अष्टकम ही आठ श्लोक किंवा चरण असणारी संस्कृतमधील काव्य रचना आहे. अष्टके ही प्राचीन ऋषींच्या आवडत्या काव्य प्रकारांपैकी एक होती . भारतीय संस्कृतीच्या अनेक वर्षांच्या इतिहासात सापडलेल्या डझनावारी अष्टकांमधून हे स्पष्ट होते.

महत्व
असेच एक अष्टक जे भारतभरातील मंदिरांमधून ऐकायला मिळते ते म्हणजे शिवलिंगाष्टक . दररोज असंख्य लोक या रचनेच्या पवित्र नादाने जागे होतात . त्या विशिष्ट प्रदेशातील सांस्कृतिक लोकभावना प्रतिबिंबित करत मंजुळ चालीवर ते म्हटले जाते.
आदि शंकराचार्य ज्यांना भगवान शिवाचे अवतार मानले जाते, यांनी लिहिलेले हे शिवलिंगाष्टक ही भगवान शिवाला लिंगाच्या रुपात (म्हणजे संस्कृतमध्ये – प्रतीकात्मक) अर्पण केलेली प्रार्थना आहे. ही प्रार्थना भगवान शिवाप्रती श्रद्धा, आज्ञाधारकता, निष्ठा आणि भक्ती दर्शविते . शिवलिंग हे शिव आणि शक्तीच्या शाश्वत खेळातून विश्वाच्या निर्मितीचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे. शिवलिंगाष्टकामध्ये भगवान शिवाचा महिमा आणि शिवलिंगाची पूजा करण्याचे फायदे सूचीबद्ध केलेले आहेत.
श्रावण (हिंदू वर्षातील पाचवा महिना) हा पवित्र महिना भगवान शिवाची प्रार्थना करण्यासाठी एक शुभ काळ मानला जातो. या महिन्यात दररोज केल्या जाणाऱ्या शिवपूजेच्या वेळी लिंगाष्टकाचे पठण करतात . भक्त सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, शक्यतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी; शिवलिंगासमोर शिवपूजा करताना किंवा भगवान शिवाचे स्मरण करताना या स्तोत्राचा जप करतात.

शिवलिंगाष्टक श्लोक आणि अर्थ
ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभाषितशोभितलिङ्गम्।
जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिवलिङ्गम्॥१॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) ज्याची भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि इतर देवांनी पूजा केली आहे, जे शुद्ध, तेजस्वी आणि सुशोभित आहे आणि जे जन्म (आणि मानवी जीवन) संबंधित दुःखांचा नाश करते. त्या चिरंतन शिवलिंगाला मी नमस्कार करतो !
देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहन करुणाकर लिङ्गम्।
रावणदर्पविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥२॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) देवता आणि श्रेष्ठ ऋषींनी ज्याची पूजा केली आहे, जो सर्व इच्छांना जाळून टाकतो, जो करुणामय आहे आणि ज्याने रावणाचाही अभिमान नष्ट केला आहे, मी त्या चिरंतन शिवलिंगाला नमस्कार करतो !
सर्वसुगन्धिसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गम्।
सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥३॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) ज्यावर विविध सुगंधी लेप लावलेले आहेत, जो व्यक्तीच्या (आध्यात्मिक) बुद्धिमत्तेच्या आणि विवेकाच्या उन्नतीचे कारण आहे आणि ज्याची सिद्ध, देव आणि असुरांनी स्तुती केली आहे; अशा त्या चिरंतन शिवलिंगाला मी नमस्कार करतो !
कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टित शोभित लिङ्गम्।
दक्षसुयज्ञविनाशन लिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥४॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) जो सोन्याने आणि इतर मौल्यवान रत्नांनी सजवलेला आहे, ज्याच्याभोवती लपेटलेल्या सर्वोत्तम सर्पांची शोभा आहे आणि ज्याने दक्षाचा भव्य यज्ञ नष्ट केला आहे; मी त्या चिरंतन शिवलिंगाला नमस्कार करतो !
कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गम्।
सञ्चितपापविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥५॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) ज्याला कुमकुम (केशर) आणि चंदन (चंदनाचा लेप) यांचा अभिषेक केला जातो, ज्याला कमळांच्या हारांनी सुंदरपणे सजवले जाते आणि जो (कित्येक जन्मांचे ) संचित पाप नष्ट करतो; मी त्या चिरंतन शिवलिंगाला नमस्कार करतो !
देवगणार्चित सेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव च लिङ्गम्।
दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥६॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) ज्याची खऱ्या भावनेने (मनोभावे किंवा चिंतन करून) आणि भक्तीने देवांच्या (देवतांच्या) समूहाद्वारे उपासना आणि सेवा केली जाते आणि ज्याला लाखो सूर्याचे तेज आहे; मी त्या चिरंतन शिवलिंगाला नमस्कार करतो !
अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम्।
अष्टदरिद्रविनाशनलिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥७॥
(त्या शाश्वत शिवलिंगाला मी नमस्कार करतो) जे आठ पाकळ्यांच्या फुलांनी वेढलेले आहे, जे सर्व सृष्टीचे कारण आहे आणि जे आठ दारिद्र्यांचा नाश करते ; त्या चिरंतन शिवलिंगाला मी नमस्कार करतो !
सुरगुरुसुरवरपूजित लिङ्गं सुरवनपुष्प सदार्चित लिङ्गम्।
परात्परं परमात्मक लिङ्गं तत् प्रणमामि सदाशिव लिङ्गम्॥८॥
उस शाश्वत शिवलिंग को नमन करता हूँ, जिनकी पूजा सभी देवों के गुरु, बृहस्पति तथा महानतम देव भी करते हैं, जिनकी पूजा सदैव स्वर्ग के उद्यानों से लाए पुष्पों से ही होती है, वो उद्यान जो सर्वोत्तम से भी उत्तम और महान से भी महान हैं। मैं उस शाश्वत शिवलिंग को नमन करता हूँ।
लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ।
शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते॥
जो कोणी शिवलिंगाजवळ या लिंगाष्टकाचे पठण करेल, त्याला शेवटी भगवान शिवाचे निवासस्थान प्राप्त होईल आणि त्याला परमानंद प्राप्त होईल.
शिव लिंगाष्टकम व्हिडिओ
शिवलिंगाष्टक पठणाचे फायदे
शेवटचा श्लोक हा एक परिशिष्ट आहे जो शिवलिंगाष्टक पठणाच्या फायद्यांचा सारांश सांगतो. या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने होणारे लाभ:
- मनाला शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा, वाईट आणि नकारात्मक विचार दूर ठेवण्यास मदत होते.
- चांगले आरोग्य, समृद्धी आणि ज्ञान यांचा उदय होतो.
- सकारात्मकता, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती वाढते ; तसेच प्रयत्नांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते.











