कथा आणि उत्सव

इतिहासामध्ये ज्या काही महत्वपूर्ण घटना घडल्यात त्यांच्या स्मरणार्थ आज सण साजरे केले जातात. आपण ख्रिसमस साजरा करतो कारण त्या दिवशी काहीतरी महत्वाचे घडले होते. लोक ईद साजरी करतात कारण भूतकाळामध्ये त्यादिवशी काही चांगले घडले होते. असेच उत्सव साजरे होतात.

प्रत्येक सणामागे एखादी गोष्ट आहे किंवा काही खगोलीय महत्व आहे. जसे करवा चौथ- पौर्णिमेचा चौथा दिवस असतो. ज्यामध्ये महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी पूर्ण दिवसभर उपवास करतात, त्यानंतर उत्सव साजरा करून उत्तम आहार करतात. हि प्रथा आहे आणि यामागे आणखी कथा आहेत.

दिवाळीच्या कथा (Stories of Diwali)

अश्यारितीने दिवाळी जो ‘प्रकाशाचा उत्सव’ आहे – यामागे देखील खूप कथा आहेत. एक कथा अशी आहे कि याच दिवशी श्रीराम १४ वर्षाचा वनवास संपवून घरी परतले होते.

आणखी एका कथे अनुसार एक दुष्ट व्यक्ती सर्वाना खूप त्रास द्यायचा. त्याचा पराभव झाल्यावर मरताना त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. तेंव्हा त्याने सांगितले कि, ‘त्याच्या पृथ्वीवरच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने दिवे लावावेत आणि अज्ञानरुपी अंधकार दूर करून त्याच्या मृत्यूचा उत्सव साजरा करावा.’ किती सुंदर इच्छा आहे नां, ती देखील हिटलर सारख्या व्यक्तीची ज्याने सर्वांना त्रासच दिला.

श्रीकृष्णाची पत्नी, सत्यभामाने त्याला युद्धात पराजित केले. तो इतका शक्तिशाली होता कि कोणीही पुरुष त्याचा पराभव करू शकत नव्हता. पण जेंव्हा एक महिला त्याच्या समोर आली तेंव्हा त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने विचार केला, ‘ एक महिला काय करू शकते?’ पण खरे तर त्या महिलेनेच, श्रीकृष्णाच्या पत्नीने त्याचा पराभव केला. या सगळ्या मागे श्रीकृष्णच होते. त्याचे नांव ‘नरकासुर’ एवढ्या साठी होते कारण तो जेथे जेथे जायचा तेथे तो लोकांना नरकप्राय कष्ट द्यायचा आणि त्या जागेला नरक बनवायचा. मृत्युवेळी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली असता त्याने सांगितले, ‘माझ्या मृत्यूने सर्वांच्या जीवनात प्रकाश यावा.’ मग सर्व लोकांनी जास्तीत जास्त दिवे प्रज्वलित केले, जीवनाचा उत्सव साजरा केला, सारी कटुता विसरून उत्सव साजरा केला. आणि दिवाळी सुरु झाली. अश्या अनेक कथा आहेत.

गुरुदेव श्री श्री रविशंकर Gurudev Sri Sri Ravi Shankar) यांच्या ज्ञानचर्चेतून संकलित

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *