योगाचा सराव तुम्हाला बाळंतवेणा आणि बाळंतपण याकरीता मनाने आणि शरीराने तयार होण्यास मदत करतो. कारण योगामुळे तुम्ही केंद्रित होता. तुम्ही अविचल आणि निरोगी बनता. योगासने ही सौम्य पद्धती आहे तुमच्या शरीराला कार्यशील आणि लवचिक ठेवण्याची आणि सकाळी वांती होणे आणि बद्धकोष्ठता यासारखी सामान्य गर्भावस्थेतील लक्षणे कमी करण्याची. याने बाळंतवेणा सुसह्य होतात आणि गर्भाशय आणि गर्भनलिका यातील तणाव कमी करून आणि ओटीपोट उघडे करून बाळंतपण निर्विघ्नपणे पार पाडण्यात मदत होते.

दैनंदिन श्री श्री योग

श्री श्री योग शाळेमधील अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सोयीच्या वेळेनुसार दररोज योगाभ्यास शिका.

अधिक माहिती

गर्भावस्थेत योगा करताना घ्यावयाची काळजी

पहिल्या तिमाहीमध्ये उभ्याने करावयाची योगासने करावीत. कारण त्याने पायांना बळकटी मिळते,रक्ताभिसरण सुधारते, ऊर्जेची निर्मिती होते आणि पायात येणारे पेटके बंद होतात.

दुसऱ्या तिमाहीमध्ये तुम्ही आसने करण्याचा समय कमी करावा. त्याने थकवा आणि शीण येणार नाही. त्याऐवजी श्वसन आणि ध्यान यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.

तसेच गर्भावस्थेच्या दहाव्या आठवड्यापासून ते चौदाव्या आठवड्यापर्यंत सराव करू नये. कारण हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. ओटीपोटाला प्रमाणाबाहेर ताणू नये. शरीराला पीळ देणारी आसने करताना जास्त भर खांदे आणि पाठीच्या वरच्या भागावर द्यावा. ओटीपोटावर अजिबात तणाव येऊ देऊ नये. उलटे होणे पूर्णपणे टाळावे.

गर्भावस्थेत करावयाची योगासने

खाली दिलेली योगासने तुम्हाला गर्भावस्थेतील लक्षणे, सहज आणि सुलभ बाळंतपण आणि बाळंतपणानंतर जलद पूर्ववत होणे यात मदत करतात. पोटावर दबाव पाडणारी आसने आणि इतर अवघड आसने गर्भावस्थेच्या प्रगत टप्प्यामध्ये करू नयेत. ही दिलेली सर्व आसने तुम्ही करायलाच पाहिजे असे नाही. तुमच्या शरीराचे ऐका आणि केवळ तेवढेच करा जे तुम्ही सहजपणे करू शकता.

  • सुखासन
  • खांदे उचलणे
  • मानेचे व्यायाम
  • उज्जयी श्वसन
  • संपूर्ण यौगिक श्वसन
  • भ्रामरी
  • मार्जरासन
  • उज्जयी सोबत वज्रासन
  • पर्वतासन
  • कोनासन-१
  • कोनासन-२
  • त्रिकोणासन
  • वीरभद्रासन
  • पश्चिमोत्तानासन
  • नाजूक फुलपाखरू
  • विपरीत्कर्णी (भिंतीला टेकून)
  • शवासन (शेवटी संपूर्ण शिथिल होणे)
  • योगनिद्रा
  • नाडी शोधन प्राणायाम
  • ध्यान
art of living store logo white

गुरुदेवांचे कालातीत ज्ञान

पुस्तके, फोटो फ्रेम्स आणि भावपूर्ण ठेवा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

होय, गरोदरपणात योगासने करणे अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर आहे. योगासने आणि प्राणायाम केल्याने आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य चांगले राहते. मात्र, योगासने सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि प्रशिक्षित ‘श्री श्री योग’ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच सराव करा
गरोदरपणात योगासने केल्याने खालील मुख्य फायदे होतात:
१. शारीरिक लवचिकता: स्नायूंची लवचिकता वाढते, ज्यामुळे प्रसूती सोपी होण्यास मदत होते.
२. वेदनांपासून आराम: पाठदुखी, पाय दुखणे आणि थकवा यासारख्या गरोदरपणातील सामान्य समस्या कमी होतात.
३. मानसिक शांती: तणाव आणि भीती दूर होऊन मन शांत आणि सकारात्मक राहते.
४. रक्तभिसरण सुधारते: शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्याने बाळाची वाढ चांगली होते.
गरोदरपणात हलकी आणि आरामदायक आसने करावीत. यामध्ये प्रामुख्याने त्रिकोणासन, मार्जारीआसन, बद्धकोनासन आणि शवासन यांचा समावेश होतो. ही आसने शरीराला आराम देतात आणि ओटीपोटाच्या स्नायूंना बळकट करतात.
गरोदर महिलांसाठी नाडी शोधन प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम अत्यंत फायदेशीर आहेत. हे प्राणायाम श्वासोच्छ्वास संतुलित करतात, ऑक्सिजनची पातळी वाढवतात, चिंता दूर करतात आणि मनाला सखोल विश्रांती देतात.
योगासने करताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:
1. पोटावर दाब पडेल अशी कोणतीही आसने (उदा भुजंगासन, शलभासन) करू नयेत.
2. शरीराला जास्त ताण देऊ नये; थकवा जाणवल्यास लगेच विश्रांती घ्यावी.
3. उड्या मारण्याचे किंवा वेगाने हालचाली करण्याचे प्रकार टाळावेत.
4. नेहमी आरामदायक आणि सैल कपडे घालून, हवेशीर ठिकाणी योगासने करावीत.
ध्यान केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते आणि गरोदरपणात होणारे मूड स्विंग्स  नियंत्रणात राहतात. ध्यान तुम्हाला स्वतःशी आणि तुमच्या आत वाढणाऱ्या बाळाशी एक सखोल भावनिक जोड निर्माण करण्यास मदत करते.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *