जीवनाचे तीन आयाम

आपल्याला हे ठाऊक असले पाहिजे की आपल्या प्रत्येकाला अनुभवास येतात असे तीन आयाम आहेत. जागे होणे, स्वप्न पाहणे आणि झोपणे. आपण हे तीनही आयाम नीट समजून घेत नाही – सहसा, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण आपल्या स्वप्नांकडे तर लक्षही देत नाही. आपण आपल्या गाढ झोपेकडे लक्ष देत नाही किंवा त्यावर विचारही करत नाही. जर आपण नीट लक्ष दिले, तर आपल्याला चैतन्याची चौथी अवस्था कळू शकते, जी यापैकी काहीही नाही, तर त्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर वेगळी आहे, जी ध्यानात अनुभवता येते.

रोज रात्री जेव्हा आपण झोपतो किंवा दुपारी डुलकी घेतो तेव्हा काय होते हे आपल्याला माहीत आहे का? झोपेचे तीन स्तर आहेत जे आपण अनुभवतो. जर ती गाढ झोप असेल तर आपल्याला काही माहीत नसते. एक हलकी झोप असते आणि एक REM झोप (Rapid Eye Movement -डोळ्यांची जलद हालचाल), ज्यात स्वप्ने पडतात.

जागृत अवस्था आणि झोप हे सूर्योदय आणि अंधार यासारखे असतात. स्वप्न हे दोन्ही मधल्या संधिप्रकाशासारखे आहे आणि ध्यान हे बाह्य अवकाशात उड्डाण घेण्यासारखे आहे, जिथे सूर्यास्त नाही, सूर्योदय नाही, काहीही नाही !

-गुरुदेव श्री श्री रवि शंकर
sattva app logo

#१ जागतिक विनामूल्य ध्यान अ‍ॅप

गुरुदेवांच्या मार्गदर्शित ध्यानांसह कधीही, कुठेही ध्यान करा!

आपली तीन शरीरे आहेत

प्राचीन धर्मग्रंथ सांगतात की आपली तीन शरीरे असतात: भौतिक (स्थूल ), सूक्ष्म आणि कारण शरीर. आपले एक सूक्ष्म शरीर आहे जे सर्व विचार आणि भावनांनी बनलेले आहे. जेव्हा आपण REM अवस्थेत झोपतो तेव्हा आपले सूक्ष्म शरीर कार्य करत असते. हे स्वप्नावस्थेत कार्यरत असते. म्हणूनच स्वप्नात तुम्ही रंग पाहू शकता, सुगंध घेऊ शकता आणि स्पर्शाची अनुभूती घेऊ शकता – तुम्ही उबदार मिठी देखील अनुभवू शकता! पंचेंद्रियांचा कोणताही वापर न करता, तुम्ही पाचही इंद्रियांचा अनुभव घेता. आपले सूक्ष्म शरीर स्वप्नावस्थेत कार्यरत असते.

स्वप्नांमध्ये, आपण वास्तविक जगाच्या जागृत अवस्थेत जे करतो किंवा आपण वास्तविक जग मानतो ते सर्व अनुभवतो. शास्त्रज्ञ म्हणतात की हे सुद्धा खरे जग नाही !

पण गाढ झोपेत, आपण आपल्या शरीराची वेगळीच पातळी किंवा तिसरा प्रकार अनुभवतो, ते आहे कारण शरीर. गाढ झोपेत कारण शरीर कार्यरत असते. ही सर्व ऊर्जा आहे ज्यामध्ये तुम्हाला कसल्याही सीमा जाणवत नाहीत, तुम्हाला शरीर अजिबात जाणवत नाही. पण जेव्हा आपण गाढ झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्याला कसा अनुभव येतो ? आपण एकदम उत्साही असतो !

जर तुम्ही फक्त तुमच्या सूक्ष्म शरीरात असाल आणि तुम्हाला रात्रभर स्वप्ने पडली असतील तर जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्हाला खूप थकवा जाणवेल; पण जेव्हा तुमची गाढ झोप झालीअसेल, तेव्हा अशी स्थिती असते की तुम्ही तुमच्या कारण शरीराबरोबर असता, जे उत्साह, ताजेपणा आणि चैतन्य अशा सर्व ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही गाढ झोपेनंतर उठता तेव्हा तुम्हाला खूप ताजेतवाने, उत्साही आणि ऊर्जावान वाटते. आपण रोज रात्री झोपतो पण झोपेची व आपली कधीच भेट झालेली नसते! झोपेबरोबर हातमिळवणी झालेली नसते. ध्यानामुळे हे होण्यास मदत होते.

ध्यान हे झोपेसारखेच आहे का?

ध्यान हे गाढ झोपेसारखे आहे पण गाढ झोप नाही. जास्त वेळ झोपल्यास जास्त थकवा जाणवतो. काही लोक जेव्हा मादक पदार्थांचे सेवन करतात आणि जेव्हा ते झोपेतून जागे होतात तेव्हा त्यांना नशेचा परिणाम (हँगओव्हर) जाणवतो, अगदी तसेच आहे हे. जेव्हा तुम्हाला खूप थकवा आणि आळस वाटत असेल तेव्हा तुम्हाला काहीही करावेसे वाटत नाही. नशा केल्यावर देखील असेच घडते. नंतर त्या लोकांना त्रास होतो, पूर्णपणे गळून गेल्यासारखे वाटते, ऊर्जाच रहात नाही.

