माणसाच्या पाठीचा कणा अनेक मणक्यांनी बनलेला आहे, ज्याच्यामुळे पाठीच्या कण्याला संरक्षण आणि आधार मिळतो. या हाडांच्या समूहामुळे ताठ उभे राहता येते. सोलीओसिस ही पाठीच्या कण्याची स्थिती आहे ज्यात पाठीच्या कण्याला बाक येतो. ज्यांच्या कण्याला उजवीकडे किंवा डावीकडे किंवा पुढे किंवा मागे १० अंशापेक्षा जास्त बाक आला तर त्याला सोलीओसिसची स्थिती म्हणतात. हा दोष जगातील लोकसंख्येपैकी ०.५% इतक्या लोकांत दिसून येतो. आणि तो पुरुषांपेक्षा बायकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.

उपाय योजना

सोलीओसिसमुळे व्यक्तीच्या हालचालीवर बंधने येतात आणि अतिशय वेदनाही होतात. यावर शल्य चिकित्सा हा लोकप्रिय उपाय सुचवला जातो, पण त्याआधी इतर उपायांचाही विचार करावा. उपलब्ध असलेल्या इतर उपायांपैकी योग हा दीर्घ काळापासून उपलब्ध असलेला आणि परिणामकारक असा उपाय आहे. हे एक प्राचीन तंत्र असून त्याचा फायदा केवळ शारीरिक स्तरावरच होतो असे नाही तर मानसिक स्तरावरही होतो, ज्यामुळे सोलीओसिस मध्ये होणाऱ्या वेदनांवर मात करण्यासाठी धीर देतो.

जोमदारपणा निर्माण करणे

पाठीचा कणा शरीराचा बराचसा भार उचलतो.त्यामुळे त्यावर ताण येतो. सोलीओसिसच्या स्थितीमध्ये वेदना जास्तच तीव्र होतात. योगामुळे पायाचे स्नायू बळकट होतात,जेणे करून पाठीच्या कण्यावरचा बराचसा भार हलका होतो. योगासनांमध्ये श्वासोच्छवास दीर्घ करणारी आणि पाठीचा कणा ताठ करणारी विविध आसने आहेत. सुरुवातीला शरीराला आसनांची सवय होईपर्यंत थोडेसे दुखते पण नंतर आसनांची सवय होते आणि दुखणे कमी होते आणि दीर्घकाळ फायदा होतो. तर, काही सोप्या आसनांची माहिती करून घेऊ, ज्यांनी तुमची पाठ पुन्हा पूर्ववत योग्य आकारात येईल आणि सोलीओसिस दूर होईल.

वीरभद्रासन

veerbhadrasana

नांवाप्रमाणेच या आसनाने धैर्य येईल, उभे राहण्याची ढब सुधारेल आणि शरीराला आराम मिळेल. याने पाठीच्या खालच्या भागाला बळकटी येते. शरीरात संतुलन निर्माण होते आणि दम सुधारतो. सोलीओसिसशी सामना करताना बळकट पाठ आणि इच्छाशक्ती यांची मदत होते.

त्रिकोणासन

Trikonasana

उभे राहून करण्याच्या या आसनाने पाठीचा कणा ताणला जातो आणि मानसिक व शारीरिक तोल सावरला जातो. या आसनाने तणाव आणि पाठीचे दुखणे कमी होते.

मार्जारासन

हे मांजरीप्रमाणे असलेले आसन दोन्ही हात आणि दोन्ही पाय जमिनीवर ठेऊन केले जाते. याने पाठीतील लवचिकपणा वाढतो, रक्ताभिसरण सुधारते आणि मन शांत होते. सोलीओसिस झालेल्यांसाठी हे आसन खूप चांगले आहे.

शिशू आसन

Shishu asana inline

बसून करण्याचे आणखी एक आसन, शिशू आसनाने मज्जासंस्थेला आणि पाठीच्या कण्याला आराम मिळतो. चेतातंतू व स्नायू यांच्या स्थितीमुळे सोलीओसिस झालेल्यांसाठी हे अगदी योग्य आसन आहे.

पश्चिमोत्तानासन

Paschimottanasana

या आसनामुळे पाठीचा खालचा भाग ताणला जातो आणि हलकेपणा येतो. याने चिंता आणि थकवा कमी होतो आणि मन शांत होते.

अधोमुख श्वानासन

या आसनामुळे पाठीचा कणा ताणला जातो आणि संपूर्ण शरीरात मजबुती येते. विशेषत: दंड, खांदे, पाय आणि पाऊले. या आसनाच्या मदतीने शरीराचे वजन दोन्ही पायावर विभागले जाते आणि पाठीच्या कण्यावरचा भार कमी होतो.

सेतुबंधासन

Setu Bandhasana featured image

या आसनामुळे पाठीला ताण बसतो आणि पाठीचा कणा आणि स्नायू बळकट होतात. याने चिंता कमी होऊन मेंदू शांत होतो.

शलभासन

viparita shalabhasana superman pose featured image

टोळासारख्या या आसनामुळे संपूर्ण पाठीला लवचिकपणा आणि बळकटी येते. शरीरातील तणाव, थकवा आणि पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी होतात.

सर्वांगासन

Sarvangasana - inline

या आसनाने पाठीचा कणा लवचिक होतो. दंड आणि खांदे बळकट होतात. या आसनाने मन शांत होते.

शवासन

Shavasana - inline

योगासनांच्या शेवटी दोन मिनिटे शवासारखे पडून रहा. हे आसन ध्यान स्थितीला घेऊन जाते आणि पुनरुज्जीवित करणारे आहे.

प्राणायाम आणि ध्यान

योगिक श्वास, प्राणायाम आणि नाडीशोधन प्राणायाम केल्याने फुप्फुसे ताणली जातात आणि छातीच्या स्नायूंना बळकटी येते. पंचकोश ध्यानाने परिस्थिती सक्रिय पद्धतीने स्वीकारली जाते, सजगता आणि धीर वाढतो. हरी ओम् किंवा चक्र ध्यानाने चक्रांची आणि नाड्यांची शुद्धी होऊन ऊर्जा वाढते. जेणे करून प्राणाचा प्रवाह विना अडथळा होतो. ध्यान करताना सुरुवातीला पाठीला आधार घेऊन बसण्यास सोपे होईल.

धैर्य हीच गुरुकिल्ली आहे.

कोणत्याही व्यायाम प्रकाराप्रमाणेच योगाची साधना करण्याचे परिणाम काही काळाने दिसून येतील. धीर धरा आणि योगासने करत रहा. तुम्ही श्री श्री योगा हे शिबिर करू शकता. आणि सोलीओसिससाठी असलेली विशिष्ट आसने शिकू शकता. समूहाबरोबर योगासने करणे हेही चांगले आहे आणि हे लोकप्रियही आहे.

तुमची मर्यादा ओळखा

योगासने करताना थोडे श्रम पडतात. त्यामुळे काळजीपूर्वक करा. शरीराला जास्त ताण देऊ नका किंवा तुमच्या मर्यादा अति ताणू नका. नियमित साधना करण्याने काळानुसार तुमची क्षमता वाढेल. तुमच्या शरीराला सहज जमेल इतकाच ताण द्या आणि तिथेच थांबा.

आशावादी राहण्याचा फायदा आहे.

जीवनाबद्दल जास्त आशावादी राहिल्याने सोलीओसिसशी जास्त चांगला सामना करता येईल. आपले मित्र आणि कुटुंबियांशी बोला, त्याने तुमचा उत्साह कायम राहील. तुमच्या साधनेवर धीर आणि विश्वास ठेवा. नियमितपणा ठेवा आणि साधनेची मजा पूर्णपणे घ्या.

    Wait!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

     
    *
    *
    *
    *
    *