अत्यंत शक्तिशाली मंत्रपठण: शिवरात्रीला आपण रुद्र्पुजेला कां उपस्थित रहायला हवे

एकदा कोणीतरी आदि शंकराचार्यांना विचारले की मुक्ती देणारी आणि भौतिक सुख आणि यश प्राप्त करून देणारी अशी एकच कोणती गोष्ट आहे कां, शंकराचार्यांनी उत्तर दिले, “श्री रुद्रम.”

विश्वातील शिव तत्व, शिव ऊर्जेचे आवाहन करण्यासाठी, तिला नमन करण्यासाठी केला जाणारा मंत्रांचा संच म्हणजे श्री रुद्रम किंवा रुद्रपूजा. या मंत्रोच्चारांची त्या व्यक्तीची निव्वळ अध्यात्मिक प्रगतीसाठीच नाहीतर त्या व्यक्तीच्या भौतिक जीवनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होते. चला तर मग रुद्रपूजा कशी करतात आणि या मंत्रोच्चाराचे विविध पैलू काय आहेत हे जाणून घेऊया.

रुद्रपूजेचे घटक

श्री रुद्रमचे पांच प्रमुख घटक आहेत:

  • गणपती अथर्वशीर्ष: कोणतीही पूजा वा विधी ही भगवान गणेश, जो विघ्नहर्ता आहे, त्याच्या पूजनाशिवाय प्रारंभ होऊ शकत नाही. गणपती अथर्व हे त्या गजमुखाचे नमन करण्यासाठी उपलब्ध असणारे सर्वात प्राचीन साहित्य आहे. यामध्ये गणेशाचे वर्णन इतर सर्व देवतांप्रमाणे वास्तव आणि सत्य ऊर्जा, आत्मा आणि ओम, ज्यामुळे विश्वाची निर्मिती झाली,असे  केले आहे.   
  • अंगन्यास: अंगन्यास एक असा विधी आहे, ज्यामध्ये पूजा करणारा त्या देवतेच्या बाह्य रुपाची पूजा करण्यापूर्वी त्या देवतेच्या आपल्या आतील स्वरूपास आवाहन करतो. श्री रुद्रम सुरु करण्यापूर्वी ती व्यक्ती इतर सर्व देवतांना फुले अर्पण केल्यानंतर आपल्या स्वतःच्या डोक्यावर काही फुले घालते. त्यांच्या आंतमध्ये देखील रुद्राची ऊर्जा आहे हे जाणण्यासाठी हा विधी केला जातो. आपल्या आतील रुद्रास आवाहन केल्यानंतरच आपणास रुद्र्पुजा करण्याची पात्रता येते.
  • पंचामृत स्नानम: अंगन्यासानंतर शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक केला जातो. पंचामृतातील पांच घटक हे पंच तत्वांचे (पंच तत्वे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, ज्यांच्यामुळे या विश्वाची निर्मिती झाली) प्रतिनिधित्व करतात. खरेतर शिवलिंगच सर्व व्यक्त आणि अव्यक्त विश्वाच्या अस्तित्वाचे प्रतिक आहे.

पंचामृतातील पांच घटकांचे अर्पण करण्याने अस्तित्वातील या तत्वांची शांती होते. हे पांच घटक म्हणजे – दुध, दही, गुळ, मध आणि तूप. या पांच घटकांच्या मिश्रणाने शिवलिंगावर अभिषेक करणे हे समस्त अस्तित्वातील पांच ही तत्वांची शांती करण्याचे प्रतिक होय. या पंचतत्वांमधील सुसंवादामुळेच सर्वव्याप्त अस्तित्वामध्ये शांती स्थापित होण्यास मदत होते. म्हणून शिवलिंगाची उपासना करण्याने निव्वळ वैयक्तिक लाभ होतो असे नाही तर ती समस्त अस्तित्वाची पूजा होते.

  • नमकम्: नमकम् म्हणजे शिवतत्वाचे अस्तित्व सर्वांमध्ये आहे, हे जाणणे होय. क्वांटम भौतिक शास्त्रानुसार आपण सर्वजण एकाच ऊर्जेने बनलो आहोत. रुद्रमच्या या विभागामुळे ती एकच ऊर्जा सर्वत्र आणि सर्वांमध्ये सर्वव्याप्त आहे याची जाणीव होते. उदा. रुद्राच्या एका मंत्रामध्ये धनुष्य आणि बाण यांना एकत्रच नमन केले जाते.
    वंचते परिवंचते तस्करनये नमो नमः

येथे रुद्राची चोर आणि तस्कर यांच्या रुपामध्ये आराधना केली जाते. ही रुद्राची ओळख आहे की सर्वव्याप्त असणारी ऊर्जा ही उत्तमात उत्तम आणि वाईटात वाईट आहे.

  • चमकम्: रुद्र्पुजेचा हा भाग भारतातील विविध भागांमध्ये विविध प्रकारे केला जातो. उत्तर भारतात श्री रुद्रमचा शेवट पुरुष सुक्ताने करतात. आर्ट ऑफ लिविंग आंतरराष्ट्रीय सेंटर सारख्या इतर ठिकाणी त्याचा शेवट दुर्गा सुक्ताने करतात. देवीच्या दुर्गा रूपाची या मंत्रांद्वारे स्तुती केली जाते. दुर्गेची स्तुती केल्याशिवाय शिवाची आराधना पूर्ण होत नाही. रुद्रम सुरवात करण्यापूर्वी स्वतःमधील रुद्राची आराधना करावी लागते. रुद्र बनूनच प्रकट विश्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवीच्या दुर्गा रुपाची आराधना करू शकतो.

रुद्र्पुजा कां महत्वाची आहे?

वैदिक कालापासून हे ज्ञात आहे की वातावरणात शांती स्थापित करण्यासाठी रुद्र्पूजा हे अत्यंत प्रभावी साधन आहे. शंकराचार्यांच्या सर्व ज्ञान परंपरांमध्ये एका नियमाचे अत्यंत निष्ठेने आणि पराकाष्ठेने पालन केले जाते ते म्हणजे सोमवारची रुद्र्पूजा. सर्व शंकराचार्य आपापल्या पद्धतीने सोमवारच्या रुद्र्पुजा करत असतात. या विधींमुळे देशात आणि जगभर शांतीची व्याप्ती स्थापित व्हावी म्हणून आदि शंकराचार्यांनी देशातील चार कोपऱ्यामध्ये चार पीठांची, ज्ञान केंद्रांची स्थापना केली. निसर्गामध्ये शांती आणि सुसंवाद स्थापित व्हावी म्हणून श्री रुद्रम केले जाते.

शिवरात्रीमधील रुद्रमचे महत्व

शिवरात्र या दिनाचे अत्यंत महत्व आहे. अशी मान्यता आहे की शिव तत्व सूक्ष्माति सूक्ष्म असल्याने कोणीही व्यक्ती स्वतःच्या विद्वत्तेच्या माध्यमातून शिव तत्वाला जाणून घेऊ शकत नाही. ही ऊर्जा आपल्यामध्ये उदय होण्यासाठी आपणास प्रतिक्षा करावी लागते. आणि शिवरात्र हा असा दिवस आहे की शिवतत्व वा शक्ती प्रकट होण्याच्या अगदी समीप असते. या दिवशी शिवतत्व स्वतःहून प्रकट होत असते आणि त्यांच्या कृपेने प्रत्येकाला आशीर्वाद देत असते, चराचरामध्ये विपुल प्रमाणात व्याप्त होत असते. ते तत्व इतके समीप असते की श्री रुद्रमचे उच्चारण करणे तसेच त्यांचे उच्चार ऐकल्याने आपणास त्या शिवतत्वाचे ओझरते दर्शन, अनुभूती मिळू शकते.