ध्यानात मात्र असे काहीही होत नाही. ध्यान तुम्हाला ऊर्जेच्या त्या स्त्रोताचा वापर करण्यास मदत करते जो तुमच्या स्वतःच्या शरीराचा, तुमच्या कारण शरीराचा भाग आहे. जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर पडता तेव्हा ध्यान तुम्हाला उन्नत भावना आणि बळ देते आणि ते स्वास्थ्यासाठी चांगले असते. ध्यानाने आपली रोगप्रतिकारक शक्ती पाच पटीने वाढते. ध्यान केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते याचे वैज्ञानिक पुरावे आहेत.

विशेषत: कोविडच्या काळात, जगभरातील आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या लोकांनी नियमित ध्यान केले कारण त्यांना ते खूपच फायदेशीर वाटत होते. कोविड -१९ च्या काळात आरोग्यसेवा व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर प्रचंड दडपण होते.
विशेषत: पहिल्या काही महिन्यांत, कोविडवरील लस निघण्यापूर्वी, त्यांना काय करावे, रुग्णांवर कसे उपचार करावे हे माहीत नव्हते. त्या वेळी गुरुदेवांनी जगभरातील लोकांसाठी दिवसातून दोनदा ध्यान घेतले, ज्यात दहा लाखांहून अधिक डॉक्टर आणि परिचारिका यांनी भाग घेतला. त्यांचा अनुभव खूप चांगला होता; त्यांनी सांगितले की त्या कठीण काळात त्यांची उर्जा पातळी वाढण्यास आणि ती टिकून राहण्यास खरोखरच खूप मदत झाली.

नकळत शांत स्थितीत जाणे म्हणजे झोप. जाणीवपूर्वक शांत राहणे म्हणजे ध्यान. ध्यान तुम्हाला अधिक ऊर्जा देते आणि सूक्ष्म आंतरिक प्रगती साठी मदत करू शकते.

~ गुरुदेव श्री श्री रवि शंकर

मुक्त होण्याचा परवाना

पाच इंद्रियांद्वारे मन कोणत्या ना कोणत्या भौतिक वस्तूमध्ये खिळलेले असते. जेव्हा तुमचे मन पाचही इंद्रियांपासून मागे हटत आतल्या स्तरात शिरते, तेव्हा काय होते? तुम्ही पूर्णपणे लयीत असता. झोपेत असेच होते. झोपेत तुम्ही कुठे असता? तुम्ही विरघळून गेलेले असता!

‘मी,मला, माझे’ ही भावना बंधनाचे कारण आहे. ही भावना नाहीशी झाली की मुक्ती अनुभवास येते. तुम्ही चोवीस तास बंधनात राहू शकत नाही. तुम्ही झोपायला जाता. झोपेत तुम्हाला ‘मी, मला, माझे’ चे भान नसते. जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा तुम्ही काय असता आणि कुठे असता? तुम्ही तुमचे नाव आणि ओळख गमावलेली असते. तुमचे शरीर पलंगावर आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. तुम्ही आपली प्रत्येक ओळख गमावता. तुम्ही असे म्हणू शकत नाही की ही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची झोप आहे, दुसऱ्या कोणाची नाही ! झोप म्हणजे झोप. तिथे श्री श्री नाही आणि रविशंकर नाही. तिथे कोणीही नाही – नाव नाही आणि आकारही नाही! फक्त झोप!!

तर दुसरीकडे, ध्यान म्हणजे जाणीवपूर्वक सजग रहात आपल्यातील ‘मी’ विरघळवत नेणे; जेव्हा ‘मी’ चे अस्तित्वच नाहीसे होते, ते स्वातंत्र्य होय; ती मुक्ती आहे.

झोपी बाबत सांगायचे म्हणजे, दिवसभराच्या मेहनतीनंतर थकलेल्या व्यक्तीला डास असले तरीही चांगली झोप येईल. झोपेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. या जगात, आपण केवळ विरोधाभासी मूल्यांचा आनंद घेऊ शकतो, परंतु समाधीचा आनंद त्याहूनही मोठा असतो. ध्यान तुम्हाला विरोधाभासी मूल्यांच्या पलीकडे घेऊन जाते.

योग निद्रा (NSDR: नॉन-स्लीप डीप रेस्ट)

निसर्ग तुम्हाला नकळत काही काळ शांत राहण्यास भाग पाडतो आणि तीच झोप होय. झोपेमुळे तुम्हाला ऊर्जा मिळते.आजच्या काळात खूप मोठी स्वप्ने ठेवणे, खूप काही करण्याची इच्छा असणे यामुळे निद्रानाश होऊ लागला आहे. “मला काहीही नको आणि मी काहीही करत नाही ” या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा तुम्ही लहान बाळासारखे गाढ झोपी जाल

सजगतेने झोपणे ही योगनिद्रा आहे. तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तर तुम्ही योगनिद्रा करुन पाहू शकता. झोपेसाठी सुद्धा योगाचा ऑनलाईन कोर्स आहे. तुम्ही तो आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळेत तुम्ही डीप स्लीप अँड एन्झायटी रिलीफ कोर्स करू शकता.

ध्यान करताना झोप

एका श्रोत्याने गुरुदेवांना प्रश्न विचारला: – ध्यान करताना झोपणे योग्य आहे का ?
गुरुदेवांनी उत्तर दिले: तुम्ही घोरत नसाल आणि इतरांना त्रास देत नसाल तोपर्यंत ठीक आहे! ध्यान म्हणजे गहिरी विश्रांती. समाधी म्हणजे काय ? ती दहा लाख वर्षांच्या विश्रांतीच्या बरोबरीची आहे. जर तुम्ही अगदी क्षणभर ध्यान केले आणि त्याआधी व नंतर झोपलात तरी हरकत नाही.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *