उच्चार: अर्-ध मत्-स्य-एन-द्रा-सन;
अर्ध = अर्धा; मत्स्येंद्र = माशांचा राजा; मत्स्य = मासा; इंद्र = राजा.
“अर्ध” म्हणजे अर्धा. “मत्स्येंद्र” हे अनेक सिद्ध गुरुंपैकी एक आहेत. हठ-योग-प्रदीपिका या मध्ययुगीन योग ग्रंथात अनेक सिद्ध योगींचा उल्लेख केला आहे. अशा या प्राचीन ग्रंथात मत्स्येंद्र यांचा उल्लेख आढळून येतो. या आसनाला पारंपरिक प्रथेनुसार “मेरुदंडाचा पीळ” म्हणतात कारण यामध्ये पाठीचा कणा हळूवारपणे पिळला जातो.
अर्ध मत्स्येंद्रासन कसे करावे
- पायाची मांडी घालून आरामदायक स्थितीत बसा.
- दोन्ही पाय समोर सरळ करा. उजवा गुडघा वाकवा आणि उजव्या पायाची टाच डाव्या नितंबाच्या जवळ आणा.
- श्वास घ्या आणि डावा गुडघा वरच्या दिशेने वाकवा आणि उजव्या पायाच्या उजव्या बाजूला उजव्या मांडीला स्पर्श करुन डावा तळपाय जमिनीवर सपाट ठेवा.
- पाठीचा कणा डावीकडे वळवताना उजवा हात सरळ करा आणि डाव्या गुडघ्याच्या बाहेरील बाजूस आणा आणि उजव्या हाताने डावे पाऊल पकडा.
- आपले डोके शक्य तितके डावीकडे वळवा आणि डावा हात पाठीमागे वाकवा. तुमचा पाठीचा कणा, मान आणि डोके एका सरळ रेषेत ठेवा आणि डावीकडे वळण्याचे प्रयत्न करणे सुरु ठेवा.
- असेच आता दुसऱ्या बाजूने करा. त्यासाठी पायरी क्रमांक २-६ सूचना दुसऱ्या बाजूसाठी वापरा.
अर्ध मत्स्येंद्रासनाचे फायदे
- पाठीच्या कण्याची लवचिकता आणि ताकद वाढवण्यासाठी अर्ध मत्स्येंद्रासन हे एक उत्तम योगासन आहे. ताणतणाव,शरीराची चुकीची ठेवण किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे यामुळे मान अवघडते किंवा पाठीच्या वरच्या भागात तणाव निर्माण होतो. हे त्रास या आसनामुळे कमी होतात.
- ओटीपोटाचे आळीपाळीने आकुंचन व प्रसरण होते. यामुळे या भागातील रक्ताभिसरण वेगाने होते आणि अंतर्गत अवयवांना मसाज मिळतो.अर्ध मत्स्येंद्रासनाच्या सरावाने पोट आणि नितंबांचे स्नायू देखील सुडौल होतात.
- कालावधी/पुनरावृत्ती: जोपर्यंत तुम्हाला सुखदायक वाटत असेल तोपर्यंत आसन धरुन ठेवू शकता. एका फेरीमध्ये प्रत्येक बाजूला आसन करणे समाविष्ट आहे. प्रत्येक सत्रात दोन ते तीन पूर्ण पुनरावृत्ती कराव्यात.
कालावधी/पुनरावृत्ती:
जोपर्यंत तुम्हाला सुखदायक वाटत असेल तोपर्यंत आसन धरुन ठेवू शकता. एका फेरीमध्ये प्रत्येक बाजूला आसन करणे समाविष्ट आहे. प्रत्येक सत्रात दोन ते तीन पूर्ण पुनरावृत्ती कराव्यात.
सर्व योगासने मागील योगासन : पूर्वोत्तानासन पुढील योगासन: बद्धकोनासन