पी. गोपीचंद: एका अजिंक्य खेळाडूचे रहस्य

पी. गोपीचंद हे नि:संशयपणे क्रीडा क्षेत्रातील एक जगविख्यात व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी बॅडमिंटन या खेळात भारताचे नाव जगाच्या नकाशावर लिहिले आहे. १९९४ मध्ये त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना चालताना त्रास व्हायचा. दोन वर्षानंतर त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कार्यक्रम केल्यानंतर त्यांची तब्येत सुधारू लागली. सन २००१ मध्ये त्यांनी प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी झाले, प्रकाश पादुकोण यांच्यानंतर असा पराक्रम करणारे ते दुसरेच भारतीय होत.

त्यांनी सन २००८ मध्ये हैद्राबाद, भारत येथे गोपीचंद बॅडमिंटन अॅकेडमीची स्थापना केली आणि त्यानंतर सन २०१२ लंडन येथील ऑलिम्पिक्स मध्ये त्यांची शिष्या सैना नेहवाल हिला कास्यपदक मिळाले आणि २०१६ रिओ ऑलिम्पिक्स मध्ये त्यांची शिष्या पी. व्ही. सिंधू हिला रौप्यपदक मिळाले.

पी गोपीचंद यांनी त्यांना आलेल्या सुदर्शन क्रियेच्या सुखद अनुभवाविषयी कथन केले:  

मी १९९६ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी कनिष्ठ पातळी वरील खेळाडूंमध्ये मी खूप उद्धट स्वभावाचा म्हणून प्रसिद्ध होतो म्हणजे पंचांशी भांडण करणे, खुर्च्या फेकणे, राग आल्यावर रॅकेट फेकणे असा काही माझा स्वभाव होता. पण माझी कनिष्ठ पातळीवरील कारकीर्द संपताना माझे चाहते म्हणू लागले की, ‘गोपी शांत स्वभावाचा खेळाडू झाला आहे’. मी माझ्या मध्ये लक्षणीय बदल होताना पाहिलेत, जे मला ओळखत होते त्यांनी देखील माझ्यातील हा बदल पाहिला.

व्यक्तीशा मी बेसिक प्रोग्रॅम (आर्ट ऑफ लिव्हिंगचा हेप्पिनेस प्रोग्रॅम) केला आणि सुदर्शन क्रिया आणि भस्त्रिका (प्राणायाम) शिकलो. मला सायनस ची समस्या होती. खेळा निमित्त जगभर प्रवास करणे आले त्यामुळे प्रवासादरम्यान हवामानात खूपच बदल होत, वातानुकुलीत वाहनां मध्ये झोपणे या मुळे मला अनुनासिक समस्या निर्माण झाल्या. पण सुदर्शन क्रिया शिकल्यामुळे मला या वर मात करता आली. हे सर्व १९९६ मध्ये सुरु झाले. आणि पाचच वर्षानंतर मी ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.

हळू हळू पण अतिशय लक्षणीय बदल घडत गेले आहेत मग ते एकाग्रता असो वा आरोग्य.