रक्षा बंधन | Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन २०१८|Raksha Bandhan 2018 Dates: २६ अगस्त २०१८

रक्षाबंधन का त्यौहार | About Raksha Bandhan in Marathi

आपण समाजात जगत असताना मतभेद, गैरसमज आणि संघर्ष होतच रहाणार. त्यातूनच तणाव, असुरक्षितता आणि भीती निर्माण होते. सतत भीती वाटत राहते कि, दुसरी व्यक्ती काय करेल, कशी वागेल? ते आपल्या गोष्टी हिसकावून तर घेणार नाहीत नां? अश्या भावना कुटुंबात तसेच समाजात असणे वाईट आहे. या भावनांमुळे चांगुलपणा आणि सृजनशीलता नाहीशी होते. आपले व्यक्तिमत्व खुंटून जाते. त्याचा विपरीत परिणाम परस्परामधील वर्तणूकीवर होतो. समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था नष्ट होऊ लागते.

रक्षाबंधन का महत्व | Importance of Raksha Bandhan in Marathi

रक्षा बंधन एकमेकांशी जवळीक साधण्याचा सण आहे. परस्परांना हमी, विश्वास देण्याची संधी आहे. ‘ मी तुझ्या मदतीसाठी, संरक्षणासाठी इथे आहे.  मी आपल्या नाते संबंधाप्रति,  मैत्रीप्रति वचनबद्ध आहे.’ हा विश्वास दर्शवण्यासाठी, जागवण्यासाठी हा सण आहे. एकमेकांच्या हातावर राखी, धागा बांधून ही जवळीक आपण साधतो. या हमीमुळे, जवळीकीमुळे भीती नाहीशी होते. जेंव्हा भीती नाहीशी होते तेंव्हा आपल्या जीवनातून अज्ञान नाहीसे होईल.

अगले पांच सालों के लिए रक्षाबंधन उत्सव की तारीख पता करें | Know the dates for Raksha Bandhan festival for next five years

१५ अगस्त २०१९गुरूवार
३ अगस्त २०२०सोमवार
२२ अगस्त २०२१रविवार
११ अगस्त २०२२गुरूवार
३० अगस्त २०२३बुधवार

यज्ञोपवीत (जनेऊ) का संदेश और बदलने का महत्व

उपकर्म - प्रतिबद्धता

आपल्यावर आपल्या समाजाचे, पालकांचे आणि संस्कृतीचे ऋण आहे. ज्या समाजाने आपल्याला सर्व काही दिले, ज्या पालकांनी आपले पालनपोषण केले आणि ज्या संस्कृतीने, ज्या ऋषी परंपरेने पुरातन ज्ञानाचे जतन केले- आपल्या पर्यंत पोहोचवले, त्यांच्याप्रती आपण ऋणी असायला हवे.त्यांच्या संरक्षणाप्रति आपण प्रतिबद्ध असायला हवे.उपनयना वेळी या जबाबदारीचे स्मरण सदोदित रहावे म्हणून यद्नोपवित, जानव्हे घातले जाते. कालानुरून ते धागे जीर्ण होतात. ते बदलण्याचा, ‘ उपकर्म ‘ करण्याचा दिवस श्रावण पौर्णिमा आहे. प्रतिवर्षी या दिवशी ‘ तर्पण ‘ करून यद्नोपवित बदलतो.

सर्व चारी वेद कित्येक ऋषी मुनींद्वारे लिहिले गेले. तसेच त्यांच्या परंपरेमुळे सर्व ज्ञानाचे जतन झाले. म्हणून हे ज्ञान आपल्याला प्राप्त झाले. त्या ज्ञानाप्रति, परंपरेप्रति, धर्माप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पौर्णिमा आहे.

खरी कृतज्ञता :

हे ऋषी मुनी आत्ता देह रूपामध्ये नाहीत. पण ज्ञान रूपाने ते ‘ चिरंजीव ‘ बनले आहेत. मग त्यांच्याप्रती कसे कृतज्ञ होऊ शकतो ! मी तर म्हणेन, त्यांची जी शिकवण आहे, ‘एकमेकांशी संघर्ष न करता, मैत्रीभावनेने प्रेमभावानेने राहुन, त्यांची ‘ वसूधैव कुटुंबकम् ‘ हि जीवनशैली अंगिकरून, होय नां !

चंदन टिळा :

आपण कपाळावर चंदन टिळा लावायला हवा. चंदन ज्ञानाचे प्रतीक आहे. प्रत्येकाच्या जीवनातून अज्ञान आणि दुःख नाहीसे होवो, ज्ञान प्राप्त होवो आणि संपूर्ण जीवन उत्सवमय होवो. या सणांचा आणि आर्ट ऑफ लिविंगचा उद्देशच तो आहे - हा लेख श्री श्री रविशंकरजींच्या ज्ञान चर्चेतून लिहिलेला आहे.

माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी संपर्क - webteam.india@artofliving.org