symbolism of lord shiva

भगवान शिवाच्या मस्तकावरील चंद्रकोरचे महत्त्व

शिव तत्व म्हणजे जेथे मन नसते आणि चंद्र हे मनाचे प्रतीक आहे. जेव्हा मनच नसेल तेव्हा हे ‘नसलेलं मन’ कसं व्यक्त होणार आणि कुणाला कसे  समजणार ?  समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी थोडेसे मन हवेच.मन नसलेल्या, अमर्याद चेतनेला प्रकट जगात स्वतःला व्यक्त करण्यासाठी थोडेसे मन आवश्यक आहे. तर, ते अव्यक्त व्यक्त करण्यासाठी, ते लहान मन (चंद्रकोर) डोक्यावर आहे.
शहाणपण मनाच्या पलिकडे आहे, परंतु ते मनाच्या छटांसह व्यक्त करणे आवश्यक आहे आणि याचे प्रतीक चंद्रकोर आहे.

भगवान शिवाच्या डमरूचे महत्त्व

डमरू हे विश्वाचे प्रतीक आहे जे नेहमी विस्तारत आणि कोसळत आहे. विस्तारातून ते  कोलमडते  आणि नंतर पुन्हा विस्तारते , ही निर्मितीची प्रक्रिया आहे.
तुमच्या हृदयाचे ठोके पाहिल्यास, ती फक्त एक सरळ रेषा नसून ती एक लय आहे जी वर आणि खाली जाते. सारे  जग ही एक लय असून त्या शिवाय काही नाही; ऊर्जा वाढते व कमी होते , पुन्हा वाढते. डमरू हेच  सूचित करतो. डमरूचा आकार पहा, विस्तारापासून तो कमी होतो आणि पुन्हा विस्तारतो.

डमरू हे ध्वनीचेही प्रतीक आहे. ध्वनी म्हणजे लय आणि आवाज ही ऊर्जा आहे. संपूर्ण विश्व हे तरंग व याशिवाय दुसरे काहीही नाही,  ते लयी शिवाय दुसरे काहीही नाही. क्वांटम फिजिक्स काय म्हणते? ते एकच गोष्ट सांगते – संपूर्ण विश्व हे लयी शिवाय दुसरे काहीही नाही. ती फक्त एक लाट आहे  (अद्वैत). तर डमरू हे विश्वाच्या अद्वैत स्वरूपाचे प्रतीक आहे.

भगवान शिवाच्या गळ्यातील नागाचे महत्त्व

समाधी अशी अवस्था आहे जेथे काहीही नाही,  फक्त चैतन्याचे आतील आकाश, शिव आहे;  जेथे सतर्कता आहे आणि कोणतीही कृती नाही. या सतर्कतेचे वर्णन करण्यासाठी त्यांनी शिवाच्या गळ्यात नाग घातला. तर नाग हे सतर्कतेचे प्रतीक आहे.

ध्यानाच्या अवस्थेत डोळे मिटले असता,  ती व्यक्ती झोपेत असल्याचा भास होतो, पण तो झोपलेला नाही, तो सावध आहे. चेतनेची ही अवस्था व्यक्त करण्यासाठी, भगवान शिवाच्या गळ्यात नाग दाखवला आहे.

भगवान शिवाच्या त्रिशूलचे महत्व

त्रिशूल हे चेतनेचे तीन पैलू – जागृतअवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्थाचे  प्रतिनिधित्व करते आणि ते सत्व, रजस आणि तम या तीन गुणांचे प्रतिनिधित्व करते. त्रिशूल धारण करणे हे सूचित करते की शिव (देवत्व) तिन्ही अवस्थांपेक्षा वर आहे – जागृतअवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था तरीही या तीन अवस्थांचा धारक आहे.

देवत्व तीन गुणांच्या पलिकडे आहे, परंतु ते तीन गुणांना एकत्र धारण करते.

शूल म्हणजे समस्या किंवा दुःख. त्रिशूल म्हणजे सर्व प्रकारचे दुःख नष्ट करणारे.
जीवनात तीन प्रकारची दु:खे  उद्भवतात:
1. आदिभौतिक
2. आद्यात्मिक आणि
3. आदिदैविक 
सर्व समस्या आणि दुःखांपासून मुक्ती देणारी गोष्ट म्हणजे त्रिशूल. आणि ते शिवाच्या हातात आहे.

भगवान शिवाच्या मस्तकावरून वाहणाऱ्या गंगा नदीचे महत्त्व

गंगा म्हणजे ज्ञान; ज्ञान जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते. डोके हे नेहमी ज्ञानाचे प्रतीक आहे. हृदय हे प्रेमाचे प्रतीक आहे.
गंगा जर प्रेम असती  तर ती भगवान शिवाच्या हृदयातून बाहेर पडायला हवी होती. ती  डोक्यातून बाहेर पडत आहे, कारण ते फक्त ज्ञान आहे.

ज्ञान मुक्ती देणारे आहे, ज्ञानाने स्वातंत्र्य मिळते, ज्ञान शुद्ध करणारे आहे. ही सर्व ज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. ज्ञान ही चळवळ आहे; गती म्हणून गंगा (ज्ञान) भगवान शिवाच्या (देवत्वाच्या) मस्तकातून बाहेर पडली आहे.

भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व

तिसरा डोळा सतर्कता आणि जागरुकतेशी संबंधित आहे.

शिवाच्या निळ्या शरीराचे महत्त्व

निळा म्हणजे आकाशासारखा. निळा म्हणजे सर्वव्यापी, अनंत ज्याला मर्यादा नाही. त्याला आकार नाही. शिवाला शरीर नाही. शिव कधीच व्यक्ती नव्हता. अथांग, अनंत देवत्वाचे प्रतीक म्हणून आणि ते देवत्व लोकांना समजण्याजोगे बनवण्यासाठी, प्राचीन ऋषींनी एक रूप तयार केले.

ज्ञानाला कोणताही आकार नसतो , पण ते विश्वाच्या प्रत्येक कणात शिरते. संपूर्ण जग शिवाने भरलेले आहे – ज्याचे शरीर संपूर्ण विश्वात आहे.

शिवलिंगाचे महत्त्व

लिंगम म्हणजे ओळख, एक प्रतीक ज्याद्वारे तुम्ही सत्य काय आहे, वास्तव काय आहे हे ओळखू शकता. जे दिसत नाही पण तरीही एका गोष्टीने ओळखता येते, ते म्हणजे लिंगम.जेव्हा बाळ जन्मते, तेव्हा तुम्हाला कसे कळेल की बाळ मुलगा  आहे की मुलगी ? हे बाळ मुलगा आहे की मुलगी हे फक्त शरीराच्या एकाच  भागावरून ओळखता येते. म्हणूनच जननेंद्रियाला लिंगम असेही म्हणतात.

त्याचप्रमाणे या सृष्टीच्या परमेश्वराला तुम्ही कसे ओळखाल? त्याला कोणतेही रूप नाही! तेव्हा ते म्हणाले की त्याला ओळखण्यासाठी एक चिन्ह असावे. चिन्ह, ज्याद्वारे तुम्ही नर आणि मादी दोन्ही रूपे ओळखता, त्या दोघांना एकत्र करून एकच चिन्ह बनविले, ज्याने  कोणतेही रूप किंवा ओळख नसलेल्या परमेश्वराची ओळख होते; जो या संपूर्ण ब्रह्मांडात (सृष्टी) व्याप्त आहे, तो शिवलिंग आहे.

शिवलिंग अतिशय प्राचीन आहे, किंबहुना सर्वात प्राचीन आहे. रूपातून तुम्ही निराकारात जा, शिवलिंगातून. हे एक प्रतीक आहे जे विश्वाचा (कॉसमॉस) आणि ब्रह्मांडाचा एक निर्माता म्हणून प्रतिनिधित्व करते.

सृष्टीतील शिव आणि शक्ती ही दोन तत्त्वे आहेत. मूक अप्रकट आणि गतिशील प्रकटीकरण एकत्रितपणे शिवलिंग म्हणून प्रस्तुत केले जाते. शिवलिंग हे फक्त शिव नाही तर संपूर्ण परम चैतन्याची पूर्णता आहे.

नंदीचे महत्त्व – भगवान शंकराचे वाहन

बैल हा धर्माचे (धार्मिकतेचे) प्रतिक म्हणून फार पूर्वीपासून जगभर वापरला जात आहे. भगवान शिव बैलावर स्वार होण्याचा सरळ अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही नीतिमान आणि सत्यवादी असता तेव्हा अमर्याद चेतना, निष्पाप चेतना तुमच्यासोबत असते.

शिव तांडवांचे महत्त्व

संपूर्ण सृष्टी ही एका चैतन्याचे (शिव) नृत्य आहे. एक चेतना नाचली आणि जगातील लाखो प्रजातींमध्ये प्रकट झाली. तर ही अनंत सृष्टी म्हणजे भगवान शिवाचे नृत्य किंवा शिव तांडव. सर्व जग हे शिवाचे स्थान आहे.

कैलासाचे महत्त्व – शिवाचे निवासस्थान

शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत आणि स्मशानभूमी येथे आहे.कैलास म्हणजे ‘जेथे फक्त उत्सव असतो’ आणि स्मशान म्हणजे जेथे फक्त शून्य असते. देवत्व शून्यात तसेच उत्सवात वास करते. आणि तुमच्यामध्ये शून्यता आहे, तुमच्यामध्ये उत्सव आहे.

‘ओम नमः शिवाय’ या जपाचे महत्त्व

ओम नमः शिवाय हा अत्यंत शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे. हे तुमच्या प्रणालीमध्ये ऊर्जा निर्माण करते आणि वातावरण स्वच्छ करते. मंत्र हे असे उत्साहवर्धक ध्वनी आहेत जे चेतनेचे उत्थान करण्यास मदत करतात.

ओम नमः शिवाय, हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत कारण ‘न’, ‘म’, ‘शि’, ‘वा’, ‘य’, ही पाच अक्षरे पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पाच घटकांना सूचित करतात.

ओम हा विश्वाचा नाद आहे. ओम म्हणजे शांती आणि प्रेम.

म्हणून जेव्हा पाचही घटकांमध्ये शांती, प्रेम आणि एकोपा असतो तेव्हा आनंदच आनंद असतो !

कुंडलणीच्या शक्तीपेक्षा मंत्र मोठे आहेत. ग्रहांचा कोणताही प्रभाव असो, ओम नमः शिवाय या मंत्र जपाने तुम्ही ते दूर करू शकता.

यस्य निश्वसितं वेदः यो वेदेभ्यो अखिलम् जगत्

निर्ममे तम अहम वंदे विद्यातीर्थ महेश्वरम्

शिवत्वं गुरुत्वमच-शक्ती त्वमेव त्वमेवसी माता पिता-च त्वमेव त्वमेवसी बंधुर त्वमेवसी विद्या गतिर्मेय मतिर्देवी सर्वं त्वमैव

– ऋग्वेदातील स्तोत्र.

(ज्याचा श्वासोच्छ्वास वेद आहे, त्याला मी नतमस्तक आहे, जो त्यापासून विश्वाची निर्मिती करतो, अनासक्त, अव्यक्त राहतो आणि जो सर्व ज्ञानाचे प्रवाहांसाठी सर्वात पवित्र आणि प्रेमळ तीर्थक्षेत्र आहे. तूच शिव आहेस, तूच गुरुही आहेस आणि सृष्टीमध्ये प्रकट होणारी दैवी ऊर्जा तूच आहेस. तूच माता, पिता आणि उत्तम साथीदारही आहेस, आणि जे काही आहे त्याचेही ज्ञान तूच आहेस. मला आशीर्वाद दे की माझी बुद्धी तुझ्या  भक्तीकडे आणि तुझ्याकडे निर्देशित होईल आणि सदैव तुझ्यात  लीन राहिल)

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *