भगवान शंकराचे स्वर्गीय निवासस्थान असलेला कैलास पर्वत त्याच्या भव्य सौंदर्य आणि मानसरोवर यामुळे जास्त लोकप्रिय आहे. हे सरोवर कैलास पर्वताचा अविभाज्य घटक आहे. मानसरोवर तिबेटमध्ये वसलेले गोड्या  पाण्याचे मोठे सरोवर आहे आणि ते हिंदू,बौध्द,जैन लोकांचे धार्मिक महत्व असलेले तीर्थयात्रेचे ठिकाण आहे.दरवर्षी जगभरातून लाखो लोक तीर्थयात्रेसाठी आणि पर्यटनासाठी  मानसरोवराला भेट देतात आणि तेथील निसर्गसौंदर्य आणि धार्मिक पवित्रतेचा अनुभव घेतात.

कैलास पर्वत म्हणजे शंकराचे निवासस्थान आणि कैलास म्हणजे स्मशानभूमी. कैलास म्हणजे जेथे फक्त उत्सव आहे आणि स्मशान म्हणजे फक्त एक पोकळी/शून्य !! दैवत्व दोन्हीकडे सारखेच आहे. उत्सवात पण आणि रिक्ततेत पण. तुमच्यात पण हे दोन्ही आहेत, रिक्तपणा आणि उत्सव !!

– गुरुदेव श्री श्री रवी शंकर

मानसरोवर अर्थ आणि इतिहास

मानसरोवर अनेक पवित्र स्थानातील एक पवित्र स्थान आहे. हे सरोवर म्हणजे ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी देवांनी स्नान करण्याचे ठिकाण अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मदेवाच्या मनात प्रथम या सरोवराची निर्मिती झाली म्हणून ह्याला “मानसरोवर” हे नाव पडले असे हिंदू मानतात. मानसरोवर ह्या शब्दातूनच आपल्याला त्याचा अर्थ कळतो. दोन संस्कृत शब्दापासून हा शब्द आला आहे. मानस म्हणजे मन/बुद्धी ; सरोवर म्हणजे तलाव/तळे.

येथे म्हणजे कैलास  मानसरोवर परिसरात भगवान  राहात आणि ध्यान करत अशी श्रद्धा आहे. मानसरोवर सगळीकडे असू शकत नाही  कारण त्या स्थळाची आभा/वलय काही वेगळेच आहे. पवित्र अशा ह्या सरोवराची तुलना भगवंताच्या मनाशी केली जाते. भगवंताचे मन मानसरोवराच्या पाण्याप्रमाणे शांत आणि पर्वताप्रमाणे निश्चल आणि भक्कम असते‘

जरुर वाचा – मानसरोवराचे महत्त्व; मानसरोवराची यात्रा  की करावी?

१. धार्मिक महत्त्व

धर्मग्रंथामध्ये वर्णन केले गेलेले हे पवित्र स्थळ आहे. मानसरोवराचे सौंदर्य आणि महत्व खूप धार्मिक ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. हिंदू मान्यतेप्रमाणे कैलास मानसरोवरात एक डुबकी मारल्याने किंवा त्याचे पाणी प्राशन  केल्याने सर्व पापे धुतली जातात.

पहिले तीर्थंकर भगवान ऋषभ देव यांना येथे मोक्ष मिळाला होता असे जैन धर्मिय मानतात.

बौद्ध धर्माप्रमाणे कैलास पर्वताला मेरु पर्वत संबोधले गेले आहे. तेथे राहून भगवान बुद्धांनी ध्यान केले होते असे समजतात.

बॉन धर्माप्रमाणे झॅंगझुंग हे एक तिबेट मधील पवित्र स्थळ आहे. असे सांगितले जाते की बॉन धर्माचा संस्थापक टोनपा शेनाब याने तिबेटच्या पहिल्या भेटीच्या वेळी ह्या सरोवरात स्नान केले होते.

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिल्या दहा शीख गुरुपैकी एक असलेले गुरु नानक देव हे ह्या सरोवराजवळ ध्यान करायला शिकले असे शीख लोक मानतात.

२. भौगोलिक महत्व

कैलास पर्वत पृथ्वीच्या मध्यभागी आहे आणि त्याच्यासभोवताली इतर सहा पर्वतांच्या रांगा आहेत. कैलास पर्वताचा परिसर संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू समजला जातो. समुद्रसपाटीपासून ४५५७ मीटर उंचीवर असलेले जगातील सर्वात उंच गोड्यापाण्याचे असे हे सुंदर सरोवर आहे. समाधी लागण्यासाठी हे उत्कृष्ट स्थळ आहे.मानसरोवर ब्रह्मपुत्रा, घागरा,सिंधू आणि सतलज या चार मुख्य  नद्यांच्या उगमाचे ठिकाण आहे.

३. वैद्यकीय दृष्ट्या महत्व

मानसरोवराची सहल कैलास  पर्वतावर असलेल्या विविध औषधी वनस्पती व झुडपे यांची माहिती करून घेण्यासाठी चांगली संधी आहे.वनस्पती आणि फुले औषधी उपयोगासाठी वापरली जातात. तिथे अनेक प्रकारची फुले आहेत जी पर्यटकांना त्यांच्या सौंदर्याने आकर्षित करून घेतात. उदा. सापा प्रमाणे आकार असलेले नागमणी फूल. मानसरोवरामध्ये आढळणाऱ्या बिच्चू गवतामध्ये -इंग्लिश मध्ये ज्याला स्टिंगिंग नेटल म्हणतात- अनेक औषधी गुण आहेत. बिच्चू गवत किंवा स्टिंगिंग नेटल सांधेदुखी बरी करण्यासाठी वापरले जाते आणि ते अक्युपंक्चर प्रमाणे काम करते.

४. पर्यटकांचे आकर्षण

जर तुम्हाला निसर्ग,तलाव, बर्फाच्छादित पर्वत,हिरवळ आवडत असेल तर तुम्हाला मानसरोवर नक्की आवडेल. कैलास  पर्वत टवटवीत बागांनी वेढलेला आहे. तुम्हाला येथे कमळ, लिली सारख्या सुंदर फुलांचे दर्शन होईल आणि सरोवराचे  सौंदर्य वाढवणारे हंस पक्षी सुद्धा दिसतील. सूर्योदयाच्या वेळी कैलास पर्वताचे सोनेरी शिखर म्हणजे पाहण्यासारखे दृश्य असते. मानसरोवराचे निसर्ग रम्य सौंदर्य व्यापक आहे आणि कदाचित तुम्हाला डोळे बंद करावेसे पण वाटणार नाही एवढे मोहक आहे. मानसरोवर हे आशिया खंडातील सर्वांत जास्त धार्मिक, सर्वात जास्त आव्हानात्मक आणि जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट दिलेले ठिकाण आहे.

मानसरोवराच्या आसपास असणारी प्रेक्षणीय ठिकाणे

फक्त मानसरोवराचा प्रवास जरी तुमच्यासाठी उत्साह वर्धक आणि साहसी असला तरी तेथे लक्ष वेधून घेणारी इतर अनेक ठिकाणे आहेत आणि तुम्ही वाटेवरची ती पण मजा  घ्यायला  विसरू नका.

गौरीकुंड: दुसरे पर्यटकांचे आकर्षण म्हणजे गौरीकुंड जे पार्वती सरोवर म्हणून पण ओळखले जाते. ह्या स्थळाच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत. ही पार्वतीच्या स्नानाची जागा असून गणेशाची निर्मिती येथेच झाली आहे अशी श्रद्धा आहे.हे सरोवर करुणेचे सरोवर म्हणून पण ओळखले जाते.

राक्षस ताल: राक्षस ताल (तळे) हे  रावण सरोवर किंवा दैत्य सरोवर म्हणून पण ओळखले जाते. ही रावणाची राहण्याची जागा होती अशी समजूत आहे. म्हणून त्याला राक्षस ताल नाव पडले आहे. हे सरोवर मानसरोवराजवळ वसलेले असून तिबेट मधील सगळ्यात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते. सरोवरामध्ये चार बेटे आहेत; डोला, टोपसेरमा,लाचाटो आणि दोषर्बा. ह्या सरोवराच्या आसपास राहणारे लोक ह्या सरोवरात स्नान करत नाहीत कारण येथील पाणी खूप खारे व विषारी आहे.

कैलास  परिक्रमा: कैलास  पर्वत हे स्थान  भगवान शंकराचे आणि देवी पार्वतीचे निवास स्थान म्हणून ओळखले जाते. शिवपुराणात सांगितल्या प्रमाणे पर्वताला प्रदक्षिणा घातली तर तुमच्या सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी मदत मिळते. प्रदक्षिणा म्हणजे तीन दिवसांचा ५३ किलोमीटरचा प्रवास आहे. हा प्रवास खूप अवघड आहे.पराकोटीचे हवामान  आणि ऑक्सीजनची पातळी खूप कमी असल्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.

कैलास  मानसरोवरला भेट देण्यासाठी योग्य काळ कोणता आहे?

जे लोक कैलास  मानसरोवर यात्रेसाठी जाऊन आले आहेत ते सांगतात; मानसरोवर ला भेट देण्यासाठी उन्हाळ्यात एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत योग्य काळ आहे; कारण ह्यावेळी बर्फ वितळू लागतो आणि त्यामुळे ट्रेकिंग साठी, प्रेक्षणीय स्थळे आणि तेथील सौंदर्य पाहण्यासाठी; त्याची मजा घेण्यासाठी योग्य हवामान असते.

गुरुदेवांच्या ज्ञानवर्धक प्रवचनांवर आधारित

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *