सखोल ध्यानासाठी ६ युक्त्या (meditation tips in Marathi)

तुम्ही जरी नियमितपणे ध्यान धारणा करीत असाल तरी कधी कधी तुमच्या लक्षात आले आहे कां की जेंव्हा तुम्ही ध्यानासाठी बसता तेंव्हा तुमचे मन जणू काही विचारांच्या दुनियेत सहलीला गेले आहे? ध्यान कसे करावे, ही जरी पहिली पायरी असली तरी तुम्हाला आणखीन वरच्या स्तरावर आणि गहन अनुभव येण्यासाठी अधिक मार्ग जाणण्याची इच्छा आहे कां? या दिशेने काही युक्त्या अनुसरल्यास आपल्याला मदत होऊ शकते.

 दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलवा :

एखाद्याला आपण मदत करतो तेव्हा आपल्याला कसे वाटते?आनंदी,समाधानी.तुम्हाला असे देखील वाटते कां की सकारात्मक ऊर्जेचा स्फोट होतोय,जणू स्वत:मध्ये काहीतरी विस्तार पावतंय? माहीत आहे,असे कां होते? याचे कारण असे की जेव्हा तुम्ही सेवा करता आणि एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलविता,तेव्हा चांगली स्पंदने आणि आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात.
सेवा केल्याने पुण्य मिळते  आणि हे पुण्य तुम्हाला गहन ध्यानाचा अनुभव देते.
शिल्पी मदान तिचा अनुभव सांगते की, “जेंव्हा मी सेवा करते तेंव्हा त्याचा थेट फायदा मला समाधानाचा अनुभव देऊन जातो,जो मला आनंदी आणि शांत ठेवतो.मी जेंव्हा आनंदी आणि शांत असते,तेंव्हा मला गहन ध्यानाची हमी मिळते.”

 मौनाची भाषा जाणून घ्या :

कल्पना करा की तुम्ही सकाळी लवकर टेरेसवर उभे आहात,भव्य लाल आकाशाकडे पाहत आहात,उगवणाऱ्या सूर्याच्या सौंदर्याने पूर्णपर्ण मंत्रमुग्ध झाला आहात.तुम्हाला गाढ शांततेचा अनुभव येतो, तेव्हा त्या शब्दापलिकडे नेणाऱ्या सौंदर्याशी एकरूप झाल्याचे जाणवते कां? तुमचे मन किती शांत आणि स्थिरावते ते लक्षात येते कां?कधी कुतूहल वाटले आहे कां,असे कां ?

मौनामध्ये विचार कमी येतात आणि मन स्थिरावते.
बहुतेक वेळा जेंव्हा आपली बडबड चालू असते,तेंव्हा आपल्या मनात देखील चिवचिवाट सुरु असतो. आपली इंद्रिये माहिती गोळा करण्यात आणि आपल्यावर अनेक विचार आणि कल्पनांचा भडीमार करण्यात व्यस्त असतात.
मौन ध्यानासाठी पूरक आहे.जेंव्हा तुम्ही शांत असता,तेंव्हा आपले मनातील विचार मंदावतात आणि तुम्ही ध्यानात अधिक सहजतेने उतरता.
मौन आणि ध्यान यांचा एकत्र अनुभव घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगचा पार्ट-२ कार्यक्रम,जो आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बेंगलोर स्थित आंतरराष्ट्रीय केंद्रात दर गुरुवार ते रविवारी होत असतो.
हितांशी सचदेव तिचा अनुभव सांगते की, “कधी कधी मला अनंत विचारांच्या जंजाळात अडकल्यासारखे वाटते. मौन धारणा केल्याने विचारांचा भडीमार हळूहळू कमी होत जातो आणि मला खूप गहन ध्यानाचा अनुभव येतो."

 योगासनांव्दारे आपल्या शरीराचे चोचले पुरवा :

तुमच्या लक्षात आले आहे कां, की कधी कधी तुम्हाला ध्यान करताना खूप अस्वस्थ वाटत असते आणि तुम्ही त्यात खोलवर उतरू शकत नाही?

याचे कारण असे की खूप वेळ काम करून अंग आखडून जाते आणि या आखडलेल्या अंगातल्या वेदना तुम्हाला अस्वस्थ करतात.काही योगासने केल्यामुळे अंग थोडे लवचिक होते आणि अस्वस्थतेतून तुम्ही मुक्त होता. त्यामुळे तुमचे मन स्थिरावते आणि तुम्हाला सखोल ध्यानाचा अनुभव मिळतो.

 आहाराकडे लक्ष द्या :

ते दिवस आठवा जेव्हा तुम्ही तेलकट,तळलेले,मांसाहारी खाद्यपदार्थ खालल्यानंतर ध्यान केले आहे आणि जेव्हा तुम्ही हलके आणि आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्यानंतर ध्यान केले आहे.तुमच्या ध्यानामध्ये तुम्हाला फरक जाणवला कां? याचे कारण की तुमच्या अन्नाचा तुमच्या मनाच्या स्थितीवर थेट परिणाम होतो.
एक ध्यान साधक म्हणून अनिवार्यपणे जे अन्न हलके,पचायला सोपे आणि अधिक प्राणऊर्जायुक्त-जसे धान्य, हिरव्या भाज्या,ताजी फळे,कोशिंबिरी (सॅलेड्स),सूप इ. तुमच्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे.

 स्वत:शी गुणगुणा :

विविध प्रकारचे संगीत तुमच्या विविध भावना उद्दीपित करतात ह्याकडे तुमचे लक्ष गेले आहे कां?
आपण ९०% किंवा अधिक आकाश तत्वाने बनलो आहोत,त्यामुळे नादाचा आपल्यावर खूप खोल परिणाम होतो. सत्संग मध्ये गायल्याने भावना शुद्ध होतात आणि तुमच्यात विस्तार पावल्याचा भाव जागृत होतो.सतत चिवचिवणारे ‘छोटे मन’ शांत होते आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा तुम्हाला गहन अनुभव येतो.

 तुमची रोजची ध्यानाची वेळ निश्चित करा :

एक शिस्त अंगी बाळगणे आणि साधनेचा सन्मान राखणे,ही तुमच्या गहन ध्यान अनुभवाची किल्ली आहे.म्हणून तुमच्या ध्यानाची वेळ रोज निश्चित करा आणि ध्यानात खोलवर जाण्याचा स्वप्नवत अनुभव घ्या.
दिव्या सचदेव सांगतात,“ पूर्वी मी वेगवेगळ्या वेळी ध्यान करीत असे.गेल्या काही महिन्यापासून मी रोज दुपारच्या जेवणाआधी ध्यान करते आणि मी अनुभवले की ध्यानाची एकच,ठराविक वेळ पाळली की जास्त चांगले आणि गहरे ध्यान लागते.
श्री श्री रविशंकरजी यांच्या ज्ञानचर्चेच्या प्रेरणेतून..
प्रियदर्शनी हरिराम,सहज समाधी ध्यान प्रशिक्षिका यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे दिव्या सचदेव यांचे हे सादरीकरण.