हा कसला आवाज? कुत्रा गुरगुरतोय? कचऱ्याचा ट्रक मागे मागे येतोय? विमान हवेत उडायला झेप घेतंय?… अहो नाही! कोणीतरी मोठमोठ्याने घोरतंय!

हसाल, तर जग तुमच्या बरोबर हसेल, घोराल, तर तुम्हाला एकट्याने झोपायला लागेल!

सामान्यतः घोरण्याचा विषय हसण्यावारी नेला जातो. परंतु दुर्दैवाने, घोरणे ही एक गंभीर आणि व्यापक समस्या आहे. घोरणारा आणि घोरणे ऐकणारा, दोघांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. घोरणाऱ्याला (मेंदूचा झटका) स्ट्रोक आणि हृदयरोगाचा त्रास उद्भवू शकतो तर, दुसऱ्याची झोप उडाल्यामुळे त्याला/तिला अनेक समस्या निर्माण होतात.

घोरण्यामागील विज्ञान

झोपेच्या वेळी, घशाच्या मागच्या बाजूला असलेले स्नायू शिथिल पडतात. हा भाग कधीकधी अरुंद होतो आणि तात्पुरता बंदही होतो. श्वास घेताना, अरुंद जागेतून हवा जलद गतीने व घासून जाते, त्यामुळे आजूबाजूचे पेशी समूह कंप पावतात. यामुळेच घोरण्याचा आवाज येतो. श्वसनमार्ग जितका अरुंद असेल तितक्या पेशी अधिक कंप पावतात आणि घोरण्याचा आवाज जास्त होतो. घोरणाऱ्या लोकांमध्ये मार्ग अरुंद होण्याची वेगवेगळी कारणे असतात. नाक, तोंड किंवा घशातील मार्ग अरुंद होऊ शकतो.

घोरण्याचे कारण काय असते

श्वसनमार्गात असणाऱ्या अडथळ्यांमुळे माणूस घोरतो. ताणतणाव, रक्ताभिसरण समस्या, लठ्ठपणा, सायनस आणि नाकाच्या समस्या यासारख्या विविध घटकांमुळे हे अडथळे असू शकतात. अनुवंशिकता हे देखील महत्वाचे कारण असू शकते. धूम्रपान किंवा मद्यपान, चुकीच्या आहाराच्या सवयी, काही औषधे आणि काही गोष्टींचे वावडे असणे देखील या समस्येसाठी कारणीभूत ठरु शकते. जीभ किंवा टॉन्सिल्स (घशातील लसिका ग्रंथी) सुजणे तसेच वाढते वय ही कारणे देखील घोरण्याचा त्रास सुरु होण्यास कारणीभूत ठरु शकतात.

घोरण्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो

घोरण्यामुळे चांगली झोप लागत नाही, झोपेत अडथळा येतो किंवा श्वास तात्पुरता थांबतो. अनियमित किंवा अडथळा असलेल्या श्वासामुळे धाप लागणे आणि गुदमरणे यासारखे त्रास होऊ शकतात. घसा दुखू शकतो. उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक (मेंदूचा झटका) यासारख्या दीर्घकालीन आजारांची शक्यता देखील वाढते. राग, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता आणि कामवासना कमी होणे हे काही दुष्परिणाम आहेत. तुम्ही दिवसभर वेंधळेपणाने आणि बेफिकीर वागता.

तथापि काही विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी, हा जीवनमरणाचा प्रश्न असू शकतो. उदाहरणार्थ, मोटारचालक आणि मशीन ऑपरेटर्सना विशिष्ट प्रमाणात दर्जेदार झोपेची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे घोरणे ही एक अशी समस्या आहे ज्यापासून मुक्त होणे चांगले!

योगाच्या मदतीने नैसर्गिकरित्या घोरणे कसे थांबवायचे ते शिका

आज घोरण्याच्या समस्येवर अनेक उपचार व साधने उपलब्ध आहेत. कधी कधी शस्त्रक्रिया सुद्धा सांगितली जाते. तथापि तुम्ही तुमच्या घोरण्याच्या समस्येसाठी योगाचा विचार करू शकता कारण:
योग सुरक्षित आहे आणि त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत.
योगामुळे श्वासनलिका मोकळी होऊन घोरणे कमी होण्यास किंवा नियंत्रित होण्यास मदत होते.
तुम्ही कोणतेही इतर उपचार घेत असलात तरी त्याबरोबरच योगोपचार घेऊ शकता.

नैसर्गिकरित्या घोरणे बंद करण्यासाठी योगासने

घोरणे बंद करण्यासाठी, तुम्ही ही योगासने आणि प्राणायाम करुन पाहू शकता:

भुजंगासन 

Bhujangasana - inline
  • ​छाती विस्तार पावते आणि फुफ्फुसे मोकळी होतात.
  • ऑक्सिजनचा प्रवाह आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

भुजंगासन कसे करावे ते शिकण्यासाठी येथे क्लिक करा.

धनुरासन

Dhanurasana - inline
  • श्वासोच्छवासाचे नियमन करण्यास मदत होते.
  • छातीचे स्नायू विस्तारतात जेणेकरून खोलवर श्वास घेता येतो आणि उच्छ्वास सोडता येतो.

    धनुरासनाबद्दल अधिक जाणून घ्या

भ्रामरी प्राणायाम

  • एकाग्रता वाढण्यास मदत होते.
  • राग आणि तणाव कमी होतो.
  • वाढलेला रक्तदाब कमी करण्यास मदत होते.

भ्रामरी प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे.

उज्जयी प्राणायाम

  • घसा आणि चेहऱ्याचे स्नायू बळकट होतात.
  • झोपेच्या पद्धती नियंत्रित करण्यास मदत होते.
  • मन शांत होते.

उज्जयी प्राणायामा बद्दल अधिक जाणून घ्या.

नाडी शोधन प्राणायाम

Yoga Alternate Nostril Breathing (Nadi Shodhan pranayama) - inline
  • वाहिन्या स्वच्छ होऊन रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
  • घशातील संसर्ग कमी होतो.
  • घोरणे आणि स्लीप एपनिया (एक झोपेचा गंभीर विकार आहे ज्यामध्ये श्वास वारंवार थांबतो आणि सुरु होतो) या समस्या नियंत्रित होण्यास मदत होते.

नाडी शोधन प्राणायाम कसा करावा ते शिका.

कपालभाती

Benefits of Kapalbhati & Steps to do kapalbhati
  • कपालीय (क्रॅनियल) सायनस स्वच्छ होते.
  • झोप सुधारण्यास मदत होते.

कपालभाती प्राणायामाबद्दल अधिक जाणून घ्या.

सिंह गर्जासन

  • जिभेचा व्यायाम होतो.
  • मानेच्या स्नायूंना आराम मिळतो.
  • घसा खवखवणे टाळण्यास मदत होते.
  • प्लॅटिस्मा म्हणजेच घशाच्या समोरील स्नायू उत्तेजित होतात.

ॐ चे उच्चारण

  • गाढ झोप येते.
  • एकाग्रता सुधारते.
  • ‘ॐ’ चे उच्चारण केल्याने निर्माण होणारी कंपने शरीरातील प्रत्येक पेशीला आराम देतात.

घोरण्याचे तुमच्या आरोग्याच्या आणि स्वास्थ्याच्या अनेक पैलूंवर परिणाम होतात. घोरणे कसे बंद होईल हे शिकण्यासाठी स्वतःसाठी आणि/किंवा तुमच्या जोडीदारासाठी त्वरित उपाय शोधा. योग आणि ध्यान या बरोबरच निरोगी आणि नियमित झोप आणि आहार पद्धती विकसित करा. शक्य असल्यास, आयुर्वेदिक आहाराचा अवलंब करा.

वरील सर्व गोष्टींच्या संयोजनामुळे केवळ घोरणेच बंद होते असे नाही तर एकूण आरोग्य देखील सुधारु शकते.

तुमच्या जोडीदाराने तुम्हाला हाकलून देण्यापूर्वी घोरणे कायमचे थांबवा!

    Hold On! You’re about to miss…

    The Grand Celebration: ANAND UTSAV 2025 

    Pan-India Happiness Program

    Learn Sudarshan Kriya™| Meet Gurudev Sri Sri Ravi Shankar Live

    Beat Stress | Experience Unlimited Joy

    Fill out the form below to know more:

    *
    *
    *
    *