गुरुदेव श्री श्री रविशंकर

वाणीचे चार स्तर आहेत – परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी. मनुष्यप्राणी फक्त चौथ्या स्तरात बोलतो. आपण जी भाषा बोलतो ती वैखरी. हे वाचेचे सर्वात जास्त स्पष्टपणे व्यक्त होणारे रूप आहे. वैखारीपेक्षा सूक्ष्म आहे मध्यमा. तुम्ही बोलण्याच्या आधी त्याचे विचाररूप तयार होते. त्या स्थितीतील वाणीला मध्यमा म्हणतात. पश्यन्ति ही जाणून घ्यायची असते. त्यात बोललेल्या शब्दांची गरज नसते. परा हे न सांगितलेले, व्यक्त न झालेले आवाक्यापलिकडचे ज्ञान असते. संपूर्ण विश्व हे गोलाकार आहे. ते अजन्मा आणि अमर्त्य आहे. ते अनादी आणि अनंत आहे. मग उत्पत्तीकर्ता ब्रह्माचे काम काय ? असे म्हणतात की प्रत्येक युगात अनेक ब्रह्मा, विष्णू आणि शिवा आहेत. स्थळ आणि काळात हे होतच असते. मग सृष्टीचा स्रोत काय ? ज्ञान आकाशा पलीकडचे आहे. ते पंचमहाभूतांच्या पलीकडचे आहे. वेद जाणले ते वैखरी मधून नाही. ही जाण अवकाशाच्याही पलीकडची आहे. सर्व दिव्य प्रेरणा त्या सर्वव्याप्त अशा क्षेत्रात स्थित असतातच. आकाश म्हणजे काय ? आकाशाचे वर्णन व्योम- व्याप्ती असे केले आहे – त्याचा अर्थ सर्व व्याप्त, सगळ्यात असलेला असा आहे. आकाशाच्या पलिकडे असलेले असे काय आहे ?आकाशाच्या पलीकडे काही आहे अशी कल्पना करणेही कल्पनेच्या पलीकडचे आहे. सर्व काही आकाशातच आहे. चार मूलभूत तत्त्वेही आकाशातच आहेत. सर्वात ठोस आहे पृथ्वी, मग जल, अग्नि, वायू आणि आकाश. हवा अग्निपेक्षा सूक्ष्म आहे. अवकाश सर्वात सूक्ष्म आहे. आकाशाच्याही पलिकडे असे काय आहे ? तर ते आहे मन, बुद्धी, अहंकार आणि महत् तत्व. हेच तत्वज्ञान आहे. सृष्टीचे तत्व जाणणे. जो पर्यंत तुम्हला सृष्टीचे तत्व कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मा कळणार नाही. तुम्ही आकाशाच्या पलिकडे जाता तेव्हा ते अनुभवण्याचे क्षेत्र असते.

आकाशाच्या पलीकडेच हे सर्व क्षेत्र सुरु होते. प्राचीन द्रष्ट्यांनी पदार्थ आणि त्याच्या गुणांबद्दल सांगितले आहे. एक खूपच मनोरंजक वाद आहे – आवक पदार्थापासून त्याचे गुणधर्म अलग करू शकू का ? हे सगळे तत्वज्ञानच खूप मनोरंजक आहे आणि त्याचा निष्कर्ष असा निघाला की तुम्ही पदार्थापासून त्याचे गुण अलग करू शकत नाही. साख्रेत्ला गोडवा साख्रेपासोन्न वेगळा काढता येईल का ? मग तरीही ती साखर राहील कां ? अग्नीपासून उष्णता आणि प्रकाश वेगळे करता येतील कां ? तरीही त्यानंतर तो अग्नि राहील कां ? पदार्थात गुण कशामुळे येतात ? आधी काय येते गुण की पदार्थ ? असे अनेक प्रश्न आहेत. जितके तुम्ही सूक्ष्मात जाल तितके तुम्ही परमेव्योमान पोहोचाल. तिथे त्या अवकाशात सर्व देवी देवता रहातात. परमे व्योमन जाणल्याशिवाय, सृष्टीची तत्वे जाणल्याशिवाय फक्त वैदिक स्तोत्र आणि मंत्र माहित असून काय उपयोग ? स्वरूप हा त्या अवकाशाचा गुण आहे. स्वरूप हीच चेतना आहे. स्वरूपातून स्फुट किंवा स्फोट होतो आणि त्यातूनच निर्मिती होते. स्वरीता – नाव आणि रुपाने व्यक्त होते. सृष्टीतील लक्षावधी गोष्टी स्वरूपातून निर्माण झाल्या आहेत. आकाश सोडून बाकीची चार तत्वे मधून मधून वादळे निर्माण करतात. तुम्ही जर त्यांच्यावर अवलंबून राहिलात तर ते तुम्हाला हादरवून टाकतील आणि परत अवकाशात नेऊन सोडतील.

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे मराठी भाषांतरित साहित्य www.artofliving.org

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *