शिक्षण (Education in Marathi)

शैक्षणिक क्रांती

मोफत शालेय शिक्षण योजना

श्री श्री रविशंकर यांच्या द्वारे १९८१ साली “वेद विज्ञान महाविद्यापीठ" (VVMVP) ही शाळा सुरु झाली. श्री श्रीं नी आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राजवळ काही स्थानिक मुले मातीत खेळताना पाहिली.त्या मुलांना शिक्षणाचा कोणताही मार्ग किंवा संधी उपलब्ध नाही,असे कळले तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी काहीतरी करायचे ठरविले आणि ही शाळा सुरु झाली.

या मुलांना स्वच्छते विषयी धडे देणे,ज्ञानवर्धक खेळ शिकवणे आणि त्यांना आरोग्याला पोषक दुपारचे जेवण मोफत देणे,यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक केली.त्या मुलांना आणि पालकांना याचे मोठे आकर्षण वाटले आणि असे आकर्षण वाटणे अद्यापही चालू आहे.शाळेची जसजशी प्रगती होऊ लागली,तसतसा औपचारिक शिक्षणाचा आराखडा तयार केला गेला आणि विद्यार्थी व शिक्षकांची संख्या वाढत गेली.

आज या शाळेसारख्या ४०४ मोफत शाळा ग्रामीण व आदिवासी भागात शैक्षणिक क्रांती घडवत आहेत अशा मोफत शाळांच्या माहितीसाठी इथे क्लिक करा.

प्रथम पिढीचे विद्यार्थी :

जवळपास ९५% विद्यार्थ्यांची प्रथम पिढी शिक्षण घेत आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांचे स्थानिक परीक्षांमध्ये यशाचे प्रमाण १००% आहे.

“या लहान वयात खरं तर माझी मुलगी शेतात काम करत असती.ती शिकतेय याचं आम्ही स्वप्नदेखील पाहिले नव्हते.तिला शाळेत जाताना पाहून मी खूप आनंदी आहे.”– सौ.सावित्री. एक पालक

तणाव मुक्त शाळा :

विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, पुस्तके, लिखाणाचे साहित्य, बस सेवा आणि दुपारचे जेवण पुरवले जाते. जेणेकरून शाळेत न येण्याचे कोणतेही कारण त्यांनी सांगू नये.योग,ध्यान,खेळ आणि सर्जनशील कला, जसे – नृत्य, संगीत, चित्रकला आणि रंगकाम. हे शाळेच्या अभ्यासक्रमाचा महत्वाचा भाग आहेत.जेणेकरुन त्यांचे मन व शरीर सुदृढ राहील.

‘आर्ट एक्सेल’ हे आर्ट ऑफ लिव्हिंगचा लहान मुलांसाठी असलेले शिबीर विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे आयोजित केले जाते.जेणे करून त्यांना घरातील नकारात्मकता हाताळायला मदत होईल.आवश्यक वैद्यकीय सुविधा व फिरते उपचार केंद्रदेखील उपलब्ध असते.

विद्यार्थ्यांना राज्य शासनाची माहिती व्हावी आणि त्यांच्यात नेतृत्वगुणांचे संस्कार व्हावे म्हणून शाळेचे स्वतःचे मंत्रीमंडळ असते.शाळेची मुले स्वतःच हे मंत्रीमंडळ निवडतात.या व्यवस्थेद्वारे मुले शासनव्यवस्थेची ‘भारतीय लोकशाही व्यवस्था’ प्रत्यक्ष व्यवहाराद्वारे शिकतात.शाळेचे मंत्रीमंडळ आपल्यापेक्षा छोट्या वर्गांची जबाबदारी घेते आणि शाळा चालवण्यास मदत करते.

विकसनशील समाज :

मुलींचे शिक्षण व महिला सबलीकरणावर जोर देत मोठ्या विद्यार्थ्यांना व्यवसाय धंद्यासंबंधी कौशल्य जसे – शिवणकाम, संगणक शिक्षण,सुतारकाम आणि दुय्यम शिक्षणासाठी प्रोत्साहनपर पाठबळ दिले जाते.

माजी विद्यार्थी आणि शाळा यांमध्ये स्नेहबंध कायम रहावा या उद्देशाने ‘माजी विद्यार्थी मेळावा’ हा उपक्रम नुकताच सुरु झाला आहे.माजी विद्यार्थी आपले अनुभव इतर विद्यार्थ्यांना सांगतात आणि दुय्यम शिक्षणाचे महत्व व त्यांचे आयुष्यातील ध्येय यासाठी प्रोत्साहन देत, पाठपुरावा करतात.

माजी विद्यार्थ्यांचे गट विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सातत्याने भेटी घेत असतात व त्यांच्यात शिक्षणासंबंधी जागरूकता वाढवतात.