पाळीव प्राणीदेखील आपल्याला योगाचे धडे देतात! योगी त्यांच्या पारखी नजरेने आजूबाजूच्या जगातून प्रेरणा घेतात.मार्जरी आसन योगाभ्यासात शरीराला उत्कृष्ठ ताण देणारे आसन म्हणून अंतर्भूत होते.

मार्जरी – मांजर; आसन – शरीराची मुद्रा / पवित्रा

मार्जरी आसन कसे करावे

  1. आपले गुडघे आणि हातांवर या. शरीराला एखादया टेबलप्रमाणे बनवा. आपले हात आणि पाय त्या टेबलाचे चार पाय असतील आणि पाठ त्या टेबलाचा वरचा भाग बनेल.
  2. आपले हात जमिनीला काटकोनात ठेवा. हात खांद्याच्या बरोबर खाली असतील आणि तळहात जमिनीवर पसरलेले असतील. आपल्या गुडघ्यांमध्ये कंबरेइतके अंतर असेल.
  3. सरळ समोर पहा.
  4. श्वास घेत हनुवटी वर उचला. आपले डोके मागच्या बाजूला जाऊ दया. नाभी भागाला जमिनीच्या दिशेने ढकला आणि माकडहाड वरच्या बाजून उचला. नितंब आकसून घ्या.
  5. आपणास थोडा ताण जाणवतो आहे नां?
  6. आता त्याच स्थितीत (मार्जरी आसनात) थोडा वेळ राहा. दीर्घ श्वास घ्या.
  7. आता ह्याच्या उलट स्थिती करा. श्वास सोडत हनुवटी खाली आणा आणि छातीला टेकवा, पाठीच्या कण्याची कमान करा. शक्य होईल तेवढी पाठीची कमान करा. नितंब सैल सोडा.
  8. सुरुवातीच्या टेबलाच्या स्थितीत येण्यापूर्वी काही सेकंद या स्थितीत राहा.
  9. योगासनामधून बाहेर येण्यापूर्वी ५ – ६ वेळा याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
  10. श्री श्री योग विशेषतज्ञांकडून टीप : जेव्हा आपण ही प्रक्रिया सावकाश आणि लयबद्‌धतेने करतो तेव्हा त्याचा अधिक परिणाम होतो आणि आपण ध्यान अवस्थेत जातो.

मार्जरीआसनाचे फायदे

  • पाठीचा कणा लवचिक बनतो.
  • मनगट आणि खांदे मजबूत बनतात. पचनसंस्थेच्या अवयवांना मालिश मिळते आणि पचन सुधारते.
  • पोट सुडौल बनते.
  • मन शांत करते.
  • रक्ताभिसरण सुधारते.

मार्जरीसन कोणी करू नये

आपणास मान किंवा पाठीसंबंधी काही त्रास असल्यास प्रथम वैद्यकीय सल्ला घ्या. श्री श्री योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मार्जरी आसन करा.

सर्व योगासने
आधीचे योगासन : पद्मासन
पुढील योगासन :एक पाद राजकपोतासन

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity


    *
    *
    *
    *
    *