जर आपल्याला नौका कशी चालवायची हे माहित असेल, तर आपण कोणतीही नौका चालवू शकता. पण जर आपल्याला नौका चालवताच येत नसेल तर नौका बदलून काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे, फक्त व्यक्ति बदलल्याने समस्येचे निराकरण होतेच असे नाही. आज ना उद्या, आपण दुसऱ्या व्यक्तिसोबत ही तशाच परिस्थितीत असाल.
बहुतेक लोक बाहेरच्या जगात इतरत्र कुठेतरी एका परिपूर्ण नात्याच्या शोधात असतात, विरळेच लोक असतात की जे अंतर्मुख होऊन स्वतः मध्ये डोकावून पाहतात, जे त्यांच्या ओळखीचे असते. इथे या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत:
आपले आपल्या स्वत: सोबत काय नाते आहे? आपण आपले काय लागतो?
लोक विचार करतातः अरे, मी एकटा आहे. मला माझ्या एकटेपणाचा खूप कंटाळा आला आहे. मला एक जीवनसाथी हवा आहे. मला कोणाचा तरी सहवास हवा आहे. जर आपल्याला स्वतःच्या सहवासाचा इतका कंटाळा आला असेल, तर कल्पना करा की आपण दुसऱ्या कोणासाठी तर किती जास्त कंटाळवाणे असाल! आणि स्वतःलाच कंटाळलेले दोन लोक, एकत्र येऊन, एकमेकांना पूर्णपणे कंटाळूनच जातील!
नातेसंबंधात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावना, आपले मन समजून घेणे तसेच आपली स्थिर राहण्याची आणि गोष्टींकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची क्षमता.
आपले नाते काही वैयक्तिक गरजेवर आधारित आहे का
जर आपले नाते वैयक्तिक गरजेवर आधारित असेल, तर ते कदाचित जास्त काळ टिकणार नाही. एकदा ती शारीरिक किंवा भावनिक पातळीवरील गरज पूर्ण झाली की, मन काहीतरी वेगळे शोधायला लागेल आणि इतरत्र जाईल. जर आपले नाते एकमेकांना सहयोग करण्याच्या उद्देशाने असेल, तर ते जास्त काळ टिकू शकते.
जेव्हा आपण आपल्या जोडीदाराकडून सुरक्षा, प्रेम आणि समाधान शोधत असतो, तेव्हा आपण कमकुवत बनतो. जेव्हा आपण कमकुवत असता, तेव्हा सर्व नकारात्मक भावना समोर येतात आणि आपण अपेक्षा करायला लागतो. अपेक्षा प्रेम नष्ट करतात! जर आपल्याला फक्त ही एक गोष्ट माहित असेल तर आपण आपले प्रेम नष्ट होण्यापासून वाचवू शकतो.
स्वतःबद्दलची मर्यादित जाणीव आणि प्रेमाचा मर्यादित अनुभव तुम्हाला एका संकुचित मर्यादेत बंदिस्त ठेवतो, जिथे तुम्हाला गुदमरायला होते. आपण जे प्रेम मागत आहोत ते देखील आपण हाताळू शकत नाही कारण आपण कधीही आपल्या स्वतःच्या मनाच्या, आपल्या स्वतःच्या चेतनेच्या सखोलतेचा अनुभव घेतला नाही.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपीनेस प्रोग्रामसाठी नोंदणी करून स्वतःबरोबर परिपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यासाठी पहिले पाऊल उचला.