शिवरात्रीकडे आपण जेंव्हा ज्योतिष्यशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहतो, असे आढळते की सूर्य आणि चंद्र अशा स्थितीत असतात की जेणेकरून वात दोष (वायू आणि आकाश तत्वामधील असमतोल) वाढलेला असतो. म्हणून शिवरात्री दिवशी जगभरातील लोकांना एका जागी स्थिर बसणे आणि ध्यान करणे अशक्य असल्याचे आढळते. त्यांचे शरीर आणि मन सतत काहीतरी करण्याची इच्छा करत असते. म्हणूनच शिवरात्र हा दिवस उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्या उत्सवाच्या तयारीसाठी असतो.

उत्तमरित्या उत्सव साजरा केल्यानंतर आपण शांत, स्थिर होऊन ध्यानमग्न झाल्याचे आणि शिव तत्वामध्ये खऱ्या विश्रामाची अनुभूती मिळाल्याचे जाणवेल. रात्र ही विश्रामासाठीच असते. म्हणून तिला शिव दिवस असे न म्हणता शिवरात्री असे म्हणतात. या रात्रीमध्ये आपण शिव तत्वामध्ये विश्राम करू शकता. म्हणून संपूर्ण दिवसभर उत्सव आणि रात्रीच्या तयारी साठी आणि जेंव्हा वात शांत, स्थिर होतो तेंव्हा आपण खोल ध्यानात जातो आणि मग शिवतत्व देऊ इच्छित असलेल्या आनंदाची अनुभूती येते.

रुद्रपूजेत उपस्थित असल्याचे लाभ

रुद्र हा एकादश म्हणजे अकरा रुद्र म्हणून जाणतात आणि हे अकरा आपल्या अस्तित्वात विविध अकरा विजयाच्या स्वरुपात उपस्थित असतात. आपल्या शरीरात देखील अकरा विविध इंद्रिय संस्था आहेत. जेंव्हा या संस्था सखोल विश्राम आणि शांती प्राप्त करतात तेंव्हा आपल्यामध्ये सखोल ज्ञानाचा उदय होतो. श्री रुद्रम मध्ये बसण्याचे अनेक लाभ आहेत परंतु शांती आणि सुसंवाद यांचा अनुभव हा मुख्य लाभ आहे, खालीलप्रमाणे हे लाभ वैयक्तिक स्तरावर परिणामकारक होऊ शकतात.

  • विद्यार्थी – वर उल्लेख केल्याप्रमाणे श्री रुद्रममुळे आपल्यात सखोल ज्ञान प्राप्त होते. आणि विद्यार्थ्यांसाठी ते खूप गरजेचे आहे. कारण सध्या अभ्यास म्हणजे काही गोष्टी शिकणे आणि परीक्षेमध्ये जाऊन त्यांचे वमन करणे, असे झाले आहे. पण जेंव्हा ज्ञानोदय होतो तेंव्हा त्या विद्यार्थ्याला उमगते कि सर्व अभ्यास, ज्ञान यांचा विशाल उद्देश्यासाठी  कसा वापर करावा. विद्यार्थी त्या ज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल प्रवीण होतो.
  • व्यावसाईक – आपण जेंव्हा आतून सखोल विश्रांत असतो तेंव्हा आपल्यामध्ये अंतर्ज्ञानाची शक्तीचा उदय होतो. व्यक्ती किती अंतर्ज्ञानी आहे यावर तो किती टिकून राहतो, इतरांपेक्षा किती प्रगती करतो हे अवलंबून असते. श्री रुद्रम या अंतर्ज्ञानासाठी सहाय्यभूत ठरते. अर्थात हे निव्वळ श्री रुद्रम वर अवलंबून नाही आहे. रुद्रम मुळे ती सखोल शांती प्राप्त होते पण ती अंतर्ज्ञानाची कला आपल्यात विकसित होण्यासाठी सुदर्शन क्रिया आणि ध्यान यासारखे सराव सातत्याने करणे गरजेचे आहे.
  • नोकरदार महिला – नोकरदार महिलांना पुरुषांपेक्षा अधिक गोष्टी कराव्या लागतात. त्यांना त्यांचे घर, त्यांची मुले,  त्या मुलांचा गृहपाठ शिवाय त्यांचे कार्यालयीन कामे देखील करावी लागतात. खरे तर महिला या पुरुषांपेक्षा बहु कार्य प्रणव असतात परंतु या सर्व गोष्टी करताना शांती टिकवण्यासाठी खुपश्या आंतरिक शक्तीची गरज भासते. आणि ही आंतरिक शक्ती रुद्रमचे पठन तसेच रुद्रपूजेमध्ये, खास करून शिवरात्रीमधील रुद्र्पुजेमध्ये सहभागी होण्याने विकसित होते.
  • नेते – व्यावसायिक नेते किंवा राजकीय नेते असोत, त्यांना स्वतःची टीम चांगल्या रीतीने हाताळावी लागते. आणि टीम हाताळताना त्यांना स्वतःला भावनावश होणे परवडत नाही. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी सांगतात कि, “संघ हाताळताना नेत्याने तिच्या मागे असावे, पुढे नव्हे.” आणि संघामागून हाताळताना उत्तम चारित्र्य असणे आवश्यक असते. सातत्याने कार्यरत असणे तसेच रुद्रपुजेमधील सहभागामुळे निश्चल गांभीर्य प्राप्त होते.
  • युवा – पौगंडावस्थेतील तरुणांना त्यांची वाढ होत असताना खुपश्या संप्रेरकांच्या आणि भावनिक उलथापालथींना सामोरे जावे लागते. शिवरात्रीमधील रुद्रपुजेमध्ये सहभागी होण्याने आंतरिक शांती टिकवण्यास मदत होते. आणि जेंव्हा आपले मन शांत, स्थिर असते तेंव्हा कोणतीही परिस्थिती आपल्याला उपद्रव न होता ते संप्रेराकांमधील बदल, आवेग आणि उत्कट भावना, ज्या आपल्यामध्ये निर्माण होत असतात त्यांचा विधायक रीतीने वापर करू शकता.

रुद्रम संकल्प

संकल्प याचा शब्दशः अर्थ आहे प्रतिबद्धता. आपण एखाद्या कारणासाठी प्रतिबद्ध असतो परंतु जेंव्हा आपण रुद्रममधील संकल्पाबद्दल बोलतो, हा संकल्प आपण रुद्रपुजेमध्ये समर्पित करतो. संकल्प म्हणजे म्हणजे एखादी इच्छा/प्रतिबद्धता जी आपल्यासोबत व्हावी अशी इच्छा असते. त्याची आंतरिक तीव्रता खूप असते. जर आपण ती धरून ठेवली, सतत तिच्याबद्धल विचार करत राहिलो तर त्याबध्दल आपण क्षुब्ध होतो आणि अपेक्षित परिणाम प्राप्त न झाल्यास नैराश्य येते. जे आपणास हवे ते आपल्या बाबतीत घडणार आहे, हा एकमेव विश्वासच अपेक्षित गोष्टी घडवतो.

संकल्प सोडणे अगदी अश्या प्रकारेच कार्य करतो. आपल्या इच्छा, अपेक्षा या थोडेसे तांदूळ आणि फुले यांच्या रुपात आपल्या हातात घेतो आणि मग ‘हे मला हवे आहे’ या भावनेने त्या दैवी शक्तीला देऊ करतो. हे किंवा यापेक्षा उत्तम माझ्याबाबतीत घडू दे, या विश्वासाने आपण हा संकल्प दैवी शक्तीला देऊ करतो. हे केल्यावर आपणास त्या आवेगापासून निवांतपणा आणि मुक्ती जाणवते, हे किंवा यापेक्षा उत्तम घडणार आहे, हा विश्वास आनंद देतो. हा विश्वासच संकल्प पूर्ण होण्यास बळ देतो.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *