ
- १-२ ग्लास पाणी
- अर्धे लिंबू
- ४-५ पुदिन्याची पाने
- चवीनुसार गूळ/तपकिरी साखर
कसे तयार करावे:
- एक बेल फळ घ्या आणि त्याचा गर काढा.
- गर एका भांड्यात ठेवा आणि एक ग्लास पाणी घाला.
- गर कुस्करा आणि बिया वेगळया काढा.
- गर आणि पाणी गाळून घ्या.
- पुदिन्याची पाने झेजरवून घ्या.
- एक ग्लास घ्या आणि त्यात पुदिन्याची पाने आणि लिंबू घाला.
- त्यात गाळलेला बेलफळाचा रस घाला आणि चांगले ढवळा व एकजीव करा
टीप: बेल फळ सहसा गोड असते, तुमच्या चवीनुसार गूळ घाला.






