नरक चतुर्दशीला काली चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि नरक निवारण चतुर्दशी या नांवाने देखील संबोधले जाते. हा हिंदू सण आहे जो हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला (चौदावा दिवस) असतो. दीपावलीच्या पांच दिवसातील हा दुसरा दिवस होय.
प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात.
नरक चतुर्दशी कथा
“मी भागवत वाचलेले नाही. या विषयाबाबतीत मला फारसे माहीत नाही. परंतु भगवान श्रीकृष्णांनी एक देश, जो सध्याचा ईराक आहे, मुक्त केला होता. त्याकाळी ईराकवर नरकासुर नामक राक्षस राज्य करत होता. त्याच्या १६००० उपपत्न्या होत्या आणि तो त्या सर्वाना त्रास द्यायचा. त्या देशाची सर्व जनता त्रस्त झाली होती. त्याच्या मुलाचे नांव भागदत्त होते. त्याच्या नांवावरून सध्या त्या शहराला बगदाद हे नांव पडले आहे. म्हणजे लक्षात येईल कि ईराक आज जे सहन करतोय तेच ५००० वर्षापूर्वी देखील तेथे घडत होते.
५००० वर्षापूर्वी देखील ईराकमध्ये अशीच शासन व्यवस्था होती. जेंव्हा मी ईराकमध्ये होतो तेंव्हा कुर्दीस्तानच्या लोकांनी मला सांगितले कि तेथे शेकडो गांवे अशी आहेत जेथे एकही पुरुष नाही आहे कारण सद्दाम हुसेनने सर्व पुरुषांना ठार मारले होते. त्या गावामधील सर्व लोक भयंकर दुःखात होते. आम्ही ज्यांच्या बरोबर बोललो त्या सर्व महिलाच होत्या. त्या आमच्या समोर आपले दुःख सांगत होत्या.
हे खूप निराशाजनक आहे कि या युगात देखील अशी असुरी प्रवृत्ती अस्तित्वात असू शकते. आपण युगांडा मधील अश्या प्रकारच्या घटना बाबत ऐकले असेल. एकाने फ्रीजमध्ये कित्येक कवट्या गोळा करून ठेवल्या होत्या. ऐकलेय नां याबध्दल? कंबोडियामध्ये देखील लाखो लोकांना त्रास दिला जायचा. आज देखील अश्या घटना ऐकायला मिळतात. तेथे एका कम्युनिस्ट जनरलने सर्वाना शेती करायला लावली. काही लोकांना शेती करणे ठाऊक नव्हते. काही व्यापारी होते त्यांना शेतीबध्दल माहित नव्हते त्यांच्या वर जबरदस्ती केली. ज्याने विरोध केला त्याला ठार मारले. लाखो लोक मारले गेले. तेथील एक तृतियांश लोक संख्या एका व्यक्तीमुळे मारली गेली, अशी असुरी मानसिकता ५००० वर्षापूर्वी होती.
नरकासुराने १६००० स्त्रियांसोबत जबरदस्तीने विवाह केला. त्यांना बंदी बनवून, आपले दास करून ठेवले. म्हणून जेंव्हा तो राक्षस श्रीकृष्णाच्या हाताने मारला गेला तेंव्हा त्या स्त्रियांचा उध्दार झाला. श्रीकृष्णाने त्यांना मुक्त केले. त्या १६००० स्त्रियांनी सांगितले कि त्या आत्ता आत्महत्या करतील. त्या सर्वजणी सामुदायिक आत्महत्या करणार होत्या कारण त्या स्त्रियांनी पती शिवाय जगणे वर्जित होते. त्यांना समाजात सन्मान मिळणार नव्हता, खासकरून अश्या असुराच्या पत्नींना. म्हणून त्या सर्वजणींनी श्री कृष्णाला सांगितले कि असुरासोबत राहिल्यामुळे त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना स्वीकारणार नाहीत आणि समाज देखील स्वीकारणार नाही. म्हणून आत्महत्या करणेच ठीक होईल.
यावर श्रीकृष्ण म्हणाले कि, “नाही, मी तुम्हा सर्वाना माझे उपनाम देईन. तुम्हाला स्वतःला ही किंवा ती, नरकासुराची पत्नी म्हणवून घेण्याची गरज नाही”. श्रीकृष्ण त्याकाळातील खूप प्रसिध्द आणि लोकप्रिय व्यक्ती होते. असे केल्यास त्या सर्व महिला सन्मानपूर्वक जगू शकत होत्या. म्हणून श्रीकृष्णांनी त्यांचे स्वामी बनून, आपले नांव देऊन नरकासुराच्या १६००० स्त्रियांना सन्मान दिला. अशी कथा आहे. किती चांगले काम केले नां? श्रीकृष्णांनी त्यांना नवीन जीवन दिले. पण वास्तविक त्यांच्या तीनच पत्नी होत्या, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबवती.